Bigg Boss Marathi च्या घरात सध्या टास्कमध्ये रोजच राडे होऊ लागले आहेत. घरात कॅप्टन कोण होणार ? हा टास्क आला की या घरात इतकी भांडण होतात की, महेश मांजरेकरांना शेवटी येऊन सगळ्यांची पुन्हा शाळा घ्यावी लागते. कॅप्टन्सी टास्कसाठी घरात सध्या ‘चल रे भोपळ्या’ हे टास्क सुरु आहे. या टास्क अंतर्गत घरात दोन टीम करण्यात आल्या होत्या. उत्कर्ष आणि जय हे ज्यावेळी एका टीममध्ये असतात त्यावेळी ते नेहमीच चिडीचा डाव करतात. हे आता दिवसेंदिवस दिसून आले आहे. उत्कर्ष आणि जय दुधाणे घरात असताना ते घरात कोणालाही खेळू देत नाहीत. अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये हिंसा केली म्हणून विशालला नॉमिनेट करण्यात आले पण त्याऐवजी सगळे घर नॉमिनेट करायला हवे होते.असा सूर ही उमटत आहे. त्यामुळेच की काय प्रेक्षक दिवसेंदिवस नाराज होऊ लागले आहेत.
उत्कर्ष आणि जय यांना डायरेक्ट जिंकवा
उत्कर्ष आणि जय हे कोणताही टास्क आला की, तो जिंकण्यासाठी सगळ्या हदी पार करतात. त्यांना खेळ जिंकायचा असेल त्यावेळी नवे नियम बनवतात. संचालक म्हणून ज्याची निवड होते तो व्यक्ती फेव्हरमध्ये असेल तर त्याला पाठिंबा देतात. जर संचालकाने निर्णय विरोधात दिला तर मात्र त्याच्या विरोधात चिडचिड करायला सुरुवात करतात. त्यामुळे घरातील इतर सदस्य कोणताही खेळ खेळू शकत नाही. अशी परिस्थिती सध्या दिसून आली आहे. विशाल निकमला नेहमी हिंसा म्हणून टार्गेट केले जाते पण प्रत्यक्षात जय हा या घरात सगळ्यांना ‘आडवा पाडीन’ असे म्हणायला आला आहे. त्याने वापरलेले शब्द हे अतिशय भयानक असतात. इतकेच नाही तर मास्टर माईंड म्हणून घरात वावरणारा उत्कर्ष आपल्या फायद्यासाठी एक टीम बनून घरात फिरताना दिसतो. त्यामुळे एकूणच हा खेळ या दोघांसाठी बनला आहे. त्यामुळे त्यांना थेट विजेता म्हणून घोषित करावे अशी टीका होऊ लागली आहे.
तृप्ती देसाईही चालल्या आहेत चुकीच्या दिशेने
ज्या तृप्ती देसाई मीराच्या वागण्यावर खूश नव्हत्या. त्या तृप्ती देसाई उत्कर्ष- जय हे दोघे त्यांना कॅप्टन बनू देत नाही हे माहीत असताना सुद्धा त्या या खेळात याच टीमला सपोर्ट करताना दिसल्या. त्यामुळे त्या योग्य संचालन करतात असे म्हणत असताना आता त्याचा बायसपणा या टीममध्ये चांगलाच दिसून आला. त्यामुळे तृप्ती देसाई यांच्या निर्णयावरही सगळे नाराज आहेत. तृप्ती देसाई यांनी झुंडला सपोर्ट करुन चुकीचा निर्णय दिला असे देखील अनेक जण बोलत आहेत. बिग बॉसने दिलेल्या निर्णयानुसार या खेळात हिंसा झाल्यामुळे विशाल, गायत्री आणि स्नेहा या देखील नॉमिनेट झाल्या आहेत.
दादूसचा खेळ गेला
या घरातील निरागस असा स्पर्धक म्हणजे दादूस उर्फ संतोष चौधरी हे देखील या खेळात कुठेही दिसत नाही. स्वत:साठी ते या स्पर्धेत खेळताना अजिबात दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक टास्कमध्ये त्यांचा वापर हा केवळ संख्याबळासाठी केला जातो. पण घरात टिकून राहण्यासाठी ताकदवार लोकांच्या बाजूने खेळायला ते पसंती देतात. पण त्याचा फायदा त्यांना अजिबात झालेला दिसत नाही. उलट ते नॉमिनेशनमध्ये सतत येताना दिसत आहेत. काही ठराविक लोकं ही टास्कमध्ये नॉमिनेट होतात. त्यामुळेही घरात काही जणच राहणार याचे चित्र स्पष्ट झालेले आहे.
इतरांना खेळाची संधी द्या
बिग बॉसच्या या घरात टास्क सुरु झाल्यापासून असा एकही दिवस गेला नाही ज्या वेळी टास्क हिंसेशिवाय पार पडला आहे. जिथे डोकं लावायचं त्या ठिकाणीही हिंसा होतच आहे. काही ठराविक चेहरे यामध्ये हिंसा करताना दिसत आहेत. हिंसा करणारे चेहरे जय- उत्कर्ष असून देखील कायम यामध्ये विशालचे नाव येत आहे. त्यामुळेच की काय आता हा या सीझनचा पॅटर्न झाला आहे असे दिसून येत आहे.
आता या पुढे या घरात नेमके काय होणार? या आठवड्यात घरातून कोण निरोप घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे?
अधिक वाचा
Bigg Boss 15: अनुषा दांडेकरचे चाहत्यांसाठी खुले पत्र, बिग बॉसच्या चर्चांना पूर्णविराम
Bigg Boss Marathi:घरात सुरु झालेत गैरसमज, टीम Aमध्ये पडेल का फूट?
Bigg Boss Marathi : चावडीवर घेतली आदिश-मीराची शाळा, सुरेखा कुडची घराबाहेर