आपलं नाव हिच आपली आयुष्यात खरी ओळख असते. कारण त्या नावामुळेच आयुष्यभर जगात आपलं स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण होत असतं. लोक तुमचा चेहरा आणि नाव लक्षात ठेवतात आणि तुम्हाला ओळखतात. यासाठीच बाळाच्या जन्मानंतर बारव्या दिवशी खास नामकरण विधी केला जातो. नामकरण विधीसाठी Namkaran Invitation Message In Marathi | बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज खास पाहुण्यांना आमंत्रण दिलं जातं. नामकरण विधी म्हणजे बारशात नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या साक्षीने बाळाला एक साजेसं नाव दिलं जातं. त्याआधी बाळाच्या जन्मतारिख आणि जन्मवेळेनुसार जन्मपत्रिका तयार केली जाते. या जन्मपत्रिकेत बाळासाठी अनुरूप अशी काही आज्ञाक्षरे सूचवली जातात. बाळासाठी नावराशीमध्ये आलेल्या अक्षरावरून बाळाला नाव देणं हे शुभ मानलं जातं. हिंदु संस्कृतीमध्ये नावाच्या पहिल्या अक्षराचा जीवनावर प्रभाव पडतो अशी मान्यता आहे. एवढंच नाही तर या अक्षरांवरून बाळाचे भविष्यदेखील सांगण्यात येते. यासाठीच हिंदु संस्कृतीमध्ये बाळाचं नाव त्याच्या नावराशीवरून ठेवण्याची पद्धत आहे. बाळाच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा शिक्षण, यश, समृद्धी, नोकरी, प्रेम आणि वैवाहिक जीवनावर प्रभाव पडतो असा समज आहे. त्यामुळे बाळाचं पाळण्यातील नाव हे नेहमी नावराशीवरून ठेवलं जातं. तुमचा या मान्यतेवर विश्वास असेल आणि तुम्हाला तुमच्या बाळाला नावराशीवरून नाव द्यायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. तुमच्या तान्हुलीचं नावराशी आज्ञाक्षर ‘भ’ आलं असेल तर निवडा तुमच्या राजकन्येसाठी खास भ वरून मुलींची नावे (Bha Varun Mulinchi Nave)
Table of Contents
भ वरून मुलींची नावे | Bha Varun Mulinchi Nave Marathi
आम्ही तुमच्या लेकीसाठी खास भ वरून मुलींची नावे निवडली आहेत. या लिस्टमध्ये नावासह त्याचे अर्थदेखील दिलेले आहेत. ज्यावरून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी एक परफेक्ट नाव शोधणं नक्कीच सोपं जाईल.
भ वरून मुलींची नावे | नावाचा अर्थ |
भक्ती | श्रद्धा |
भक्तिप्रिया | देवीचे नाव |
भगेश्री | देवीचे नाव |
भावना | मनातील कामना |
भक्तीज | श्रद्धेतून निर्माण झालेली |
भगवती | देवीचे नाव |
भागिरथी | नदीचे नाव |
भगवंती | नशीबवान |
भद्रा | निर्मळ |
भ्रदिका | देवीचे नाव |
भद्रकाली | देवीचे नाव |
भद्रावती | शांत स्वभावाची स्त्री |
भद्रवती | शांत स्वभावाची स्त्री |
भ्रामरी | प्रदक्षिणा |
भद्रवती | शांत स्वभावची स्त्री |
भद्रशील | चांगले चारित्र्य असलेली |
भद्रबाला | उत्तम मुलगी |
भद्रप्रिया | देवीचे नाव |
भद्ररुपा | देवीचे नाव |
भद्रश्री | चंदनाचे लाकूड |
भरणी | एक नक्षत्र |
भगिरथी | एक नदीचे नाव |
भूषणी | गौरवास्पद महिला |
भ्रमरी | भुंगा |
भ्रमणी | फिरणारी |
भ्रामरी | सगळीकडे नाचणारी |
भैरवी | गाण्याचा एक प्रकार |
भुपाळी | गाण्याचा एक प्रकार |
भूषणा | दागिने |
वाचा – ल वरून मुलींची नावे
भ वरून मुलींची नावे 2022 | Bha Varun Mulinchi Nave Marathi 2022
घरात मुलीचा जन्म होणं ही भाग्याची गोष्ट समजली जाते. यासाठीच मुलीची नावं नेहमी सकारात्मक आणि समृद्धीचं प्रतिक असलेली निवडण्यात येतात. या वर्षी तुमच्या घरी कन्यारत्न प्राप्त झालं असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या लेकीसाठी लकी ठरावं यासाठी भ वरून मुलींची नावे (Bha Varun Mulinchi Nave).
भ वरून मुलींची नावे | नावाचा अर्थ |
भुवनेश्वरी | देवीचे नाव |
भग्निमा | कलापूर्ण मुद्रा |
भुवना | देवीचे नाव |
भुवनसुंदरी | देवीचे नाव |
भुवनमोहिनी | देवीचे नाव |
भीमा | नदीचे नाव |
भीमरा | सुंदर स्त्री |
भाविका | श्रद्धावान |
भावनिती | भावनाप्रधान |
भावूका | भावनाप्रधान |
भास्वती | देवीचे नाव |
भिमीका | भयानक |
भीनी | हळूवार |
भाविनी | भावनाप्रधान |
भारती | भाषा |
भाषा | वाणी |
भाषिणी | बोलणारी |
भारवी | भाषा |
भार्गवी | देवीचे नाव |
भवानी | देवीचे नाव |
यासोबतच वाचा ‘थ’ वरून मुलींची नावे, युनिक आणि अर्थपूर्ण (Baby Girl Names Start With Th)
भ वरून मुलींची मॉर्डन नावे | Modern Bha Varun Mulinchi Nave
आजकाल आईवडिलांना मुलामुलींची नावे ही मॉर्डन हवी असतात. मात्र असं असलं तरी त्या नावांना चांगला अर्थ असावा आणि ते नाव आपल्या मुलीसाठी लकी ठरावं असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी खास तुमच्या लेकीसाठी भ वरून मुलींची मॉर्डन नावे (Modern Bha Varun Mulinchi Nave)
भ वरून मुलींची मॉर्डन नावे | नावाचा अर्थ |
भाविशा | भावनाप्रधान |
भन्वरी | विचारपूर्वक केलेला व्यवहार |
भरणी | पूर्ण |
भाग्या | नशीबवान |
भाग्यशाली | नशीबवान |
भाग्यलक्ष्मी | नशीबवान |
भाग्यरेखा | नशीबाची रेघ |
भाग्यवती | नशीबवान |
भाग्यश्री | नशीबवान |
भाग्येश्वरी | नशीबवान |
भाग्योदया | नशीबवान |
भानूप्रिया | सूर्याला प्रिय असणारी |
भानू | सूर्यासारखी तेजस्वी |
भानुजा | सूर्यापासून निर्माण झालेली |
भानुमती | तल्लख बुद्धी असलेली |
भानुमयी | सूर्यासारखी |
भानुप्रभा | सूर्याचे किरण |
भास्करी | सूर्यासारखी दिसणारी |
भानुश्री | सूर्यासारखी दिसणारी, तेजस्वी |
भानवी | सूर्याप्रमाणे दिसणारी |
भामा | सुंदर स्त्री |
भामिनी | सुंदर स्त्री |
भंदाना | कौतुक |
भुमायी | पृथ्वीपासून निर्माण झालेली |
भुवा | पृथ्वी |
भुवि | स्वर्ग |
भुविका | स्वर्ग |
भूति | अस्तित्त्व |
भूमा | पृथ्वी |
भूमि | पृथ्वी |
भूमिका | पात्र |
भूमिलता | औषधी वेल |
भौमिका | पृथ्वीची राणी |
खास तुमच्यासाठी,
त वरून मुलींची नावे | T Varun Mulinchi Nave Marathi
क वरून मुलींची आकर्षक नावे
भ वरून मुलींची युनिक नावे मराठी | Unique Bha Varun Mulinchi Nave Marathi
बाळाच्या बारशाआधी बाळासाठी नेहमी चांगला अर्थ असलेली आणि युनिक नावे शोधली जातात. तुमच्या लेकीसाठी आम्ही काही युनिक नावे सूचवत आहोत. तेव्हा तुमच्या मुलींच्या नामकरणासाठी निवडा भ वरून मुलींची युनिक नावे मराठी (Unique Bha Varun Mulinchi Nave Marathi)
भ वरून मुलींची नावे | नावाचा अर्थ |
भरवा | सुंदर नाद |
भाश्विनी | देवीचे नाव |
भाश्विका | देवीचे नाव |
भरावी | तेजस्वी,सूर्यासारखी |
भार्वी | तूळस |
भल्ली | छोटा बाण |
भवनिका | महालात राहणारी |
भवन्ति | सुंदर |
भवानिका | देवीचे नाव |
भवान्य | एकाग्रता |
भविष्या | नशीब |
भवकिर्ती | किर्तीवान |
भस्मा | हास्य |
भागवती | ज्ञानी |
भागवन्ती | नशीबवान |
भाग्यवती | नशीबवान |
भाग्यवि | शरीरातील |
भाद्रमुखी | सुंदर |
भाद्रवाल्ली | सुंदर वेल |
भाद्रसोमा | चंद्राप्रमाणे सुंदर |
भाद्रस्वप्ना | सुंदर स्वप्न |
भारू | वजनदार |
भालेश्वरी | देवीचे नाव |
भाविकी | नैसर्गिक |
भावी | भविष्य |
भाव्या | शानदार |
भासी | भ्रम |
भावज्ञा | देवीचे नाव |
भौमी | सीता |
‘श’ वरून मुलींची नावे, साजेशी आणि अर्थपूर्ण (Sha Varun Mulinchi Nave In Marathi)
आम्ही तुमच्या लेकीसाठी सूचवलेली भ वरून मुलींची नावे (Bha Varun Mulinchi Nave) तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या तान्हुलीसाठी कोणतं नाव निवडलं हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.