ADVERTISEMENT
home / Celebrity Make Up
जाणून घ्या महागड्या मेकअप प्रोडक्टसाठी बजेट फ्रेंडली पर्याय (Best Makeup Dupes In Marathi)

जाणून घ्या महागड्या मेकअप प्रोडक्टसाठी बजेट फ्रेंडली पर्याय (Best Makeup Dupes In Marathi)

मेकअप करण्याची आवड असणाऱ्यांना त्यांच्याकडे मेकअपचे उत्तम साहित्य असावे असे वाटते. पण मेकअपची हौस असणे आणि महागडे मेकअप प्रोडक्ट विकत घेणे यासाठी खूप कसरत करावी लागते. काही मोठ्या ब्रँडचे मेकअप प्रोडक्ट हे सोन्याच्या भावापेक्षाही अधिक असतात. आता प्रत्येकवेळी हे प्रोडक्ट आपल्या बजेटमध्ये बसतेच असे नाही. पण निराश होण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही ज्या महागड्या मेकअप प्रोडक्ट घेण्याची प्रतिक्षा करत असता त्याचे काही डुप्लिकेट किंवा त्या प्रोडक्टशी साधर्म्य असलेले प्रोडक्ट बाजारात अगदी सहज मिळतात. त्याला Dupes असे म्हणतात. डुप्लिकेट म्हणजे हे प्रोडक्ट खराब असतील किंवा जुने असतील अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही संपूर्ण माहिती अगदी नीट वाचा आणि तुमच्या पैशांची बचत करा.

डुप्लिकेट किंवा Dupes मेकअप म्हणजे काय? – What Is Makeup Dupes In Marathi

बाजारात तुम्हाला मेकअपचे अनेक ब्रँड दिसतात. त्या सगळ्यांकडे तेच प्रोडक्ट असतात. पण तरीसुद्धा त्यामध्ये काही ब्रँड हे नेहमीच सरस ठरतात. पण त्यांच्या किंमती सगळ्यांनाच परवडतात अशा नाही. म्हणूनच एखाद्या महागड्या प्रोडक्टमधील सारखेच गुणधर्म वापरुन कमी किमतीत काही ब्रँड तसेच मेकअपचे साहित्य बनवतात. त्यांना Dupes असे म्हणतात. जर तुम्हाला त्याच प्रोडक्टची मिळणारी फर्स्ट किंवा थर्ड कॉपी वाटत असेल तर असेही नाही. या मेकअपच्या शब्दश: डुप्लिकेट कॉपीज नाहीत. तर दुसऱ्या ब्रँडने बजेट फ्रेंडली बनवलेले प्रोजेक्ट असतात. त्यामुळे आता मेकअप Dupes म्हणजे काय हे तुम्हाला कळले असेलच. आता पाहुया तुमच्या महागड्या प्रोडक्टचे मेकअप Dupes

डोळ्यांचे सौंदर्य खुलवणारे आयलायनर शोधत असाल (Best Eyeliners In India In Marathi)

तुमच्या खिशाला परवडणाऱ्या महागड्या मेकअपचे डुप्लिकेट (Affordable Dupe Makeup In Marathi)

अनेक महागड्या ब्रँडला कोणते मेकअप प्रोडक्ट पर्याय आहेत ते आता आपण जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

PIXI Beauty Glow – Nykaa Glow Getter Highlighter

त्वचेला जरासे हायलायटर लावल्यानंतर तुमच्या मेकअपचा लुक अगदी पटकन बदलतो. Pixi चे हायलायटर तुमच्या त्वचेला पटकन ग्लो आणण्याचे काम करते. त्यामुळेच अनेकांची त्याला पसंती असते. पण तुम्हाला त्यासारखाच पर्याय Nykaa मध्ये उपलब्ध आहे. जो तुम्हाला अगदी तसाच लुक देऊ शकतो. 

उत्पादन (Product): PIXI Beauty Glow Highlighte: 1372 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): Nykaa Glow Getter Highlighter: 629 रुपये

Too Faced Mascara – L’oreal Paris Voluminous Lash Paradise Mascara

डोळ्यांच्या एकेक पापण्या उठून दिसण्यासाठी मस्कारा लावला जातो. Too faced mascara हा सगळ्यात भारतातील उत्तम मस्कारा म्हणून ओळखला जातो. कारण तुमच्या पापण्या यामुळे अधिक घनदाट दिसतात. पण त्याची किंमत इतकी जास्त आहे की, हा मस्कारा घेताना फार विचार करावा लागतो. त्याऐवजी तुम्ही L’oreal paris voluminous mascara विकत घेऊ शकता.

ADVERTISEMENT

उत्पादन (Product): Too Faced Mascara: 1050 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe):  L’oreal paris voluminous mascara:  559 रुपये

NARS Afterglow – Revlon Kiss Cushion Lip Balm

अनेकांना लिपस्टिकपेक्षाही जास्त लिप बाम लावायला आवडतात. NARS हा त्यामधील एक चांगला आणि प्रसिद्ध ब्रँड आहे. पण त्यासारखाच एक चांगला ब्रँड म्हणजे Relvon ज्यामध्ये तुम्हाला अगदी तसेच प्रोडक्ट उपलब्ध आहे. त्याचा वापरही तुम्ही करु शकता. Revlon च्या या लिप बाममध्ये तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर्सही मिळू शकतात. 

उत्पादन (Product): NARS Afterglow Lip Balm – 2095 रुपये

ADVERTISEMENT

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): Revlon Kiss Cushion Lip Tint : 833 रुपये

 चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप (Face Makeup For Freckles In Marathi)

Charlotte Tilbury Hot Lips In Kim kw – Nyx Cosmetics Butter Lipstick

लिपस्टिकमध्ये कितीतरी वेगवेगळे प्रकार असतात. पण काही लिपस्टिक या महाग असल्या तरी आपल्या कायम लक्षात राहतात. अशीच आहे Charlotte ची लिपस्टिक पण ती सगळ्यांच्याच खिशाला परवडणारी नाही म्हणूनच त्याला पर्याय असलेला NYX चा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे.

उत्पादन (Product): Charlotte Tilbury Hot Lips In Kim kw: 2194 रुपये

ADVERTISEMENT

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): Nyx butter lipstick in boardwalk: 1066 रुपये

Anastasia Beverly Hills Modern Renaissance Palette – Wet n Wild Color Icon Eyeshadow

Anastasia beverly hills हा अनेकांच्या आवडीचा ब्रँड. पण यावर पैसा खर्च करायचा म्हणजे तुम्हाला साधारण 5 हजार रुपयांचा खर्च होतो. पण तुम्हाला फार बजेटमध्ये wet and wild चे आयशॅडो पॅलेट मिळू शकते. 

उत्पादन (Product): Anastasia Beverly Hills Modern Renaissance Palette: 4,350 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): The wet and wild icon eyeshadow palette: 599 रुपये

ADVERTISEMENT

MAC Eye Kohl Smolder – Rimmel London Soft Kohl Kajal Eye Liner

काजळ पेन्सिल ही अनेकांच्या डोळ्यांच्या मेकअपचा अविभाज्य भाग असते. ज्यांना काजळ पेन्सिल खूप आवडते. त्यांना सतत खूप महागड्या काजळ पेन्सिल घेणे शक्य होईलच असे नाही. MAC चे काजळ हे तुलनेने महाग असते. त्याला पर्याय म्हणून तुम्ही Rimmel चे काजळ वापरु शकता. ते ही तुम्हाला तसाच फिनिश देऊ शकेल. 

उत्पादन (Product): MAC Eye Kohl Smolder: 1700 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): Rimmel Soft Kohl Kajal: 150 रुपये

MAC Mineralize Skinfinish – Makeup Revolution Bronzer

कोणत्याही पार्टीसाठी किंवा खास कार्यक्रमासाठी ज्यावेळी गोल्डन रंगाचा उपयोग आपल्या मेकअपमध्ये करायचा असतो. अशावेळी आयशॅडो किंवा ब्लशरच्या जागी वापरतो. पण ब्रॉन्झर गोल्डन रंग म्हटला की, अनेक ब्रँडमध्ये ते महाग मिळतात. म्हणूनच तुमच्यासाठी सोपा असा पर्याय आहे तो म्हणजे Makeup Revolution

ADVERTISEMENT

उत्पादन (Product): MAC Mineralize Skinfinish Gold Deposit: 3100 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): Makeup Revolution vivid baked bronzer rock: 650 रुपये

NARS Super Radiant Booster – NYX Professional Makeup Liquid Illuminator

तुम्ही एखाद्या पार्टीसाठी तयार होत असाल आणि तुम्हाला खूप जास्त मेकअप करायचा नाही. पण पार्टीमध्ये उठून दिसायचे असेल तर तुम्ही या लिक्विड हायलायटरचा उपयोग करायला हवा. अनेकदा असे हायलायटर खूप महाग मिळतात. पण त्याला पर्याय असलेले प्रोडक्टही आपल्याला मिळतात. जे अगदीच बजेट फ्रेंडली आहेत.

उत्पादन (Product): NARS Super Radiant Booster: 9589 रुपये

ADVERTISEMENT

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): NYX born to glow illuminator850 रुपये

Fenty Beauty Hydrating Primer – Hyaluronic Hydrating Primer

फाऊंडेशन लावण्याआधी चेहऱ्यावरील पोअर्स झाकण्यासाठी अत्यंत महत्वाची स्टेप म्हणजे चेहऱ्याला प्राईमर लावणे. अनेक प्राईमर असे असतात जे तुमच्या चेहऱ्याला कोरडे करतात. पण जे प्राईमर तुमच्या त्वचेचे मॉईश्चर टिकवून ठेवतात ते फार महत्वाचे असतात. असे प्राईमर महागही असतात. त्यामुळे त्याला थोड्या कमी किंमतीचा पर्याय तुम्हाला वापरता येईल. 

उत्पादन (Product): Fenty Beauty Hydrating Primer: 4995 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): colourpop pretty hydrating primer: 1264 रुपये

ADVERTISEMENT

NARS Sheer Glow Foundation – Neutrogena Liquid Makeup Foundation

अनेकांना फाऊंडेशन हे फक्त फेस कव्हरेजसाठी नको असतात तर त्यांना आपला चेहरा त्याच फाऊंडेशच्या माध्यमातून ग्लो करायचा असतो. अशांसाठी ग्लो फाऊंडेशन फार महत्वाचे असते. फाऊंडेशनमध्ये जितके जास्त प्रकार तितके ते महाग पण त्यालाही काही पर्याय नक्कीच आहेत ते अगदी तसेच काम करतात. 

उत्पादन (Product): NARS Sheer Glow Foundation: 4648 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): Neutrogena healthy skin foundation: 2599 रुपये

Makeup For Ever HD Foundation – Maybelline New York Fit Me Matte Liquid Foundation

मेकअपसाठी फाऊंडेशन फार महत्वाचे असते. फाऊंडेशनचा बेस चांगला असेल तर मेकअप परफेक्ट बसतो. फाऊंडेशनची निवड त्याचा शेड, लाईटवेटपणा आणि फुलकव्हरेजवरुन केली जाते. फाऊंडेशनमध्ये अनेक महागडे प्रकार आहेत. पण महागड्या फाऊंडेशनला Maybelline fit me टक्कर देते. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत होते.

ADVERTISEMENT

उत्पादन (Product): Makeup For Ever HD Foundation: 4025 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): Maybelline fit me foundation: 299 रुपये

Benefit Blush In Galifornia – Wet n Wild Color Icon Blush

तुमचा मेकअपचा लुक पूर्ण करते ते म्हणजे ब्लश. गालाला ब्लश लावल्यानंतर तुमचा मेकअप लुक एकदम परफेक्ट दिसतो. अनेकांकडे ब्लशचे वेगवेगळे शेड असतात. पण जी प्रमाण शेड असते ती म्हणजे पिंक. बाजारात अनेक महागड्या ब्रँडचे ब्लश मिळतात. पण बजेटमध्ये येणारा wet and wild चा ब्लशही तितकाच चांगला आहे. 

उत्पादन (Product): Benefit Blush In Galifornia – 1530 रुपये

ADVERTISEMENT

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): wet n Wild Color Icon Blush – Pinch Me Pink: 399 रुपये

IT Cosmetic CC Cream – DREAM URBAN COVER FLAWLESS COVERAGE FOUNDATION

हल्ली फाऊंडेशनपेक्षाही जास्त पसंती ही CC क्रिमला दिली जाते. It cosmetic चे CC क्रिम उत्तम आहे. पण त्याच्या किंमतीमुळे अनेकांना कोणते क्रिम घ्यावे असा प्रश्न पडतो. पण तुम्हाला त्यापेक्षाही बजेटमध्ये काही हवं असेल तर तुम्ही maybelline चा पर्याय स्विकारु शकता. 

उत्पादन (Product): IT Cosmetic CC Cream: 5329 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe): DREAM URBAN COVER FLAWLESS COVERAGE FOUNDATION MAKEUP, SPF 50: 964 रुपये

ADVERTISEMENT

MAC Velvet Teddy Lipstick – NYX Professional Makeup Matte Lipstick

आपल्याकडे एखादी तरी MAC लिपस्टिक असावी असे आपल्याला वाटते. पण ती एकच लिपस्टिक तरी आपल्याला कशी पुरणार. दुसरी घ्यायची तर अनेकदा आपले बजेट कोलमडून जाते. अशावेळी तुम्ही NYX या कंपनीची ही सर्वोत्तम मॅट लिपस्टिक वापरु शकता.

उत्पादन (Product): MAC Velvet Teddy Lipstick: 1700 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe):NYX matte lipstick pale pink625 रुपये (यात तुम्हाला वेगळ्या शेड्सही मिळतील)

Natasha Denona Sunset – Colourpop Yes, Please! Eyeshadow Palette

आयशॅडो पॅलेट घेण्याचा विचार करणार असाल तर Natasha denona sunset palette हे त्यामध्ये सगळ्यात उत्तम पॅलेट आहे. अनेक मेकअप आर्टिस्ट हे पॅलेट खरेदी करतात याची किंमत इतकी आहे की, तुम्हाला रोजच्या वापरासाठी याचा उपयोग अजिबात होत नाही. पण अगदी त्याच पद्धतीचे रिफ्रेशिंग रंग तुम्हाला colourpop मध्ये मिळतात.

ADVERTISEMENT

उत्पादन (Product): Natasha Denona Sunset Palette: 29758 रुपये

बजेट फ्रेंडली पर्याय (Dupe):colourpop yes  please palette: 3178 रुपये 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. चांगले मेकअप Dupes कसे ओळखावे ?

मेकअप Dupes हे एखाद्या मेकअप प्रोडक्टचा पर्याय असतात. जर तुम्हाला असे पर्याया शोधायचे असतील तर तुम्ही काही वेबसाईटची मदत घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला महागड्या मेकअपला पर्याय सुचवला जातो. शिवाय हल्ली इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही तुम्हाला याची अगदी व्यवस्थित माहिती मिळू शकते. 

ADVERTISEMENT

2. असे मेकअप Dupes वापरणे सुरक्षित असते का?

हो अर्थात, मेकअपचे हे साहित्यही चांगल्या ब्रँडचेच असते. तुम्ही अगदी स्वस्त म्हणून माहीत नसलेला ब्रँड घेऊ नका. कारण त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण MyGlamm, Nykaa, Lakme, NYX असे काही ब्रँड आहेत ज्यांचा चाहता वर्ग आहे. आणि त्यांचे प्रोडक्टही चांगले आणि सुरक्षित आहेत. 

3. महागडे प्रोडक्ट या Dupes च्या तुलनेत चांगले असतात का? 

एखाद्या ब्रँडची एखादी वस्तू प्रसिद्ध असते ती नक्कीच त्याच्या काहीतरी विशेषत्वामुळे. जर तुम्हाला ते प्रोडक्ट वापरता आले तर फार उत्तम कारण तुम्हाला हवा असलेला लुक तुम्हाला नक्कीच त्याने मिळू शकतो. महागडे मेकअप प्रोडक्ट नक्कीच चांगले असू शकतात. पण त्याच्या Dupes खराब असतात असे आम्हाला मुळीच वाटत नाही. 

ADVERTISEMENT

आता बजेट फ्रेंडली मेकअपचे सामान घ्यायचे असेल तर आम्ही सांगितलेले Dupes नक्की घेऊन पाहा.

देखील वाचा:

नववधूचे रुप खुलवणाऱ्या एअरब्रश मेकअप (Airbrush Makeup) विषयी जाणून घ्या सर्व काही

26 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT