ADVERTISEMENT
home / बिग बॉस
bigg boss 15

Bigg Boss 15: अनुषाच्या येण्याने करणला बसणार झटका की राकेशच्या येण्याने शमिता होणार आनंदी

बिग बॉसचा 15 वा सीझन (Bigg Boss 15) पहिल्या दिवसापासून गाजत आहे. पहिल्या दिवसापासूनच करण कुंद्राने (karan kundrra) सर्व प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. आपल्या वनलाईनर आणि करणनीती (karanniti) मुळे करण या शो चा विजेता होऊ शकतो असा अंदाज आता अनेकांनी दुसऱ्याच आठवड्यात लावायला सुरूवात केली आहे. याआधीच्या बिग बॉस सीझन्सच्या तुलनेमध्ये या हंगामात सर्वच बाबतीत हा शो पुढे गेला आहे. रोमान्स असो अथवा मारामारी असो अथवा शिव्या असोत सगळ्याच बाबतीत या शो मध्ये स्पर्धकांमध्ये घमासान चालू असलेले दिसून येत आहे. त्यामुळे टीआरपीच्या (TRP) रेसमध्ये पहिल्या 10 मध्ये या शो ने स्थान मिळवले आहे. तर आता या सीझनमध्ये अधिक मसाला देण्यासाठी निर्मातेदेखील मागे हटलेले नाहीत. वाईल्ड कार्ड एन्ट्री (Bigg Boss Wild Card Entry) मध्ये अशा काही व्यक्तींना आणण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून समीकरणं बदलतील. 

अधिक वाचा – Bigg Boss 15: या सीझनमध्ये मास्टरमाईंड ठरतोय करण कुंद्रा

अनुषा दांडेकर आणि राकेश बापट येण्याची शक्यता

करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) आणि शमिता सध्या ज्या राकेश बापटच्या (Raqesh Bapat) प्रेमात आहे या दोघांना वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरात आणण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न सुरू आहे.  सध्या या दोन नावांची जबरदस्त चर्चा होत आहे. या सीझनमध्ये अनुषाचे नाव पहिल्यापासून घेतले जात आहे. मात्र अनुषाने या शो मध्ये येण्यासाठी नकार दिला असल्याचे स्पष्ट केले होते. सुत्रानुसार सलमान खानच्या (Salman Khan) या विवादित शो मध्ये अनुषाला येण्यासाठी मोठी रक्कम ऑफर करण्यात आली आहे. अनुषा आणि करण सहा वर्षांच्या नात्यानंतर वेगळे झाले असून अनुषाने करणवर अनेक आरोप लावले होते. तर करणने यावर काहीही न बोलणेच अधिक पसंत केले होते. त्यामुळे आता अनुषा येणार की नाही याची उत्सुकता बिग बॉसच्या चाहत्यांना लागली आहे. पण करण कोणत्याही परिस्थितीसाठी मानसिक तयारी करूनच आला आहे. अनुषा या शो मध्ये आली तरीही त्याला काहीही फरक पडणार नाही असं त्याने नुकतंच म्हटलं होतं. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : चावडीवर घेतली आदिश-मीराची शाळा, सुरेखा कुडची घराबाहेर

ADVERTISEMENT

राकेशच्या येण्याने शमिताला मिळेल पाठिंबा

तर दुसऱ्या बाजूला ओटीटी प्लॅटफॉर्मवर शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश या दोघांमध्येही प्रेमाचे नाते फुलले होते. बाहेर आल्यानंतरही दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यामुळे जर राकेश या शो मध्ये आला तर शमिताला नक्कीच पुन्हा पाठिंबा मिळणार आहे. या दोघांची जोडी बऱ्याच जणांना आवडते. त्यामुळे #shara ही जोडी पुन्हा एकदा दिसावी असं त्यांनाही वाटत आहे. 

मात्र या सीझनमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना शाब्दिक आणि अगदी शारीरिकदेखील घमासान दिसून येत आहे. इतकंच नाही तर इशान आणि माएशा या जोडीने प्रेमाच्या सर्व सीमा ओल्यांडल्यामुळे अनेकांनी यावर सेन्सॉर बोर्ड नक्की काय करत आहे असा प्रश्नही विचारला आहे. तर सलमान खाननेदेखील या जोडीला शांत शब्दात समजावत स्वतःवर नियंत्रण ठेवा असा सल्ला दिला आहे. हा शो सुरू होऊन केवळ दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे आता पुढे पुढे कशी समीकरणं बदलणार आणि कोण कोणाचे मित्र आणि शत्रू राहणार हे येत्या काळात कळेलच. 

अधिक वाचा – 6 बॉलीवूड कलाकार हॉलीवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी सज्ज

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
18 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT