ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
best-jeans-for-plus-size-women

प्लस साईज महिलांकडे या जीन्स असायलाच हव्यात

जीन्स घालणे सर्वच मुलींना आवडते. पण आपल्याला हवी तशी परफेक्ट जीन्स (Jeans) मिळणे बरेचदा कठीण असते. विशेषतः प्लस साईज महिलांना जीन्सची निवड करताना खूपच शोध घ्यावा लागतो. कित्येकदा जीन्सचा आकार हा अजिबात व्यवस्थित दिसत नाही, तर याशिवाय जीन्समध्ये आपली जाडी अधिक उठून दिसते. त्यामुळे कोणती जीन्स आपल्याला व्यवस्थित दिसेल आणि कोणती जीन्स प्लस साईज महिलांना परफेक्ट दिसेल याबाबत तुम्ही या लेखातून जाणून घ्या. प्लस साईज महिलांना कोणत्या जीन्स घालायच्या याबाबत माहिती. 

फ्लेअर जीन्स 

Flared Jeans

फ्लेअर्ड जीन्स विशेषतः त्या महिलांसाठी योग्य असते, ज्यांचे पोट अधिक मोठे असते अथवा पोटावर फॅट असतात. या जीन्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या पोटातील चरबी आणि पोटावरील फॅट दोन्ही कव्हर होते. ही जीन्स स्टायलिश असण्यासह अत्यंत आरामदायीदेखील असते. त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबमध्ये तुम्ही ही जीन्स नक्की ठेवायला हवी. 

टिप्स – 

  • ही जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा की, तुमची जीन्स ही अत्यंत लाईट रंगात नसावी, नेहमी गडद रंगाच्या फ्लेअर्ड जीन्सचा वापर करावा 
  • फ्लेअर्ड जीन्ससह नेहमी लाईट हिल्स अथवा स्निकर्सचा वापर करा. यामुळे तुमचा लुक अधिक चांगला दिसतो आणि तुम्ही स्टायलिश दिसता
  • तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्लेअर्ड जीन्ससह क्रॉप – टॉप अथवा टक करता येणारे टॉप्स घाला 

बूट कट जीन्स 

Boot Cut jeans

ही जीन्स त्या महिलांना चांगली दिसते, ज्यांचे पाय जाड असतात अथवा पायावर अधिक फॅट असतात. बूट जीन्स स्टायलिश दिसण्यासह ट्रेंडीही दिसते, त्यामुळे प्लस साईज मुलींसाठी ही जीन्स हा एक चांगला पर्याय आहे. बूट कट स्टाईलमध्ये ब्लॅक जीन्स तुमच्याजवळ असायलाच हवी. बूट कट स्टाईलमध्ये ब्लॅक जीन्स तुमच्याजवळ असायला हवी. तर निळ्या रंगाच्या जीन्समध्ये तुमची जाडी अधिक दिसून येते. ही जीन्स अजिबात तुम्ही लाईट रंगात वापरू नका. 

ADVERTISEMENT

टिप्स – 

  • अशा स्वरूपाच्या जीन्समध्ये हील सँडल अधिक स्टायलिश दिसते. तसंच या जीन्ससह तुम्हाला स्निकर्स घालणे टाळायला हवे 
  • या जीन्ससह शर्ट अधिक स्टायलिश दिसतात. अशात बूट कट जीन्ससह शर्ट नक्की घाला 

टमी टकर जीन्स 

Tummy Tucker Jeans

टमी टकर जीन्स त्या महिलांसाठी अधिक उत्तम आहे ज्यांची जाडी अधिक आहे. त्यामुळे तुम्ही जर पोट मोठं असेल म्हणून जीन्स घालत नसाल तर तुम्ही टमी टकर जीन्स नक्कीच ट्राय करायला हवी. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही जीन्स हाय वेस्ट असण्यासह तुमचे पोट आतल्या बाजूला खेचते आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही टॉपसह ही जीन्स वापरू शकता. 

टिप्स – 

  • या स्वरूपाच्या जीन्ससह तुम्ही ओव्हरसाईज्ड कपडेदेखील स्टाईल करू शकता 
  • तुम्हाला हवं असेल तर जीन्ससह कॅज्युअर शूज अथवा स्निकर्सदेखील तुम्ही घालू शकता. त्याचप्रमाणे या जीन्स हिल्स अथवा सँडल घालणं टाळा 

हाय वेस्ट बटण जीन्स 

high waiste button jeans

ही जीन्सदेखील टमी टकर जीन्सप्रमाणे तुमचा बेली फॅट कव्हर करण्यासाठी योग्य ठरते. ही जीन्स हाय वेस्टसह तुम्हाला स्टायलिश आणि आकर्षक लुक देण्यास अधिक मदत करते. यामुळे तुम्हाला ही जीन्स तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करून घ्यायला हवी. या जीन्ससह तुम्हाला शार्ट अथवा लांब कोणताही टॉप स्टाईल करता येईल. 

ADVERTISEMENT

टिप्स – 

  • बेली बॅट पाहून तुम्हाला तुमच्या जीन्सची निवड करायला हवी, जी हायवेस्ट असेल. याशिवाय लो वेस्ट जीन्स पूर्णतः टाळायला हवी 
  • या पद्धतीच्या जीन्सवर तुम्ही हिल्स अथवा शूज दोन्हीची स्टाईल करू शकता 

स्ट्रेट फिट जीन्स 

straight fit jeans

तुमचे पोट मोठे असण्यासह तुमच्या मांड्याही जाड असतील तर तुम्ही स्ट्रेट फिट जीन्स घालायला हवी. ही जीन्स पोटापासून अँकलपर्यंत स्ट्रेट असते, त्यामुळे तुमच्या जाड मांड्या बारीक दाखविण्यासाठी याचा उपयोग होतो. या पद्धतीच्या जीन्स घातल्यानंतर तुमच्या मांड्या आणि पोट दोन्ही बारीक दिसते.

टिप्स – 

  • स्ट्रेट फिट जीन्ससह तुम्हाला बेली शूज अधिक चांगले दिसतात. यामुळे तुमचा लुक अदिक आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यास मदत मिळते 
  • या जीन्ससह लांब शर्ट अथवा शॉर्ट दोन्ही टॉप्स स्टायलिश दिसतात 

या टिप्सचा वापर करून तुमच्या वॉर्डरोबमध्ये जीन्सचा समावेश तुम्ही करून घ्या आणि दिसा अधिक स्टायलिश!

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

06 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT