ADVERTISEMENT
home / xSEO
la varun mulinchi nave

ल वरून मुलींची नावे | La Varun Mulinchi Nave Marathi

एखाद्या जोडप्याला जेव्हा कळते की ते आई-बाबा होणार आहेत किंवा एखादे जोडपे जेव्हा छोट्याश्या नाजूक जीवाला आपल्या आयुष्यात आणायचे ठरवतात त्या क्षणापासूनच आईबाबांची आपल्या बाळासाठी रोज नवी स्वप्ने बघण्याची सुरुवात होते. आणि या सगळ्याची सुरुवात बाळाचे नाव काय ठेवायचे इथपासून होते. आज आम्हीही तुमच्या आनंदात सहभागी होऊन तुमच्या बाळासाठी काही नावे सुचवतोय. तुमच्या लेकीचे आद्याक्षर जर ‘ल’ आले असेल तर या लेखात दिलेल्या लिस्ट मधून तुम्ही एखादे सुंदर नाव निवडू शकता. खाली ल वरून मुलींची नावे (La Varun Mulinchi Nave), ल वरून मुलींची ट्रेंडिंग नावे (L Varun Mulinchi Trending Nave) तसेच काही हटके नाव हवे असल्यास ल वरून मुलींची युनिक नावे (Unique L Varun Mulinchi Nave Marathi) सुद्धा दिलेली आहेत. 

ल वरून मुलींची नावे | La Varun Mulinchi Nave

आई-बाबा आपल्या बाळासाठी नाव ठरवायचे म्हटल्यावर पुस्तकं , इंटरनेट साईट्स यावर नावं शोधतात. काहींना आपल्या बाळाला सुंदर पौराणिक अर्थपूर्ण देवांची नावे ठेवायची इच्छा असते. तुमच्या घरात जर  लक्ष्मीचे आगमन झाले असेल आणि  तुमच्या छोट्याश्या बाहुलीसाठी तुम्हाला ‘ल’ अक्षरावरून नाव निवडायचे असेल तर खाली ‘ल वरून मुलींची नावे’ (La Varun Mulinchi Nave) खास तुमच्यासाठी शॉर्टलिस्ट केलेली आहेत.  यातील एखादे नाव तुम्हाला तुमच्या परी साठी नक्कीच आवडेल. तुम्हाला नाव निवडण्यासाठी सोपे जावे म्हणून नावाबरोबरच त्याचा अर्थ देखील दिला आहे म्हणजे तुम्हाला सुंदर अर्थाचे नाव तुमच्या लाडक्या लेकीसाठी निवडता येईल. 

ल वरून मुलींची नावे
ल वरून मुलींची नावे
नाव नावाचा अर्थ 
लज्जा लाजणे 
लघिमा अष्टसिद्धींपैकी एक सिद्धी 
लाजवंती लाजाळू 
लक्ष्मी सुख समृद्धी व ऐश्वर्याची देवता, विष्णुपत्नी 
लक्ष्मीप्रिया लक्ष्मीदेवीची लाडकी 
ललना सुंदर स्त्री 
लालसा इच्छा 
लता नाजूक वेल 
लतिका वेल, देवीचे एक नाव 
लतांगी वेलीसारखे अंग असलेली 
ललितागौरी पार्वतीचे एक नाव 
लक्ष्मीश्री देवी लक्ष्मी 
लक्ष्मणा एका ऋषीकन्येचे नाव 
लालन कौतुक 
लावण्यवती अलौकिक सौंदर्य असलेली 
लावण्यप्रभा सुंदरी 
लीला क्रीडा 
लुब्धा लुब्ध असलेली 
लक्ष्या शुभ्र रंगाचा गुलाब 
लक्षिता अद्वितीय 
La Varun Mulinchi Nave

वाचा – क वरून मुलींची सुंदर नावे

लेकीचा जन्म म्हणजे आईवडिलांसाठी एक इमोशनल अनुभव असतो. वडिलांसाठी तर लेक म्हणजे त्यांचा अभिमान असते, त्यांच्या आयुष्यातील , मनातील एक अत्यंत हळवा कोपरा असतो. इतरांसाठी कितीही कठोर आणि गंभीर असलेले बाबा लेकीसाठी मात्र सायीहून मऊ असतात. अश्या बाबांसाठी लाडक्या लेकीसाठी नाव निवडणे म्हणजे एक सुंदर अनुभव असतो. या लेखात ल अक्षरावरून मुलींची प्रसिद्ध नावे तसेच ल वरून मुलींची नावे नवीन (Popular La Varun Mulinchi Nave) दिलेली आहेत. बघा तुम्हाला कुठले नाव आवडतेय! तुम्हाला देवाने जुळ्या बाळांच्या रूपात दुप्पट आनंद दिला असेल तर त्यांच्यासाठीही तुम्हाला जुळ्या बाळांची मॅचिंग नावे यातून शोधून काढता येतील.

ADVERTISEMENT
नाव    नावाचा अर्थ  
लावण्या  सुंदर  
लाब्धी  स्वर्गीय शक्ती  
लाभा  प्राप्ती  
लालित्या  सुंदर  
लाकिनी  दैवी, दान देणारी देवी  
लालिमा  सुंदर, लाल रंगाचा प्रकाश  
लास्या देवी पार्वतीचे नृत्य  
लास्यावी ललिता देवीचे सुहास्य  
लवंगलता  नाजूक फुलांची वेल  
लयना  समर्पित  
लव्हलीन  प्रेमात लीन  
लूनी  राजस्थानातील एका पवित्र नदीचे नाव  
लूनशा  फुलांचे सौंदर्य  
लुम्बिनी  गौतम बुद्धांचे जन्मस्थान  
लुम्बिका  एक वाद्य  
लुकेश्वरी  एक सम्राज्ञी  
लौक्या  देवी लक्ष्मीचे नाव  
लोपामुद्रा  अगस्त्य ऋषींची पत्नी  
लोकेश्वरी  सर्व जगाची सम्राज्ञी  
लोना  सौंदर्य  
लोलिता  माणिक  
लोला  वीज  
लोहिता  लाल  
लीना समर्पित 
लिली एक सुंदर फूल
ललिता त्रिपुरसुंदरी देवीचे एक नाव 
लीलावती दुर्गा देवीचे एक नाव 
लेखावीज, क्षितिज, रेखा 
ल वरून मुलींची नावे नवीन

ल वरून मुलींची युनिक नावे | Unique L Varun Mulinchi Nave Marathi

आपले नाव हे आपल्या व्यक्तिमत्वाचा तसेच आपल्या ओळखीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असते. आपल्या नावाचे आपल्या आयुष्याशी अत्यंत खोलवर रुजलेले वैयक्तिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि ऐतिहासिक कनेक्शन असते.  आपल्याला आपण कोण आहोत, कुठल्या समुदायाचे आहोत, समाजात -जगात आपले काय स्थान आहे याची जाणीव आपले नाव स्वतःला व इतरांनाही करून देते. म्हणूनच आपले नाव आपल्याला अत्यंत प्रिय असते व आपल्या लाडक्या बाळांची देखील नावे आपण खूप विचार करून ठेवतो. पॉप्युलर नावे तर आपल्याला बरीच सापडतात. पण आपल्याला एखादे हटके नाव हवे असते. इथे ‘ल वरून मुलींची युनिक नावे’ (Unique L Varun Mulinchi Nave Marathi) दिलेली आहेत. यातले एखादे नाव तुमच्या लाडक्या राणीला नक्कीच शोभेल. 

नाव     नावाचा अर्थ  
लक्षिका सन्मानित . यशस्वी 
लक्ष्मीप्रसन्ना जिच्यावर लक्ष्मीदेवी प्रसन्न आहे 
लक्ष्मीचैतन्या दिव्य प्रभा 
लक्ष्मीदीप्ती दिव्य प्रकाश 
लीपीस्क्रिप्ट 
लोचना चांगले डोळे असलेली 
लाजरी लाजाळू 
लाजिता शांत, लाजणारी 
लमीसा नुकतेच उमललेले फूल , कोमल 
लारिका सुंदर 
लामिता वेल 
लवंगी लवंगीचे झाड 
लविना सुंदर 
लहरीका सागराच्या लाटा 
लायला एक अरेबिक नाव – वाईन / रात्र 
ल वरून मुलींची युनिक नावे

पूर्वी ल अक्षर आले की मुलींची नावे लक्ष्मी, लावण्या, लोपामुद्रा वगैरे अशी भारदस्त असत. त्याकाळच्या ट्रेंडप्रमाणे ही नावे मुलींना शोभूनही दिसायची. लक्ष्मी नावाची मुलगी छान नऊवारी किंवा पाचवारी साडी नेसून, केसांचा शेपटा किंवा खोपा घालून ,दागदागिने घालून हौसेने मिरवायची. पण आताच्या ट्रेंडप्रमाणे आपल्याला थोडीशी वेगळी नावे ठेवायची इच्छा असते. म्हणूनच इथे ल अक्षरावरून मुलींची ट्रेंडिग नावे (L Varun Mulinchi Trending Nave) दिली आहेत. एकविसाव्या शतकात जन्म घेतलेल्या तुमच्या ‘जनरेशन झी’ लेकीसाठी ही खास ट्रेंडिंग नावे- 

Trending L Varun Mulinchi Nave
Trending L Varun Mulinchi Nave
नाव     नावाचा अर्थ  
लिझा आनंद 
लुमा सूर्यास्त 
लोलाक्षी श्रीगणेशाची एक शक्ती 
लेकिशा आयुष्य 
लिपिका अक्षरे 
लुनाशा फुलांचे सौंदर्य 
लिया सुंदर , बुद्धिमान 
लाली लाजणारी 
लाना आकर्षक 
लसीका देवी सीता 
लिसा देवाला वाहून घेतलेली 
लुसिया प्रकाश 
लॉरेना अनेक मुकुटे परिधान केलेली 
लेक्सी ग्रीक नाव – रक्षण करणारी 
लेस्ली स्कॉटिश नाव – फुलांची बाग 
लिव्ह  (Liv)स्कँडिनेव्हियन नाव – आयुष्य 
लायरा संगीत 
लारा लॅटिन नाव – अप्सरेचं नाव 
लोला (Lola) स्ट्रॉंग स्त्री 
लिव्हीया ऑलिव्हिया नावाचा शॉर्ट फॉर्म 
लुना लॅटिन नाव – चंद्र 
लॉरा लॅटिन नाव – विजयश्री 
लियाना लॅटिन नाव – तारुण्य 
लिलियाना लॅटिन नाव- लिलीचे फूल 
लिंडा स्पॅनिश नाव – सुंदर 
Trending L Varun Mulinchi Nave

असे म्हणतात की ज्यांचे नाव ल अक्षरापासून सुरु होते त्या व्यक्ती उत्साही असतात आणि प्रभावशाली असतात. त्यांचे मन खूप मोठे असते आणि त्या व्यक्ती प्रेमळ असतात. तुमच्या बाळासाठी जर ल हे आद्याक्षर आले असेल तर वर दिलेल्या नावांपैकी काही नावे तुम्ही नक्कीच शॉर्टलिस्ट करू शकता. 

अधिक वाचा – श अक्षरावरून मुलांची नावे

ADVERTISEMENT
15 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT