ADVERTISEMENT
home / बिग बॉस
#BBM2 मध्ये पहिल्या टास्कची धमाल

#BBM2 मध्ये पहिल्या टास्कची धमाल

‘बिग बॉस मराठी सिझन 2’ ला दमदार सुरूवात झाली आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच सेलिब्रिटी कंटेस्टंट्सनी भांडायला सुरूवात केली आहे. या घरांमध्ये राजकारणातील व्यक्ती आल्यामुळे की बिग बॉसच्या घरातील परंपरेप्रमाणे म्हणा आता प्लॅनिंग आणि प्लॉटींग सुरू झाल्याचं चित्र आहे. 

नॉमिनेशननंतर नवा ट्वीस्ट

बिग बॉस मराठी सिझन 2 चा खेळ पहिल्यादिवसापासूनच रंगू लागला आहे. पहिल्याच नॉमिनेशनमध्ये चार जणांना घरच्यांनी नॉमिनेट केलं. यामध्ये नॉमिनेशनमध्ये पहिलं नाव होतं अभिजीत बिचुकले, मैथिली जावकर, वैशाली भैसने-माडे आणि शिव ठाकरे. घरातल्या सदस्यांनी आपल्या या नावडत्या सदस्यांना नॉमिनेट केल्यावर उत्सुकता होती. पण नेहमीप्रमाणे बिग बॉसने या नॉमिनेशन प्रक्रियेत ट्वीस्ट आणलंच. या नॉमिनेट झालेल्यांपैकी दोघांना टीम कॅप्टन म्हणून बिग बॉसने जाहीर केलं. आता घरातील सदस्य हे दोन टीममध्ये विभागले गेले आहेत आणि चढाओढ सुरू झाली आहे. सर्वात जास्त लक्ष वेधून घेत आहे देवयानी फेम शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचुकले यांच्यातील वादविवाद.

या दोघांमध्ये सतत काही ना काही वाद होताना दिसत आहेत. यादरम्यान लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी घरच्यांच्या सोबतीने गझल गायली आणि नंतर लावणीही सादर केली. त्यामुळे वादविवादात थोडं फार मनोरंजनही सुरू आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये उत्सुकता आहे ती पहिल्या टास्कची, ज्याची घोषणा कालच्या एपिसोडमध्ये करण्यात आली होती. आता पाहूया कसं पार पडतंय हे पहिलं टास्क आणि कोणती टीम जिंकतेय.

बिग बॉसच्या घरात शिवानीची चॅरिटी

bbm-shivani-charity-4

ADVERTISEMENT

#bbm सिझन 2 च्या सगळ्या स्पर्धकांमध्ये आल्यापासून लक्ष वेधून घेत आहे ती देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे. तिचे स्टाईलिश आऊटफिट्स, अक्सेसरीज आणि शूजची क्रेझ तिच्या फॅन्समध्ये आहे. एंट्री केल्या केल्या मैं हिरोईन हू असं शिवानीने म्हटलं होतं. आता अभिनेत्री आहे, म्हटल्यावर कोणत्यातरी महागड्या डिझाईनरकडूनच तिने सर्व वॉर्डरोब आणि अक्सेसरीज डिझाईन करून घेतल्या असणार असं तुम्हाला वाटेल. पण शिवानीच्या शूजच्या डिझाईनरबद्दल ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आता तुम्ही म्हणाल की, या डिझाईनर आणि चॅरिटीचा काय संबंध आहे. तर शिवानी घालत असलेले हे शूज डिझाईनर तर नक्कीच आहेत. पण हे कोणत्याही महागड्या किंवा प्रसिद्ध  डिझाईनरने ते डिझाईन केलेले नसून, ते दिव्यांग मुलांनी डिझाईन केलेले आहेत. ‘फिट मी अप’ एनजीओच्या मुलांनी डिझाईन केलेले हे शूज शिवानी सध्या बिग बॉसच्या घरात घालत आहे. दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कूल’ ही संस्था काम करते. याच संस्थेचा ‘फिट मी अप’ हा दिव्यांग मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा एक उपक्रम आहे.

दिव्यांग मुलांसाठी शिवानीने उचलंल पाऊल

बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच शिवानी सुर्वेने या संदर्भात सांगितलं होतं की, “जरी ही मुलं दिव्यांग असली तरीही कोणत्याही प्रोफेशनल डिझाईनरप्रमाणे त्यांनी हे शूज डिझाईन केलेले आहेत. त्यामुळे मी त्यांनी डिझाईन केलेले तीन-चार शूज घेऊन बिगबॉसमध्ये जात आहे. त्यांच्यासाठी माझ्या परीने उचललेला हा खारीचाच वाटा आहे.” फिट मी अपच्या संचालक प्रसन्नती अरोरा सांगतात की, “मी आणि माझी मैत्रिण दिपशिखाने 2011 साली दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ची सुरूवात केली होती. त्यांना सज्ञान झाल्यावर रोजगार मिळावा, हा या मागचा उद्देश होता आणि आम्हांला आनंद आहे,की, शिवानी सुर्वेसारखे सेलिब्रिटीजनी आमच्या या उपक्रमाला अशा पध्दतीने पाठिंबा देत आहेत.”

हेही वाचा –

मराठीतला पहिला वेब सिनेमा ‘संतुर्की’ चा ट्रेलर प्रदर्शित

ADVERTISEMENT

अभिनयानंतर अभ्यासतही रिंकूचं ‘सैराट’ यश

एकता कपूरने तिच्या चार महिन्याच्या बाळासाठी घेतला हा निर्णय

 

28 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT