ADVERTISEMENT
home / बिग बॉस
vikas patil

Bigg Boss Marathi : विकास झाला मुलाच्या आठवणीत भावूक

‘बिग बॉस’ हा रियालिटी म्हणजे आपल्याच घरातील एक होतो. यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक आपल्याला आपलेसे वाटू लागतात. सध्या मराठी बिग बॉस (Bigg Boss Marathi 3) मधील वेगवेगळे टास्क, एकमेकांना भिडणे, वेगवेगळे गट आणि एकमेकांवर करण्यात येणाऱ्या कुरघोडी हे सर्व पाहत प्रेक्षकही आपल्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत. यामध्ये विकास पाटील (Vikas Patil) याचा खेळ अनेकांना आवडत आहे. मात्र विकासच्या व्यक्तीगत आयुष्याबाबत फारच कमी जणांना माहीत असेल. इतर सर्व गोष्टी झाल्यानंतर स्पर्धक एकमेकांशी गप्पा मारताना दिसून येतात. नुकताच या शो मध्ये विकासनेही आपले मन हलके करत आपल्या 8 वर्षीय मुलाच्या आजारपणाविषयी खुलासा केला असल्याचे दिसून आले. मुलाच्या आजारपणाबाबत बोलताना विकास खूपच हळवा आणि भावूक झाल्याचेही दिसून आले. 

मुलाला लहानपणीच झालाय अपघात

विकासची विशाल निकम (Visshal Nikam), सोनाली पाटील (Sonali Patil) आणि मीनल शाह (Minal Shah) यांच्याशी चांगलीच गट्टी जमली आहे. त्यांच्यासोबत गप्पा मारताना विकासने आपले मन हलके केले. सध्याची त्याच्या मुलाची परिस्थिती विकासने सांगितली, विकास म्हणाला की, ‘माझा मुलगा एकदा सोसायटीच्या मुलांसह खेळत होता आणि अचानक तो सोसायटीच्या पाण्याच्या टँकमध्ये पडला. त्यावेळी तो फक्त 3 वर्षांचा होता. टँकमधून बाहेर काढेपर्यंत साधारण 7-8 मिनिट्स गेले. याचा त्याच्यावर खूपच परिणाम झाला. अजूनही तो 8 वर्षांचा आहे पण अंथरूणातच आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याला बरं व्हायला काही कालावधी जावा लागेल.’ हे सांगताना विशाल खूपच भावूक झाला होता. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: अक्षय वाघमारे करणार मरणोत्तर अवयव दान

पत्नीचेही आभार मानले

या दरम्यान विशालने आपल्या पत्नीचेही आभार मानले. कारण पत्नीच्या मदतीशिवाय काहीच झालं नसतं असं विशाल म्हणाला. आपली पत्नी मुलाची खूपच काळजी घेते असंही त्याने आवर्जून सांगितले. विकासने आपल्या मुलाची परिस्थिती सांगितल्यानंतर तिथे असणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. विकासने आतापर्यंत कधीही आपल्या व्यक्तीगत आयुष्याबाबत अथवा मुलाबाबत सांगितलं नव्हतं. सतत हसत खेळत असणाऱ्या विकासच्या आयुष्यात इतकं दुःख असेल याबाबत कोणालाच कल्पना नव्हती. मात्र तरीही बिग बॉसच्या या खेळात विकास जिद्दीने उतरला आहे आणि तुफान खेळत आहे हे पाहून नक्कीच त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. तसंच त्याचे हे दुःख लवकरच कमी होवो आणि त्याच्या मुलाला लवकरच बरं वाटू दे अशीच सर्वजण प्रार्थना करत आहेत. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – करण जौहरने रद्द केली युवराज सिंहची बायोपिक, कारण वाचून व्हाल हैराण

विकास ठरतोय प्रेक्षकांची आवड

पहिल्या आठवड्यात मागे राहिला असला तरीही दुसऱ्या आठवड्यानंतर विकासने प्रेक्षकांच्या मनावर पकड घेतली आहे. आपली वागणूक आणि आपला खेळ या दोन्ही गोष्टींमुळे विकास आता प्रेक्षकांना खूपच आवडू लागला आहे. आपल्या अभिनयाने विकासने आधीच वेगळी जागा प्रेक्षकांच्या मनात मिळवली होती. मात्र आता खरा विकास काय आहे हेदेखील लोकांना जाणवू लागले आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांना विकास अधिक आवडू लागला आहे. इतकंच नाही तर महेश मांजरेकरांनीदेखील विकासची चावडीवर बाजू घेऊन तो कसा योग्य होता हे पटवून दिले. त्यानंतर विकास पाटील अधिक चर्चेत आला आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : घरात पडू लागली आहे फूट, स्नेहा तयार करतेय का नवा गट

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT