ADVERTISEMENT
home / Uncategorized
भाज्या खाण्याचे फायदे

आहारात करा भाज्यांचा जास्तीत जास्त समावेश होईल फायदा

 आहार चौकस असावा हे आप सगळेच जाणतो. चौकस आहारात अनेक गोष्टींचा समावेश होतो. हा आहार प्रोटीन्स, फायबर अशा सगळ्या गोष्टींनी युक्त असायला हवा. अनेकांच्या आहारामध्ये अंडी, चिकन अशा पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे आरोग्य निरोगी राखण्यास मदत मिळते. पण अनेकांच्या आहारात अंडी, चिकन यांचा समावेश नसतो. अशांनी आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करायला हव्यात. खूप जणांना भाज्या आवडत नाहीत. पण भाज्यांचे इतके वेगळे प्रकार मिळतात की त्या भाज्यांच्या सेवनामुळे आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात. जाणून घेऊया भाज्या तुमच्या शरीराला कशा फायदेशीर असतात ते


तोंडली भाजी रेसिपी, स्वादिष्ट आणि रूचकर (Tondli Chi Bhaji)

पोटाचे आरोग्य सुधारतात

भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पोट साफ होण्याचा त्रास असेल तर तुम्ही भाज्यांचे सेवन करायला हवे. भाज्या या अगदी कोणत्याही आणि तुमच्या आवडीच्या खाल्ल्या तरी देखील चालू शकतात. अगदी कोणतेही जेवण असले तरी देखील तुम्ही निरोगी पोटासाठी भाज्या खायला हव्यात. पानात नॉनव्हेज जरी असले तरी देखील थोडीशी भाजी खाल्ली तरी पचनाची समस्या कमी होते. 

वजन कमी करण्यास मदत करतात

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही भाज्या अगदी हमखास खायला हव्यात. भाज्या खाल्ल्यामुळे पोट जास्त काळासाठी भरुन राहते. त्यामुळे अरबटचरबट खाण्याची इच्छा अजिबात होत नाही. तुम्हालाही वजन कमी करायचं आहे पण डाएट करायचे नसेल तर तुम्ही अगदी हमखास डाएट करण्याऐवजी भाज्यांचे सेवन करायला सुरुवात करा. कोणत्याही वेळी भाज्यांचे सेवन केले तरी चालू शकते. भाज्यांचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला आलेले जडत्वही कमी होते. तुम्हालाही शरीर जड झाल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही अगदी हमखास भाज्यांचे सेवन करायला हवे.

ADVERTISEMENT

घरी अचानक आले पाहुणे तर असा करा झटपट स्वयंपाक

त्वचेसाठी चांगल्या

त्वचेमधील इलास्टिसिटी टिकून ठेवायचे असेल आणि त्वचेसाठी आवश्यक असलेले कोलॅजन मिळवायचे असेल तर तुम्ही अगदी हमखास भाज्या खायला हव्यात. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स असतात. जे त्वचेला चांगले ठेवण्याचे काम करतात. त्वचेवर एक सुरक्षित कवच तयार करते त्यामुळे त्वचा डॅमेज होत नाही. चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही अगदी हमखास भाज्यांचे सेवन करायला हवे. भाज्यांमधील हिरव्या भाज्या या सहज उपलब्ध असतात त्यांचा जास्तीत जास्त समावेश केला तर आरोग्यही चांगले राहते.

केसांनाही ठेवते मजबूत

केसांच्या आरोग्यासाठीही भाज्या या फारच फायद्याच्या असतात. भाज्यांच्या सेवनामुळे केसांना एक चांगली चमक येण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही भाज्या या कमीत कमी तेलात आणि चांगल्या शिजवून खायला हव्यात. भाज्या आहारात असतील तर केसांना नैसर्गिक केरेटीन मिळते. 

आता या कारणासाठी आहारात भाज्या हव्याच

ADVERTISEMENT

अधिक वाचा

हिवाळा सुरू होताच गळू लागतात केस, करा हे घरगुती उपाय

लहान मुलांसाठी सुपर लाँड्री शीट्स आणि आरामदायी अंडरवेअरचा चांगला पर्याय

11 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT