ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
keratin treatment

नैसर्गिक पद्धतीने घरीच करा केराटिन ट्रिटमेंट, सोपी पद्धत

आपल्याला आपल्या केसांची नेहमीच खूप काळजी असते. आपले केस हे प्रोटीनयुक्त असतात. त्यामुळे प्रोटीनची कमतरता भासू लागली की, केस कोरडे, फ्रिजी आणि डॅमेज होतात. वास्तविक प्रोटीनयुक्त आहार तुम्ही नियमित घेतला तरी नक्की केस वाढण्यासाठी आणि चांगले राहण्यासाठी मदत मिळते. तसंच प्रोटीनयुक्त मास्क लावल्यानेही केस अधिक मॅनेजेबल आणि सरळ होण्यास मदत मिळते. प्रोटीनबेस हेअर मास्क वापरल्याने तुमच्या केसांना पोषण आणि मॉईस्चाराईजर मिळते आणि केसांना चांगले आणि हेल्दी राखण्यास मदत करतात. तुम्ही नैसर्गिक गोष्टींनी अगदी सहजपणाने प्रोटीनयुक्त हेअरमास्क बनवू शकता. घरच्या घरी केसांना केराटिन ट्रीटमेंट कशी द्यायची याबाबत आम्ही तुम्हाला या लेखातून माहिती देत आहोत. कोरड्या आणि फ्रिजी केसांसाठी तुम्ही याचा नक्की वापर करून घ्या. 

साहित्य 

  • 1 अंड्याचा पिवळा भाग 
  • 6 चमचे दही 
  • 1 पिकलेले केळे 
  • 2 मोठे चमचे मध 

बनविण्याची पद्धत 

  • अंड्यांचा पिवळा भाग दह्यामध्ये मिक्स करा 
  • त्यासाठी एका लहान भांड्यात अंड्याचा पिवळा बलक फेटून घ्या 
  • आता यामध्ये दही घाला आणि व्यवस्थित फेटून एकत्र मिक्स करा 
  • त्यानंतर एका भांड्यात पिकलेले केळे घ्या आणि काट्याने नीट मॅश करून घ्या
  • मॅश केल्यानंतर त्यात 2 मोठे चमचे मध मिक्स करून घ्या आणि मग अंडी आणि दह्याचे मिश्रण मिक्स करा 
  • हे मिक्स करण्यात आलेले मिश्रण केसांना लावा आणि काही वेळ तसंच राहू द्या 

लावण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • एकदा अंड्याचा पिवळा भाग आणि दही एकत्र केल्यानंतर व्यवस्थित काळजी घेऊन हेअरमास्क तुम्ही केसांना लावा 
  • त्यानंतर एक कंगवा घ्या आणि डिस्पोजेबल ग्लोव्ह्ज घाला 
  • हा मास्क ब्रशने लावायला सुरुवात करा. मास्क लावताना कंगव्याचा वापर करा. ज्यामुळे तुमचा हेअरमास्क व्यवस्थित समान पद्धतीने पसरेल
  • आपल्या केसांच्या मुळापासून मास्क कव्हर करा 
  • त्यानंतर साधारण अर्धा तास तसाच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने केस धुवा 
  • मास्क पूर्ण निघाल्यावर केसांना शँपू लावा आणि कंडिशनरचा वापर करावा
  • यामुळे तुमचे केस अधिक स्मूथ होतात आणि केस धुतल्यानंतर सीरम लावण्याचीही आवश्यकता नाही 

केराटिनसाठी अंडे, दही, केळे आणि मधच का?

घरच्या घरी तुम्ही केराटिन करू शकता. पण केराटिन करण्यासाठी अंडे, दही, केळे आणि मध या चारच गोष्टींचा वापर का करायचा याबाबत अधिक जाणून घेऊया.

अंड्याचा पिवळा भाग

  • अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये प्रोटीन आणि फॅट अधिक प्रमाणात असतात. ज्यामध्ये कोरडे केस आणि डॅमेज केस अधिक मजूबत करण्यासाठी आणि मॉईस्चराईज करण्याचा फायदा अधिक मिळतो
  • तसंच यामध्ये अधिक विटामिन्स असतात जे केसांना डॅमेज होण्यापासून वाचवतात आणि अंडे केसांच्या वाढीसाठीही मदत करतात 

मध 

honey
  • मधामध्ये एमोलिएंट आणि मॉईस्चराईज हे दोन्ही गुण असतात, जे आपल्या केसांना अधिक चांगले मॉईस्चराईजर मिळवून देतात 
  • एमोलिएंट्स स्काल्पचे फॉलिकल्स अधिक मुलायम बनवतात आणि निस्तेज केसांना चमक मिळवून देते 
  • मध हे नैसर्गिक साधन असून मॉईस्चराईज आणि चमक मिळवून देण्यासाठी अधिक मदत करते

केळे 

  • केळे आपल्या केसांना अधिक हायड्रेट करण्यास मदत करते आणि त्याशिवाय केसांना अधिक आरोग्यदायी राखते 
  • नियमित उपयोगासह केळ्याचा हेअरमास्क तुमच्या केसातील मुलायमपणा वाढवतो. केसांना अधिक मऊ बनवतो आणि केसांमध्ये येणारी खाजही कमी करतो 
  • केळं हे केसांसाठी आणि स्काल्पसाठी अत्यंत चांगले असते. तसंच स्काल्पमध्ये चमक आणण्यासाठी याचा उपयोग होतो. कोंडा रोखण्यास आणि नियंत्रणात आणण्यासाठी याची मदत होते. तसंच स्काल्पला मॉईस्चराईज कऱण्यासाठीही मदत मिळते 
  • केळ्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि पोषक तत्वांनी भरलेले असते, जे केसांना अधिक मुलायम बनविण्यास मदत करते. तसंच फाटे फुटलेल्या केसांना तुटण्यापासून वाचवतात

दही

Dahi Recipe In Marathi
  • प्रोटीनशिवाय दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे घाण शोषून घेण्यास मदत करतात आणि केसांना मॉईस्चराईज करण्यासाठीही मदत करतात 
  • तसंच स्काल्पशी संबंधित समस्या असतील तर यामुळे कोंडाही होतो. दह्याचा कोंड्यासाठी तुम्हाला उपयोग करून घेता येतो. तसंच क्युटिकल्स मऊ करून अधिक मजबूत करण्यासाठी उपयोग होतो. घनदाट केसांसाठीही याचा उपयोग होतो.

अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी पार्लरप्रमाणेच केराटिन ट्रिटमेंट करू शकता. यामध्ये अधिकाधिक नैसर्गिक गोष्टी असल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत. तरीही तुम्ही या सगळ्या पदार्थांचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करून घ्या. 

17 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT