ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
best-hair-treatments-before-your-wedding-in-marathi

लग्नापूर्वी केस चमकदार दिसण्यासाठी करा या हेअर ट्रिटमेंट

लग्न ठरल्यानंतर वेगवेगळ्या साड्यांची खरेदी यासह सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे त्वचा आणि केसांची काळजी घेणे. लग्न ठरल्यानंतर काही जणी आपला लुक बदलण्यासाठी केसांची ट्रिटमेंट (Hair Treatment) घेतात. ज्या महिलांचे केस कोरडे आणि निस्तेज असतात त्यांना खूपच त्रास होतो. त्यामुळे काही महिने आधीपासूनच त्यांनी हेअर ट्रिटमेंट घ्यावी. पण यासाठी नक्की कोणती ट्रिटमेंट करायला हवी याबाबत अनेकांना माहीत नसते. त्यासाठी योग्य माहिती असणेही आवश्यक आहे. तुम्हीही केस अधिक चमकदार, हेल्दी आणि चांगले राखण्यासाठी आम्ही ज्या ट्रिटमेंट सांगत आहोत त्या नक्की घ्या. लग्न ठरल्यावर केसांची काळजी घ्यायलाच हवी. जाणून घ्या या सोप्या हेअर ट्रिटमेंट्सविषयी. 

हेअर बोटोक्स (Hair Botox)

हेअर बोटोक्स या ट्रिटमेंटविषयी अनेक गैरसमज आहेत. यामध्ये अजिबात इंजेक्शनचा वापर होत नाही. यामध्ये मसल्स रिलॅक्स करण्यात येतात. बोटोक्स ट्रिटमेंटप्रमाणेच यामध्ये त्वचेला अधिक आराम देण्यात येतो. तसंच केसांना फायबरची गरज असते. या ट्रिटमेंटमध्ये फायबरचा पुरवठा करण्यात येत असून केसांची वाढ अधिक चांगली व्हावी याकडे लक्ष देण्यात येते. तसंच तुमचे केस कोरडे आणि निस्तेज असतील तर केसांना अधिक स्मूद (hair smoothening) करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. हेअर बोटोक्समध्ये केसांचे डी कंडिशनिंग (D-conditioning) करण्यात येते. प्रत्येक केस हा फायबर फिलरने कोटिंग करण्यात येतो. ही ट्रिटमेंट केराटिनप्रमाणेच आहे. पण यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकल्सचा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे हेअर बोटोक्स ट्रिटमेंटमध्ये त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या उपचारानंतर केस तुटण्याची समस्या कमी होते आणि केस अधिक घनदाट आणि चमकदार होण्यासही मदत मिळते. त्यामुळे लग्नापूर्वी तुम्ही या ट्रिटमेंटचा नक्कीच विचार करू शकता. 

स्काल्प ट्रिटमेंट (Scalp Treatment)

स्काल्पची समस्या अनेकांना असते. केसांची काळजी घेताना मॉईस्चराईज ट्रिटमेंट अधिक चांगली मानण्यात येते. केसांची काळजी घेत असताना स्काल्पवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. लग्नापूर्वी स्काल्प ट्रिटमेंट करून घेतल्यास, केस मजबूत राहण्यास मदत मिळते. केसांमधील तेल आणि घाण स्वच्छ करण्यासाठी या ट्रिटमेंटचा उपयोग होतो. कोणत्याही चांगल्या पार्लरमधून तुम्ही ही ट्रिटमेंट करून घेऊ शकता अथवा एखाद्या स्पेशल हेअर केअर सेंटरमधूनही तुम्हाला हे करून घेता येईल. 

प्रोजेनरा ट्रिटमेंट (Progenera Treatment)

आजकाल अनेक महिलांना केसगळती अर्थात हेअरफॉल (Hairfall) समस्येला सामोरे जावे लागते. तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल तर तुम्ही यासाठी मायक्रो सर्जिकल हेअर ग्रोथ ट्रिटमेंट (Micro Surgical Hair Growth Treatment) वापर करू शकता. या उपचारामुळे केस अधिक मऊ मुलायम होतात. तसंच यामध्ये रिजेनरेटिव्ह सेल्स हे रूग्णाच्या स्काल्पच्या एक्स्ट्रॅक्टसाठी उपयोगी ठरते. प्रोजेनरा ट्रिटमेंटमध्ये तुमच्या स्काल्पच्या त्वचेमध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतात. तसंच या उपचारामुळे केस अधिक घनदाट होतात आणि त्यासह केसांची वाढ होण्यासही मदत मिळते. 

ADVERTISEMENT

सिस्टिन हेअर ट्रिटमेंट (Cysteine Hair Treatment)

Cysteine Hair Treatment

सिस्टिन एक नैसर्गिक हेअर ट्रिटमेंट आहे. या उपचारादरम्यान तुमचे फ्रिजी केस मऊ आणि मुलायम होतात. तसंच या उपचारानंतर केस कोरडे आणि निस्तेज राहात नाहीत. या ट्रिटमेंटमध्ये सिस्टिन कॉम्प्लेक्सचा वापर करण्यात येतो. तसंच यामध्ये अमिनो असिड आणि हेअर प्रोटीनचाही वापर करण्यात येतो. या उपचारादरम्यान केस व्यवस्थित धुऊन ब्लो ड्राय करण्यात येतात. त्यानंतर सिस्टिन केसांचा लहान लहान भाग करण्यात येतात. त्यानंतर प्लास्टिक शीटने केस रॅप करून साधारण पाऊण तास तसंच ठेवण्यात येते. सिस्टिन कॉम्प्लेक्सनंतर केसांना हिट देण्यात येते. ज्यामुळे केस अधिक चांगले होतात. त्यानंतर केसांवर पुन्हा ब्लो ड्रायचा वापर करण्यात येतो. या उपचारानंतर केसांवर नियमित चांगल्या शँपू आणि कंडिशनरचा वापर करावा. यामुळे केस अधिक चमकदार आणि मुलायम होतात. 

तुम्हालाही लग्नाआधी तुमच्या केसांबाबत शंका असेल तर तुम्ही यापैकी योग्य ट्रिटमेंटचा वापर करून आपले केस अधिक चांगले करून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT