ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
best-foods-for-healthy-and-strong-hair-in-marathi

केसांना चमक द्यायची असेल तर खा हे सुपर फूड

आजकाल केसांच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. जेव्हा तुम्ही इतर आजारांशीदेखील लढता तेव्हा तुम्ही सर्वात जास्त समस्येला सामोरे जाता, ती म्हणजे केसगळती. याशिवाय अनेक गोष्टी आहेत ज्या केसांच्या समस्येचे कारण ठरतात. वास्तविक केस आणि त्वचा अशा दोन गोष्टी आहेत, ज्याची काळजी अधिक प्रमाणात घेतली जाते. आरोग्याची तारही केसांशी जोडलेली असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात काही पदार्थांचा समावेश करून घेणे आवश्यक आहे. केसांना आतून पोषण मिळण्यासाठी तुम्हाला पोषणयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. पोषक तत्वांमधील प्रोटीन हे केसांचा विकास करण्यासाठी अत्यंत आवश्यक समजण्यात येते. शरीरातील विटामिन आणि मिनरल्सची कमतरता पूर्ण करून केस आतून चांगले बनवता येतात. त्यामुळे असे काही पदार्थ आहेत, जे तुमच्या केसांना चांगले पोषण देण्यास अधिक चांगले ठरतात. अशाच काही पदार्थांची माहिती आपण घेऊ. 

अंडे आणि मासे (Eggs and Fish)

अंडे हे केवळ प्रोटीनयुक्तच नाही तर यामध्ये विटामिन ए, ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे अनेक पोषक तत्व आहेत. तसंच यामध्ये विटामिन बी कॉम्प्लेक्सचे गुणदेखील असतात, जे केसांना मजबूत करण्यासाठी मदत करतात. चमकदार केसांसाठी अंडे लावण्यासह तुम्ही याचे सेवन केल्यासही फायदा मिळतो. जर माशांच्या बाबतीत सांगायचे झाले तर यामध्ये ओमेगा – 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आढळते, जे केवळ केसगळती नियंत्रणात आणत नाही तर, केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत आणि केस पांढरे होण्याची समस्याही दूर करतात. 

नट्स (Nuts)

सीड्सच नाही तर नट्सदेखील केसांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. वास्तविक याचे सेवन किती प्रमाणात करायला हवे, याबाबत तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणे विसरू नका. बरेचदा याचे अधिक सेवन केल्याने याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. यामध्ये जिंक अधिक प्रमाणात दिसते, जे केसांना मजूबत करण्यासाठी उपयोगी ठरते. 

राजमा (Kidney Beans)

अत्यंत स्वादिष्ट असा राजमा आपल्या आरोग्यासह केसांसाठीही अत्यंत गुणकारी मानण्यात येतो. राजम्यामध्ये विटामिन सी असून केसांना मजूबत बनविण्याचे काम करते. विटामिन सी च्या शिवाय यामध्ये फोलिक अॅसिड, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, फायबर आणि प्रोटीन असे पोषक तत्व यामध्ये आढळतात. त्यामुळे केसांना अधिक चांगली चमक मिळते. 

ADVERTISEMENT

फळ आणि भाजी (Fruits and Vegetables)

मजबूत केसांसाठी फळ आणि भाज्या या तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत, जितके बाकीचे घटक. तज्ज्ञांनुसार, तुम्ही तुमच्या डाएटमध्ये बीट, पालक आणि बेरीज अधिक प्रमाणात समाविष्ट करून घ्या. यामुळे केसांना चांगला फायदा मिळतो. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या पोषक तत्वांने भरलेल्या आहेत, ज्याचा फायदा केसांना मिळतो. 

ओट्स (Oats)

केवळ बाहेरूनच नाही तर केसांना आतूनही पोषण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही ओट्स हा पदार्थ वापरू शकता. अनेक महिला ओट्सचा हेअर मास्क (Oats Hair Mask) आपल्या केसांवर लावतात. आपल्या डाएटमध्ये ओट्सचा समावेश करून घ्या आणि यामध्ये प्रोटीन, थायमिन, नियासिन, विटामिन बी6, विटामिन बी12, फॉस्फोरस, रायबोफ्लेविन, फोलेट असे पोषक तत्वही केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवून देण्यास मदत करते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT