मेकअप आणि मेकअपचं साहित्य याविषयी प्रत्येकीलाच कुतूहल वाटत असतं. वास्तविक मेकअपचे ट्रेंड सतत बदलत असतात. स्टायलिश दिसण्यासाठी या ट्रेंडनुसार प्रत्येकीने स्वतःमध्ये हे बदल करायला हवे. सध्या लग्न समारंभात नवरीला एचडी, मिनरल, न्यूड आणि एअरब्रश मेकअप करण्याचा ट्रेंड आहे. जर तुमचंही लग्न ठरलं असेल आणि तुम्हाला या ट्रेंडविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी ही माहिती नक्कीच फायद्याची आहे. ब्रायडल मेकअपमध्ये ‘एअरब्रश मेकअप’ (Airbrush Makeup In Marathi) नववधुंमध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
एअर ब्रश मेकअप म्हणजे एअर ब्रशच्या मदतीने केलेला मेकअप. हा मेकअप करण्यासाठी रेग्युलर मेकअप ब्रश, ब्युटी ब्लेंडर अथवा हाताची बोटं वापरली जात नाहीत. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर एखाद्या स्प्रें पेटिंगप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर हा मेकअप स्प्रे केला जातो. एअरब्रश मेकअपचा सध्या ट्रेंड असला तरी याचे अनेक फायदे आणि काही तोटे मात्र नक्कीच आहेत. यासाठीच जाणून घ्या एअरब्रश मेकअपविषयी सारं काही.
विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड (Cruelty Free Makeup Brands In Marathi)
एअरब्रश मेकअप हा सध्या ट्रेंडमध्ये आहेच पण एवढंच नाही तर लग्न समारंभात नववधुने हा मेकअप करण्याचे अनेक फायदेदेखील आहेत.
मेकअप केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग,व्रण झाकले जातात. चेहऱ्याचा स्कीन टोन एकसमान होतो. एअरब्रश मेकअप जास्तीत जास्त कव्हरेजसाठी प्रसिद्ध आहे. सहाजिकच एअरब्रश मेकअपमुळे तुमच्या चेहऱ्यावरील नको असलेली कोणतीही गोष्ट सहज झाकून टाकली जाते. मेकअपच्या दुसऱ्या कोणत्याही पद्धतीमध्ये असा फायदा तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणूनच लग्न समारंभासाठी या मेकअपला जास्त मागणी आहे.
एअरब्रश मेकअप सेट होण्यासाठी इतर मेकअपपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो मात्र त्यामुळे तुम्हाला हा मेकअप जास्त काळ टिकवता येतो. एअरब्रश मेकअप कमीत कमी बारा तास खराब होत नाही. या मेकअपला टच-अपचीदेखील गरज लागत नाही. लग्न समारंभात बराच काळ चालणाऱ्या विधींसाठी हा मेकअप अगदी परफेक्ट आहे. कारण यामुळे सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत तुम्ही परफेक्ट दिसू शकता.
मेकअपनंतर तो पॅची दिसू नये अथवा फाउंडेशन गळू नये म्हणून तुमच्या त्वचेला सूट होईल असाच मेकअपचा प्रकार निवडणं फार गरजेचं आहे. एअर ब्रश मेकअपची खास गोष्ट हिच की हा मेकअप कोणत्याही त्वचेला सूट होतो. या मेकअपमुळे तुमच्या त्वचेवर मेकअपचा एक थर निर्माण होतो. ज्याचा तुमच्या त्वचेशी काहीच संबंध राहत नाही. सहाजिकच तुमची त्वचा तेलकट असो वा कोरडी त्यामुळे तुमच्या मेकअपवर काहीच परिणाम होत नाही.
एअर ब्रश मेकअपची खासियत ही की यामध्ये तुमच्या फाऊंडेशनपासून ते अगदी आयशॅडोपर्यंत सर्व मेकअप हा एअर ब्रशच्या टेकनिकने लावला जातो. त्यामुळे तुमचा मेकअप खराब होण्याची अथवा पसरण्याची मुळीच भिती नसते. तुमचे आयशॅडो, आयलायनर, फाऊंडेशन, हायलायटर आणि लिपस्टिक एकमेकांमध्ये मिसळले जात नाहीत.
वाचा - नॅचरल मेकअप लुक
लग्नसोहळा हा आयुष्यात एकदाच होतो. त्यामुळे या क्षणाचे फोटो तुमच्यासाठी खास असतात. एअरब्रश मेकअपमुळे तुमचे फोटो नक्कीच चांगले येऊ शकतात. कारण हा मेकअप स्क्रीनवर उठून दिसतो. मग तुम्ही सुर्यप्रकाशात असा अथवा चंद्राच्या प्रकाशात, फोटोग्राफीसाठी लागणाऱ्या अगदी प्रखर लाईट्समध्येही तुम्ही सुंदरच दिसता.
मेकअप म्हटला की फाऊंडेशन, कन्सीलरसाठी तुमची परफेक्ट स्कीन शेड सापडणं एक डोकंदुखीच असते. कारण जर परफेक्ट शेड नाही सापडली तर तुमचा लुक अतिशय खराब दिसू शकतो. जर तुमच्या बाबतही असं होत असेल तर तुम्ही एअरब्रश मेकअप नक्कीच ट्राय करायला हवा. कारण या मेकअपमध्ये मेकअप आर्टिस्टकडे सर्व शेडची भली मोठी लायब्ररीच असते. थोडक्यात एअपब्रश मेकअपमध्ये तुम्हाला तुमचा परफेक्ट स्कीन टोन नक्कीच सापडू शकतो. ज्यामुळे तुमचा लुक मेकअपमध्ये परफेक्ट दिसतो.
बऱ्याचदा मेकअप केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि व्रण झाकले जातात. मात्र जर तुमच्या चेहऱ्यावर फाईन लाईन्स आणि सुरकुत्या असतील तर त्या मात्र चेहऱ्यावर मेकअपमधूनही दिसत राहतात. एअरब्रश मेकअपमुळे तुम्हाला तात्पुरतं बोटोक्स केल्याप्रमाणे तुम्हाला वाटू शकतं. कारण एअर ब्रश मेकअपमुळे तुमच्या फाईन लाईन्स आणि सुरकुत्या पूर्ण झाकल्या जातात.
एअर ब्रश मेकअप वॉटरप्रूफ मेकअप आहे. ज्यामुळे तुम्ही थंडीत, उन्हाळ्यात कधीही लग्न करा तुमचा मेकअप घामामुळे उतरत नाही. शिवाय लग्न समारंभातील भावुक क्षणी तुमच्या डोळ्यातून पाणी आल्यावरही तो मुळीच खराब होत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमचा मेकअप तुम्ही स्वतः रिमूव्हरने काढून टाकत नाही तोपर्यंत तो तसाच राहतो.
एअरब्रश मेकअप लग्न समारंभासाठी उत्तम असला तरी तो एखाद्या तज्ञ म्हणजेच प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टकडूनच करून घ्यायला हवा. नाहीतर लुक चांगला दिसण्याऐवजी बिघडण्याची जास्त शक्यता आहे.
एअरब्रश मेकअप जरी वॉटरप्रूफ असला तरी तो पटकन काढता येतो. त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर घाम आल्यावर जर तुम्ही तो रुमालाने पुसला तर तुमचा मेकअप निघून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाम सॉफ्ट टिश्यूने टिपून घ्या. जर तो तुम्ही रुमालाने घासून पुसण्याचा प्रयत्न केला तर तुमचा मेकअप खराब होऊ शकतो.
एअरब्रश मेकअप ही एक अत्याधुनिक मेकअप पद्धती आहे. त्यामुळे तुमच्याकडे तो करण्याचे प्रोफेशनल ज्ञान असायला हवे. तुमच्याकडे जरी त्यासाठी लागणारे साहित्य असेल तरी ज्ञानाशिवाय तुम्ही तो करू शकत नाही. कारण तुमची छोटीशी चुकदेखील तुमचा मेकअप खराब करू शकते. म्हणूनच जर तुम्ही लग्नसमारंभासाठी हा मेकअप करणार असाल तर एखाद्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टकडूनदेखील त्याची ट्रायल जरूर घ्या.
एअरब्रश मेकअप हा मेकअपचा अत्याधुनिक प्रकार असल्यामुळे तो करणं थोडं खर्चिक नक्कीच आहे. कारण चांगल्या गोष्टींसाठी नेहमी भरपूर पैसे मोजावे लागतात. मेकअपच्या इतर प्रकारांपेक्षा हा मेकअपचा प्रकार नक्कीच महागडा आहे. त्यामुळे मेकअपचा निर्णय घेण्यापूर्वी तुमचं बजेट आधी ठरवा.
काही लोकांना मेकअप केल्यावरही आपला लुक नेहमीप्रमाणे अथवा नैसर्गिक दिसावा असं वाटत असतं. मात्र आधीच सांगितल्याप्रमाणे या मेकअपसाठी चेहऱ्यावर मेकअपचे अनेक थर लावले जातात. ज्यामुळे जर तुम्हाला नैसर्गिक लुक हवा असेल तर एअरब्रश मेकअप तुमच्यासाठी नाही हे आधीच ओळखा. कारण यामुळे एक कुत्रिम लुक तयार केला जातो जो कदाचित तुम्हाला आवडणार नाही.
एअरब्रश मेकअपमुळे तुमच्या चेहऱ्यावरील फाईन लाईन्स आणि सुरकुत्यादेखील झाकल्या जातात. मात्र लक्षात ठेवा तो सेट करण्यासाठी पुरेसा वेळ देणं फार गरजेचं आहे. जर तुमचा मेकअप व्यवस्थित सेट नाही झाला तर तो खराब दिसू शकतो. कारण या मेकअपसाठी चेहऱ्यावर मेकअपचे अनेक थर लावले जातात त्यामुळे तो पूर्ण सेट होणं गरजेचं आहे. शिवाय एकदा मेकअप केल्यावर तुमच्या मेकअप आर्टिस्ट शिवाय तो दुसरं कुणीच टच-अपने नीट करू शकत नाही. त्यामुळे तो सुरूवातीलाच नीट सेट होईल याची काळजी घ्या.
एअरब्रश मेकअपमध्ये त्वचेवर सिलिकॉन बेस थर लावले जातात. ज्यामुळे तो बराच काळ टिकतो. त्यामुळे मेकअप करताना तुमची काय गरज आहे हे ओळखा आणि त्यानुसार मेकअप करा. एअरब्रश मेकअप हा नवरीसाठी केला जातो. कारण लग्नविधींमध्ये तो बराच काळ टिकवता येतो.
एअर ब्रश मेकअप करण्यापूर्वी तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करून मॉश्चराईझ करायला हवी. कारण एअर ब्रश मेकअप करण्यापूर्वी तुमच्या त्वचेमधील सर्व मॉश्चराईझर त्वचेत पूर्णपणे मुरणं गरजेचं आहे.
नाही, कारण एअरब्रश मेकअपनंतर कोणत्याही टच-अपची गरज नसते. शिवाय मेकअपचे सर्व साहित्य या मेकअप टेक्निकमध्ये एअर ब्रशनेच लावावे लागते.
एअरब्रश मेकअपमुळे तुमच्या त्वचेचा टोन एकसमान दिसू लागेल. कारण एअरब्रश मेकअपमध्ये तुमच्या त्वचेवर मेकअपचा एकसमान लेअर लावला जातो. शिवाय या मेकअपमध्ये सर्व प्रकारच्या स्कीन टोनच्या शेडस उपलब्ध असतात. त्यामुळे तुमचा चेहरा सुंदर दिसू लागतो.
एअरब्रश मेकअप हा एक मेकअपचा अत्याधुनिक प्रकार आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला एखाद्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टची मदत घ्यावी लागेल. मेकअप आर्टिस्टच्या पोर्टफोलीओवरून तुम्हाला याची जाणिव होऊ शकते की या टेकनिकमध्ये मास्टर आहे की नाही.
एअरब्रश मेकअप करण्यापूर्वी तुम्ही त्याची ट्रायल घेणं फार गरजेचं आहे. पण हे सर्वस्वी तुमच्या मेकअप आर्टिस्टवर अवलंबून आहे. मेकअप आर्टिस्ट बऱ्याचदा तुमच्या अर्ध्या चेहऱ्यावर एअरब्रश मेकअप आणि अर्ध्या चेहऱ्यावर रेग्युलर मेकअप करून ट्रायल देतात. ज्यामुळे तुम्हाला दोन मेकअपमधील फरक समजू शकतो.
कोणत्याही मेकअपचा खर्च हा त्या मेकअप आर्टिस्टच्या अनुभव आणि कलागुणांवर अवलंबून असू शकतो. मात्र साधारणपणे तुम्हाला यासाठी रेग्युलर मेकअपपेक्षा आठ दहा हजार रुपये जास्त मोजावे लागू शकतात.
फोटोसौजन्य - इन्साग्राम
अधिक वाचा -
निरनिराळ्या फेस शेपसाठी ट्राय करा 'या' मेकअप टीप्स