ADVERTISEMENT
home / Travel in India
न्यू इअर सेलिब्रेशनसाठी ‘या’ पाच जागा आहेत बेस्ट

न्यू इअर सेलिब्रेशनसाठी ‘या’ पाच जागा आहेत बेस्ट

आपण काही दिवसांतच वर्ष 2020 निरोप घेणार आहेत. 2020 च्या निरोपासह नवीन वर्ष 2021चंही हटके अंदाजात स्वागत करण्यासाठीही सर्व जण तयारी करत असतील. काही जण कुटुंबीयांसोबत पार्टी करतील, काही जण क्लबमध्ये जातील किंवा काहींनी बाहेरगावी जाऊन नव्या वर्षांचं जल्लोषात स्वागत करण्याची योजना आखली असेल. तुम्ही देखील ‘न्यू ईअर’चं सेलिब्रेशन करण्यासाठी एखाद्या चांगलं ठिकाण शोधत आहात का? कुठे जायचं यावरून तुमचा गोंधळ होतोय का? तर गोंधळून जाऊ नका, छान-सुंदर-निवांत जागा शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. देशात अशी कित्येक ठिकाणं आहेत, जेथे न्यू ईअरच्या पार्टीचं वातावरण अगदी भन्नाट असते. येथे नवीन वर्षांचं धुमधडाक्यात स्वागत केलं जातं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जागांवर मुली देखील सोलो किंवा ग्रुप ट्रिप करू शकतात. जाणून घेऊया न्यू ईअर शुभेच्छांसाठी (navin varshachya hardik shubhechha) खास सेलिब्रेशन डेस्टिनेशनची माहिती…

गोवा

नव्या वर्षाचं जल्लोष स्वागत करायचं असल्यास गोवा सर्वांत बेस्ट पर्याय आहे. येथे ख्रिसमसच्या दिवसापासून पार्टी, विविध सोहळ्यांना सुरुवात होते. इथल्या क्लब्समध्ये पार्टी करणं तुम्हाला नक्कीच आवडेल. याव्यतिरिक्त तुम्हाला येथे वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवरही भ्रमंती करताना मज्जा येईल. गोव्याची ट्रिप ठरवल्यास पणजी, दूधसागर वॉटरफॉल, ओल्ड गोवा यांसारख्या ठिकाणांना आवर्जून भेट द्या. विशेष म्हणजे येथे महिलांसाठी स्वतंत्ररित्या पार्टीचं आयोजन केलं जातं, जेथे पुरुषांना प्रवेश नसतो.

वाचा : उपवासात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य, जाणून घ्या कारणे

डलहौसी

मिनी स्वित्झरलँड म्हणून डलहौजी ओळखलं जातं. येथील नैसर्गिक देखावा, पर्वतरांगा तुमच्या मनात घर करतील. बर्फाची चादर ओढून घेतलेली झाडे-झुडपे तुमच्या न्यू ईअर सेलिब्रेशनमधील आनंद अधिक वाढवतील. येथे तुम्ही कुटुंबीय, मित्र-मैत्रिणींसोबत नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करू शकता. न्यू ईअर सेलिब्रेशनसह रोमँटिक जागांची सफर करण्याची ईच्छा असल्यास डलहौजी बेस्ट डेस्टिनेशन आहे.

ADVERTISEMENT

(वाचा : मुलींच्या ‘या’ पाच वाक्यांवरून ओळखा त्यांची ‘दिल की बात’)

उदयपूर

राजस्थानमधील कित्येक शहर न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी परफेक्ट आहेत. येथील सिटी ऑफ लेक म्हणजे उदयपूरच्या तुम्ही प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत. येथे तुम्हाला देशाचा इतिहास, संस्कृती आणि आकर्षक जागा पाहण्याची संधी मिळेल. राजा-महाराजांचे आलिशान महल, रंगीबेरंगी-मनमोहक हँडिक्राफ्ट्स तुम्हाला आवडतील. एखाद्या पॅलेसमध्ये, पर्यटनस्थळी न्यू ईअरचं सेलिब्रेशन करण्यात वेगळीच मज्जा येईल. महिला वर्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उदयपूर हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

(वाचा : हिवाळ्यात सन बाथ करणं आहे लाभदायक, पण ‘या’ दोन गोष्टी ठेवा लक्षात)

पाँडेचेरी

सतत गोव्याची वारी करून थकले असाल तर यंदा तुम्ही पाँडेचेरीची सफर करण्याचा प्लान आखायला हरकत नाही. येथे तुम्हाला फ्रांसीसी आणि भारतीय संस्कृतीचं मिश्रण अनुभवायला मिळेल. क्लबसहीत समुद्र किनाऱ्यावर बसून तुम्ही पार्टीची मजा घेऊ शकता.

ADVERTISEMENT

गोकर्ण

गोंगाट, धावपळ, कर्कश आवाजांचा तुम्हाला कंटाळा आला असेल आणि एखाद्या शांत, निवांत वातावरणात तुम्हाला नव्या वर्षातील पहिला दिवस साजरा करावयाचा आहे. तर कर्नाटकातील गोकर्ण या शहराहून सुंदर पर्याय असूच शकत नाही. येथे महाबळेश्वराचं प्रसिद्ध मंदिर आहे. याव्यतिरिक्त कित्येक ऐतिहासिक ठिकाण तुम्हाला पाहायला मिळतील. 

हे देखील वाचा :

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT