मुंबईच्या मायानगरीत आल्यावर तुमच्या जिभेचे चोचले पूर्ण झाले नाहीत, असं शक्यच नाही. त्यातल्या त्यात दक्षिण मुंबई म्हटल्यावर तर मुंबईचं ग्लॅमरस रूपडं आपल्यासमोर येतंच. मुंबईतील स्ट्रीट फूड आणि खाऊगल्ल्या तर प्रसिद्ध आहेच. पण त्यासोबतच मुंबईत अनेक आलिशान आणि उत्तमोत्तम कूजीन्स सर्व्ह करणारी रेस्टॉरंट्सही आहेत. ज्यामध्ये दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू आणि पॉश परिसरातल्या हॉटेल्सचा समावेश आवर्जून होतो. दक्षिण मुंबईतील काही प्रसिद्ध आणि बेस्ट रेस्टॉरंट्स जिथे तुम्ही उपनगरातल्या रेस्टॉरंट्सचा कंटाळा आल्या असल्यास किंवा वर्षातून एखाद्या खास दिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तरी नक्कीच जाऊ शकता. चला तर मग नजर टाकूया दक्षिण मुंबईतल्या बेस्ट आणि प्रसिद्ध रेस्टॉरंट्सवर.
असिलो (सेंट रेजिस)
असिलो हे रूफटॉप रेस्टॉरंट असल्याने तुम्हाला येथून दक्षिण मुंबईचा नजारा दिसतो. अगदी बांद्रा सी लिंक ते महालक्ष्मी रेसकॉर्सपर्यंत मुंबईची स्कायलाईन तुम्हाला इथून दिसेल. इथे गेल्यावर मुंबईच्या धकाधकीतून तुम्हाला नक्कीच बाहेर पडल्यासारखं वाटेल. इथला मेन्यू हा मुख्यतः युरोपियन आहे. त्यामुळे तुम्हाला कुजिनचा एक वेगळा प्रकार येथे चाखता येईल. इथे बसण्यासाठी काही हाय टेबल्स आहेत तर काही सोफाज आहेत. एवढंच नाहीतर येथे प्रायव्हेट सेक्शनसुद्धा आहे जिथे तुम्हाला पार्टी किंवा खास रोमँटिक डीनर एन्जॉय करता येईल.
- पत्ता : द सेंट रेजिस, 40 वा मजला, फिनिक्स मिल्स, लोअर परेल, मुंबई
- वेळ : संध्याकाळी 5:30 ते रात्री 1:30
- दोघांसाठी अंदाजे खर्च : रूपये 5,000
- Zomato वरील रेटिंग : 4.2 / 5
पिझ्झा बाय द बे
पिझ्झा बाय द बे या नावावरूनच तुम्हाला या रेस्टॉरंटच्या लोकेशनचा अंदाज आला असेलच. मुंबईतील हे एक आयकॉनिक रेस्टॉरंट असून तुम्ही पाहताच त्याच्या प्रेमात पडाल. नावातच पिझ्झा असल्याने इथे प्रामुख्याने पिझ्झा चांगला मिळतो आणि खासकरून इटालियन पदार्थ तुम्हाला इथे चाखता येतील. ही जागा वीकेंडला संध्याकाळी मरीन ड्राईव्हला चक्कर मारल्यावर मित्रमैत्रिणींसोबत पिझ्झा आणि ड्रींक्स एन्जॉय करण्यासाठी बेस्ट आहे.
- पत्ता : 143, सूना महल, मरीन ड्राईव्ह, चर्चगेट, मुंबई.
- वेळ : सकाळी 7am ते रात्री 11:30pm
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹2,000
- Zomato वरील रेटिंग : 4.0 / 5
वाचा – मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
द टेबल
इथला अँबियन्स आणि डेकोर खूपच छान आहे. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला काँटिनेंटल आणि युरोपियन खाद्यपदार्थांची मेजवानी चाखता येईल. मुख्य म्हणजे इथे दुपारी आणि संध्याकाळी वेगवेगळा मेन्यू सर्व्ह केला जातो. या रेस्टॉरंटला मिळालेलं अजून एक विशेषण आहे इन्स्टावर्दी, म्हणजेच इन्स्टावर टाकण्यासाठी तुम्हाला इथे भरपूर फोटो काढता येतील.
- पत्ता : कल्पेसी ट्रस्ट बिल्डींग, हॉटेल सुबा पॅलेसजवळ, सीएस महर्षी मार्ग, कुलाबा, मुंबई.
- वेळ : दुपारी 12 ते 3:30 आणि संध्याकाळी 5:30 ते 1 am
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹4,000
- Zomato वरील रेटिंग : 4.1 / 5
बे-रूट कफ परेड
इथे तुम्हाला इजिप्त, तुर्की, लेबनॉन आणि ग्रीस येथील खाद्यपदार्थांची मेजवानी मिळेल. त्यामुळे जर तुम्ही बकलावा, पिटा ब्रेड, सॅलड, फलाफेल आणि चीजकेकसारखे पदार्थ खायचे असतील इथे नक्की भेट द्या. इथला अँबियन्ससुद्धा खास इजिप्शियन देशासारखा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी तिथेच असल्यासारखं वाटेल.
- पत्ता : मिनू मनोर बिल्डींग 7, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, बधवार पार्क, अपोलो बंदर, कफ परेड, मुंबई.
- वेळ : दुपारी 12 ते रात्री 1:30
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹3,000
- Zomato वरील रेटिंग : 4.7 / 5
टायगर
या रेस्टॉरंटमधील सीटींग आणि अँबियन्स फारच छान आहे. तसंच इथे लाईव्ह डीजेही असतो. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला थाय, एशियन आणि अमेरिकन खाद्यपदार्थ चाखता येतील. पॅलाडियममध्ये शॉपिंग आणि फेरफटका मारल्यावर तुम्ही इथे छान लंच किंवा डीनर करण्यासाठी जाऊ शकता.
- पत्ता : लेव्हल 1, पलॅडीयम मॉल, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई.
- वेळ : दुपारी 12 ते रात्री 1:00
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹2,000
- Zomato वरील रेटिंग: 4.4 / 5
वाचा – मुंबईतील बेस्ट साऊथ इंडियन रेस्टॉरंट
एअर (फोर सिझन्स)
एअर नावाप्रमाणेच हे एक रूफटॉप रेस्टॉरंट असून मुंबईतल्या बेस्ट रूफटॉप रेस्टॉरंट्समध्ये याचा समावेश होतो. इथून तुम्हाला मुंबईचं मनमोहक दृश्य पाहता येईल. साधारणतः रूफटॉप रेस्टॉरंट्सचा मेन्यू हा मोठा नसतो. पण एअर त्याला अपवाद आहे. कारण इथे तुम्हाला स्पॅनिश, इटालियन, युरोपियन, बार फूड, एशियन आणि काँटिनेंटल असे विविध कूझिन्स खाता येतील. हे तुमच्या खिश्यासाठी थोडं खर्चिक आहे. पण अशा अँँबियन्स अनुभव घेण्यासाठी एकदा तरी इथे भेट द्यायला हवीच.
- पत्ता : फोर सिझन्स हॉटेल, 1/136, ई मोजेस रोड, वरळी, मुंबई.
- वेळ : संध्याकाळी 5pm ते रात्री 1:30 am
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹4,500 for two people
- Zomato वरील रेटिंग : 4.1/5
लॉर्ड ऑफ द ड्रींक्स
वीकेंडला आऊटींगसाठी ही जागा परफेक्ट आहे. भरपूर लाईट्स आणि एकमद हॅपनिंग असं इकडचं इंटिरिअर आहे. तुम्ही जर बॉलीवूड फॅन असाल तर ही जागा तुम्हाला नक्कीच आवडेल. लॉर्ड ऑफ द ड्रींक्सला एशियातील लाँगेस्ट बार असं म्हटलं जातं. नावाप्रमाणेच इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ ड्रींक्स मिळतील. तसंच इथे तुम्हाला स्टार्टर्स, चायनीज, नॉर्थ इंडियन, इटालियन, युरोपियन आणि काँँटिनेंटल खाद्यपदार्थ चाखता येतील. मग वीकेंडला फ्रेंड्ससोबत चिल करण्याचा प्लॅन असल्यास ही जागा बेस्ट आहे.
- पत्ता : 3 रा मजला, ट्रेड व्ह्यू बिल्डींग, कमला मिल्स कपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई.
- वेळ : दुपारी 12 ते रात्री 1
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹2,100 ड्रींक्ससकट.
- Zomato वरील रेटिंग : 4.4 / 5
डोम (इंटरकाँटिनेंटल)
चर्चगेटहून क्वीन नेकलेसकडे जाताना तुम्ही अनेकदा हे हॉटेल पाहिलं असेल आणि मनातल्या मनात इथे जाण्याचं ठरवलंही असेल. मग हा मनातला प्लॅन नक्की पूर्ण करा. रोमँटिक डेट किंवा फॅमिलीसोबत डीनरसाठी ही परफेक्ट जागा आहे. हे रेस्टॉरंटसुद्धा रूफटॉप आहे. इथून तुम्हाला क्वीन्स नेकलेसचा सुंदर नजारा पाहत जेवणाचा आनंद घेता येईल. इथे तुम्हाला पॅन एशियन, सुशी म्हणजेच जॅपनीज, नॉर्थ इंडियन आणि फिंगर फूडची भरपूर व्हरायटी मिळेल. थोडंसं महाग असलं तरी एकदा येऊन नक्की अनुभवावं असं हे रेस्टॉरंट आहे.
- पत्ता : हॉटेल इंटरकाँटिनेंटल, 135, चर्चगेट, मुंबई.
- वेळ : संध्याकाळी 5 ते रात्री 1:30
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹3,500
- Zomato वरील रेटिंग : 4.2 /5
वाचा – मुंबईत हँगआऊटसाठी बेस्ट कॅफे, तुमचाही वेळ जाईल मस्त
१४५ द मिल
कमला मिल्समधल्या स्टायलिश रेस्टॉरंट्सपैकी हेही एक रेस्टॉरंट आहे. जिथे सगळं डेकोर लाकूड आणि आर्टवर्कने केलेलं आहे. इथे बसण्यासाठीही व्हरायटी ऑफ स्टाईल्स आहेत. तसंच इथल्या फूडमध्ये तुम्हाला मॉर्डन इंडियन आणि ग्लोबल फूड चाखता येईल. इथली कॅरमल पॉपकॉर्न मार्टिनी नक्की ट्राय करून पाहा. कमला मिल्समध्ये आल्यावर भरपूर ऑप्शन्सपैकी या रेस्टॉरंटला येऊन पाहा. तुमचा डिनर आणि आऊटिंग नक्कीच हॅपनिंग होईल.
- पत्ता : 145, काळा घोडा, फोर्ट, मुंबई.
- वेळ : दुपारी 12 ते रात्री 1:30am
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹1,500 अल्कोहोलसकट.
- Zomato वरील रेटिंग: 4.7 /5
अंग्रेजी ढाबा
इथे आल्यावर पहिल्यांदा तुमचं लक्ष जाईल ते झोपाळ्यांकडे. हो इथे बसण्यासाठी खास झोपाळे आहेत. इथला कलरफुल आणि वेर्स्टनाईज्ड ढाबा लुक तुम्हाला नक्कीच आवडेल. अग्रेंजी ढाबामध्ये तुम्हाला इंडियन, चायनीज, थाय, आणि युरोपियन अशा बऱ्याच व्हरायटी चाखायला मिळतील. इथले चॉकलेट गोलगप्पे विथ बासुंदी शॉट नक्की ट्राय करून पाहा.
- पत्ता : तोडी मिल कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई.
- वेळ : दुपारी 12 ते रात्री 12
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹1,500
- Zomato वरील रेटिंग : 4.4 / 5
कोयला
हे मुंबईतील एक आयकॉनिक रेस्टॉरंट असून इथे अनेक सेलिब्रिटीजही येत असतात. हे तब्बल 20 वर्ष जुनं म्हणजेच 2000 साली सुरू झालं होतं. तुम्ही जर तंदूरचे चाहते असाल तर इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ कबाब आणि मुघलई पदार्थ चाखता येतील. हे रेस्टॉरंटसुद्धा रुफटॉप आहे. शाकाहारींपेक्षा मासांहारींसाठी इथे जास्त पदार्थांची व्हरायटी असेल हे मात्र खरं आहे.
- पत्ता : गल्फ हॉटेलच्या वर, एचएनए आझमी मार्ग, कुलाबा, मुंबई.
- वेळ : संध्याकाळी 7 ते रात्री 1:30
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹2,000
- Zomato वरील रेटिंग : 3.8 / 5
चायना बिस्त्रो
चायना बिस्त्रो या नावाप्रमाणेच हे रेस्टॉरंट पॅन एशियन कुझिनसाठी प्रसिद्ध आहे. पॅन एशियन म्हणजेच इथे तुम्हाला थाय, चायनीज, जॅपनीज व्हिएतनामीज, कोरियन आणि इंडोनेशियन पदार्थ चाखता येतील. त्यांच्या मेन्यूमध्ये भरपूर व्हेज आणि जैन पर्यायसुद्धा आहेत. फॅमिलीसोबतच्या लंच किंवा डीनरसाठी ही परफेक्ट जागा आहे. जिथे तुम्हाला आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवता येईल.
- पत्ता : 26-30, 358, बिल्डींग 1, म्युनिसिपल टेनेमेंट्स, पूनम चेंबर्सजवळ, केएजी खान रोड, मुंबई.
- वेळ : दुपारी 12 ते 3:30 आणि संध्याकाळी 7 ते 11:30.
- दोघांसाठी अंदाजे खर्च : ₹1,900
- Zomato वरील रेटिंग : 4.2 / 5
मुंबईतल्या रेस्टॉरंट्सबाबत विचारले जाणारे काही प्रश्न (FAQs)
बऱ्याचदा तुमच्याही मनात रेस्टॉरंट्सबाबत हे प्रश्न येतात का, मग तुम्ही खालील माहिती नक्की वाचा.
दक्षिण मुंबईतील रेस्टॉरंट्समध्ये टेबल बुकिंग होतं का?
साधारणतः मुंबईतल्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये टेबल बुकिंग मिळतं. पण ते बरेचदा तुम्ही कोणत्या दिवशी रेस्टॉरंटला जात आहात त्यावरही अवलंबून असतं. कारण जर तुम्ही वीकेंडला आणि जास्त लोकांसोबत रेस्टॉरंटला जाणार असाल तर तुम्हाला टेबल बुकिंग मिळणं थोडं अवघड असतं. त्यामुळे जर तुमचा वीकेंडला असा काही प्लॅन असल्यास दोन तीन रेस्टॉरंट्स शॉर्ट लिस्ट करून मग टेबल बुकिंग करा.
दक्षिण मुंबईत पेट फ्रेंडली म्हणजे पाळीव प्राण्यांना प्रवेश असणारी हॉटेल्स आहेत का?
मुंबईतल्या या भागात बरीच पाळीव प्राण्यांना प्रवेश असणारी हॉटेल्स आहेत. तुम्हाला याबाबतची माहिती ऑनलाईन त्या हॉटेलच्या पेजवर किंवा तुम्ही फोन करून याबाबत आधीच जाणूनही घेऊ शकता. उलट मुंबईत अनेक पेट कॅफेजही आहेत.
दक्षिण मुंबईतली रेस्टॉरंट्स बजेट फ्रेंडली आहेत का?
इथली बरीच रेस्टॉरंट्स महागडी असली तरी काही रेस्टॉरंट्स मात्र बजेट फ्रेंडलीही आहेत. त्यामुळे सर्वच रेस्टॉरंट्स महाग आहेत असं काही नाही.
या रेस्टॉरंट्मध्ये सर्व्हिस आणि अँबियन्स कसा असतो?
येथील प्रत्येक रेस्टॉरंट्सची आपापली खासियत आहे. इथे तुम्हाला चांगली सर्व्हिस तर मिळेलच. पण थीम आणि मेन्यूमध्येही भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल. तसंच इथे वर्षभर सिझननुसार विविध फूड फेस्टिव्हल्सही सुरू असतात. ज्यामध्ये तुम्ही विविध पदार्थांच्या आस्वाद घेऊ शकता.
You Might Like This:
मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या