ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
या पोझिशनमध्ये झोपण्यामुळे मासिक पाळीच्या वेदना होतील कमी

या पोझिशनमध्ये झोपण्यामुळे मासिक पाळीच्या वेदना होतील कमी

मासिक पाळी ही स्त्रीच्या आयुष्यातील जरी एक महत्त्वाची शारीरिक क्रिया असली तरी त्यामुळे होणाऱ्या वेदना फारच त्रासदायक असतात. अर्थात प्रत्येकीला महिन्यातून एकदा काही दिवस हा त्रास सहन करावाच लागतो. मासिळ पाळी सुरू होताना अचानक पोटात दुखू लागतं, कंबरेतून कळा येतात, पाय जड होतात तर कधी कधी चक्कर आणि मळमळही जाणवते. प्रत्येकीचा मासिक पाळीतील त्रास निरनिराळा असला तरी चार दिवस यामुळे महिलांना खूपच थकायला होतं. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे हा त्रास जाणवत असल्यामुळे यासाठी प्रत्येकवेळी पेनकिलर घेणं योग्य नाही. बऱ्याचदा मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात.  अशा वेळी फक्त तुमच्या झोपेची स्थिती अर्थात पोझिशन बदलूनही आराम मिळवू शकता. यासाठी जाणून घ्या मासिक पाळीच्या काळात स्त्रीने कसं झोपावं

मासिक पाळीत महिलांनी या पोझिशमध्ये झोपावे –

झोप ही एक अशी एक गोष्ट आहे की ज्यामुळे तुमच्या शरीर आणि मन दोघांनाही आराम मिळतो. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग ठरू शकतो. 

गुडघ्याखाली उशी ठेवा –

बऱ्याचजणांना पायाखाली अथवा गुडघ्याखाली उशी घेऊन झोपण्याची सवय असते. मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी ही स्लिपिंग पोझिशन अतिशय उत्तम आहे. यासाठी तुमच्या घरातील एखाद्या गोलाकार उशीचा वापर करा. सर्वात आधी पाठीवर झोपा आणि गुडघ्याखाली उशी ठेवा. मात्र लक्षात ठेवा या पोझिशनमध्ये तुमचे पाय सरळ असायला हवेत. पाय गुडघ्यात दुमडू नका. शिवाय उशीचा आकार इतकाच असावा ज्यामुळे पाय गादीपासून थोडेच वर उचलले जातील. पाय फार उंचावर असू नयेत. कारण असं झाल्यास तुमचे रक्ताभिसरण व्यवस्थित होणार नाही. जर तुमच्याजवळ गोलाकार उशी नसेल तर तुम्ही एखादा जाड टॉवेल गुंडाळून गुडघ्याखाली ठेवू शकता. असं केल्यामुळे तुमच्या मांड्याकडील स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.

shutterstock

ADVERTISEMENT

पाय पोटात दुमडून झोपा –

मासिक पाळीत जाणवणारी पोटदुखी यामुळे कमी होते. या पोझिशनला फेटल पोझिशन असं म्हणतात. कारण यामध्ये तुमच्या शरीराची स्थिती पोटातील गर्भाप्रमाणे असते. असं झोपल्यामुळे तुमच्या पोटाकडील स्नायू ताणले जातात आणि त्यांच्यावर चांगला ताण येतो. स्नायूंना आराम मिळाल्यामुळे तुमची पोटदुखी आणि पोटात येणारा गोळा कमी होतो. शिवाय अशा पोझिशनमध्ये झोपल्यामुळे मासिक पाळीत पॅडमधून लिकेज होण्याची शक्यताही कमी होते. ज्यांना या काळात अती रक्तस्त्राव होतो अशा महिलांसाठी ही एक बेस्ट पोझिशन आहे. 

pixels

पोटावर उपडी झोपा अथवा चाईल्ड पोझिशन-

नेहमी पोटावर झोपणं जरी आरोग्यासाठी योग्य नसलं तरी मासिक पाळीत असं झोपल्यामुळे तुम्हाला काही काळ आराम मिळू शकतो. जेव्हा  तुम्हाला मासिक पाळीच्या वेदना सुरू होतील तेव्हा काही काळासाठी तुम्ही या पोझिशनमध्ये झोपू शकता. ज्यामुळे तुमच्या पोटाच्या स्नायूंवर चांगला ताण येईल आणि पोटाला आराम मिळेल. मासिक पाळीमुळे अचानक सुरू झालेल्या वेदना या स्थितीत झोपल्यामुळे काही काळासाठी बंद होतील. असं झोपणं शक्य नसेल तर तुम्ही चाईल्ड पोझिशनमध्ये झोपू शकता. यासाठी तुम्हाला पाय गुडघ्यात दुमडून गुडघ्याच्यावर डोके टेकवून झोपाव लागेल. पोटदुखी, डोकेदुखी कमी करण्याचा हा एक नैसर्गिक उपाय आहे. कारण या पोझिशनमध्ये तुमच्या शरीरातील सर्व अवयवांना चांगला आराम मिळतो आणि तुम्हाला शांत झोप लागते. 

pixels

ADVERTISEMENT

या पोझिशनमध्ये झोपण्यापूर्वी पोटाला तेलाने मालिश करा,  कोमट पाण्याने अंघोळ करा, गरम  पाण्याचा पिशवीने पोट आणि कंबर शेकवा आणि थोडा आल्याचा चहा घ्या. ज्यामुळे तुम्हाला लवकर बरं वाटेल. जर दर महिन्याला मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्याच लागणार आहेत. तर त्यासाठी नैसर्गिक उपाय करून शरीराला तयार करणं नेहमीच योग्य ठरेल. शिवाय विनाकारण सतत पेनकिलर घेण्याची सवय तुम्हाला कमी करता येईल. 

फोटोसौजन्य  – शटरस्टॉक आणि पिक्सेल्स

23 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT