वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. स्वतःप्रमाणेच पती अथवा पत्नी, आईवडिलांचा अथवा मुलांचा वाढदिवसही सर्वांसोबत साजरा करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. खास करून लग्नाचा पहिला अथवा पंचविसावा वाढदिवस, मुलांचा पहिला वाढदिवस अथवा पाचवा वाढदिवस, आईवडिलांची साठी अथवा सत्तरी असे काही वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. अशा शुभ प्रसंगी आपले नातेवाईक, लाडक्या बहिणीला, मित्रमंडळी आणि जीवलग माणसं तुमच्या जवळ असावी, त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यावेत, असं तुम्हाला वाटत असतं. मग या सर्व मंडळींना आमंत्रण देण्याची लगबग सुरू होते. तुमच्या घरीदेखील वाढदिवसाचं असं सेलिब्रेशन होणार असेल तर मित्रमंडळी आणि नातेवाईकांना असे पाठवा वाढदिवसाचे निमंत्रण संदेश (Birthday Invitation In Marathi) प्रियजनांना आमंत्रण देण्यासाठी बेस्ट आहेत हे वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठीतून आणि वाढदिवस निमंत्रण पत्रिका मजकूर.
वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठी (Birthday Invitation Message In Marathi)

वाढदिवस मग तो कोणाचाही असो त्या व्यक्तीला भरभरून आर्शीवाद आणि शुभेच्छा द्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. वाढदिवसाच्या शुभेच्छांचे आभार ही मानले जातात. म्हणूनच वाढदिवशी प्रत्येकाला आपल्या माणसांनी जवळ असावं असं वाटत असतं. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवशी असं त्यांच्या जवळच्या लोकांना वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठीतून पाठवण्यासाठी पाहा हे मेसेज.
1. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा देण्यासाठी हवेत माणसं सारी सोनेरी… आईच्या साठाव्या वाढदिवाशी सोबत असावी सारी नातीगोती…हा क्षण साजरा करण्यासाठी आम्हा कुटुंबाकडून आपणांस आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ-
2. क्षण हा सुखाचा येतो प्रत्येक वर्षी… पण मला मात्र तेव्हा साथ हवी असते फक्त तुम्हा सर्वांची माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व जीवलग मित्रांना आग्रहाचे आमंत्रण.
दिनांक-
वेळ-
स्थळ-
3. वडाचं झाड मोठं होताना पारंब्यांना वाढवत जातं… म्हणूनच बळकट झाल्यावर त्या पारंब्याच वडाचा आधार होतात. आमच्या कुटुंबातील आधारवड आमच्या बाबांनी जोडलेल्या सर्व पारंब्यांना बाबांच्या साठीनिमित्त आग्रहाचे निमंत्रण… आज त्यांना तुमच्या शुभेच्छा आणि आधाराची सर्वात जास्त गरज आहे. तेव्हा सर्वांना हा आनंद साजरा करण्यासाठी यायचं हं.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
4. वाढदिवस साजरा करणं म्हणजे फक्त एक बहाणा असतो… खरं तर त्या निमित्ताने मला तुम्हाला भेटण्याचा सण साजरा करायचा असतो…माझ्या चाळिसाव्या वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
5. दिवस हा सौख्याचा आयुष्यभर साजरा करायचा आहे. माझ्या चिरंजीवाच्या वाढदिवसाचा आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. चि…. च्या सोळाव्या वाढदिवसाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ-
6. माझी परी, माझी सोनुली… बघता बघता दोन वर्षांची झाली.
वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे एक बेत… ज्याचे आमंत्रण आहे तुम्हा सर्वांना थेट.
दिनांक –
वेळ-
स्थळ –
7. जिच्या पोटी जन्म घेतो तीच वाढवते सांभाळते,
पिलांसाठी सुगरण आपला जीव झाडाला टांगते,
माझ्या माऊलीने घेतले कष्ट आणि सोसले हाल
पण राजासारखं वाढवून मला केलं मालामाल
आता माझी आहे पाळी काहीतरी करण्याची तिच्यासाठी
थाटामाटात करण्याची इच्छा आहे तिची साठी
तेव्हा आपण सर्वांनी यावे हे निमंत्रण आग्रहाचे
आलात तर वाटेल तिला आहे जगात कुणीतरी तिचे हक्काचे
दिनांक –
वेळ –
स्थळ –
8. तुमचे येणे तिच्यासाठी खूप आहे महत्त्वाचे
कारण तुमच्या शिवाय नाही तिचे आणखी कोणी जीवाभावाचे
आईच्या वाढदिवसाचे आमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ-
9. मित्रांच्या येण्याने अंगात संचारतो उत्साह
पाहताच तुम्हाला विसरतो मी दुःखाचा दाह
या मित्रांच्या हाकेला ओ द्यायला विसरू नका
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी थोडासा वेळ बाजूला ठेवा
दिनांक –
वेळ-
स्थळ-
10. परीच्या येण्याने घरी झाला आनंदी आनंद
एक वर्ष पूर्तीचा साजरा करायचा आहे तुमच्या संग
तेव्हा सर्वांनी वाढदिवसाला यायचं आहे पक्कं
भेटवस्तू न आणता सोबत आणायचं फक्त शुभेच्छाचं देणं
दिनांक –
वेळ –
स्थळ –
वाचा – Congratulations Wishes In Marathi
पहिला वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठी (1st Birthday Invitation Message In Marathi)

आपल्या मुलाचा अथवा मुलीचा पहिला वाढदिवस प्रत्येक आईवडिलांसाठी नेहमीच खास असतो. सध्या तर प्रत्येक महिन्याचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आहे. मात्र पहिला वाढदिवस हा नेहमी मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत साजरा केला जातो. वाढदिवसाच्या शुभेच्छांनी पहिला वाढदिवस सार्थकी लागतो. यासाठी तुमच्या नातेवाईकांना पाठवा तुमच्या मुलांच्या पहिला वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठीतून
1. मला या जगात येऊन एक वर्ष पूर्ण होतंय… माझ्या आईवडिलंना हा क्षण साठवून ठेवायचा आहे, त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व तुम्हा सर्वांचे शुभार्शीवाद मिळावे यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्या वाढदिवसाला यायचं हं…
2. वाढदिवसाचे आमंत्रण
वार …. दिनांक…. वेळ….
पहिले पाऊल पहिला गंध, लाडात तिच्या सारे गुंग
पहिले तीचे शब्द ऐकून, आम्ही दोघे झालो स्तब्ध
हळूच पडले पहिले पाऊल, लागली तिच्या वाढीची चाहूल
पहिल्या वाढदिवसाचा न्यारा आनंद, पाहताना तुम्ही देखील व्हाल दंग
स्थळ –
निमंत्रक –
3. आमचे चिरंजीव… यांचा प्रथम जन्मदिवस…. दिनांक… रोजी… वा. स्थळ…. येथे करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी आमच्या आनंदात सहभागी होऊन आमच्या चिंरजीवास शुभार्शीवाद द्यावे ही विनंती
4. आपल्या सर्वांचे प्रेम आणि थोरामोठ्यांचे आर्शीवाद घेत आमच्या …. प्रथम वाढदिवस थाटामाटात करण्याचे योजिले आहे. आपण सर्वांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ-
5. क्षण हा भाग्याचा, लाडक्या लेकीला मोठं होताना पाहण्याचा
आमची कन्या… आता एक वर्षांची होणार तेव्हा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी
तिच्या आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, ताई-दादाचे आर्शीवाद तर हवेच…
तेव्हा आपण सर्वांनी भेटू या…. दिनांक…. वेळ…. स्थळ… आणि हा क्षण साजरा करू या.
6. चला आमच्या छोट्याशा परीचा पहिला वाढदिवस सर्व मिळून साजरा करू…
या खास कार्यक्रमाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
7. केक, फुगे, वेफर्स, भेटवस्तू सर्व काही असलं तरी तुमच्या आर्शीवाद आणि शुभेच्छांशिवाय माझ्या लेकीच्या वाढदिवशी काहीच मौल्यवान नाही… तेव्हा…… च्या पहिल्या वाढदिवसाला सर्वांनी यायचं हं.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
8. प्रथम वाढदिवस…. पहिला वाढदिवस म्हणजे धमाल मस्ती आणि आर्शीवादाची बरसात… आमचा लाडका लेक…. याच्या पहिला वाढदिवस असाच तुमच्या औक्षण आणि आर्शीवादाने साजरा व्हावा असं आम्हाला वाटतंय.
तुम्हा सर्वांना … च्या पहिल्या वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
9. श्री गणेशाय नमः
प्रथम वाढदिवस समारंभ …. चा पहिला वाढदिवस …. दिनांक…. सायं… वा. साजरा करण्याचे योजिले आहे.
तरी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
निमंत्रक –
दिनांक –
वेळ –
स्थळ –
स्नेह भोजन –
10. सस्नेह निमंत्रण…
प्रथम वाढदिवस सोहळा
आमच्या येथे चिं…… चा पहिला वाढदिवस आहे. या निमित्ताने एक छोटेखानी सोहळाा आयोजित केला आहे. तरी आपण सहकुटुंब येऊन त्यास आर्शीवाद द्यावे ही विनंती.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
वाचा – खास मित्राला पाठवा वाढदिवसाचे जोक्स
पाचवा वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठी (5th Birthday Invitation Message In Marathi)

पहिल्याप्रमाणेच मुलांचा पाचवा आणि दहावा वाढदिवसही मोठ्या धुमधडाक्यात केला जातो. तुमच्या मुलांचा पाचवा वाढदिवस जवळ आला असेल आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना आमंत्रण द्यायचं असेल हे पाचवा वाढदिवस निमंत्रण पत्रिका अवश्य पाहा.
1. आमच्या येथे….. कृपेने आमचा पुत्र…. याचा पाचवा वाढदिवस समारंभ …. दिनांक…. रोजी…. सायं… वा. करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून बालकास शुभार्शीवाद द्यावेत… ही नम्र विनंती!
निमंत्रक –
पत्ता-
2. चिं….याचा पाचवा वाढदिवस … दिनांक…. सायं…. वा. करण्याचे योजिले आहे. तरी आपण उपस्थित राहून या मंगल कार्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
स्थळ-
आपले नम्र-
3. आमची लाडकी कन्या …. हिचा पहिला वाढदिवस…. दिनांक….. रोजी ….. वा. साजरा करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहून शुभेच्छा आणि आर्शीवाद द्यावे ही विनंती
4. पाचवा वाढदिवस
पाच वर्षांपूर्वी आमच्या… ने घरात येऊन घराला चैतन्यमय बनवलं
आम्ही सुखाने हुरळून आनंदाने बहरून निघालो
बघता बघता आमची चिमुकली कधी पाच वर्षांची झाली हे कळलं सुद्धा नाही
आता पुढील वाटचालीसाठी तिला तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांची गरज आहे.
तेव्हा सर्वांनी…च्या पाचव्या वाढदिवसाला यायचं हं.
दिनांक-
वेळ-
स्थळ-
5. व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
असा आर्शीवाद तुमच्याकडून हवा आहे
…. च्या पाचव्या वाढदिवसाला तुमच्या आर्शीवादाची बरसात हवी आहे
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक-
वेळ-
स्थळ-
6. लेक म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा, तिच्यात रमतो जीव माझा
बघता बघता झाली पाच वर्षांची याचा आनंद करायचा आहे साजरा
सर्वांना ….च्या पाचव्या वाढदिवसाचे आमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ –
7. आमचा सोनुला, आमचा छकुला
आता पाच वर्षांचा झाला
वाढदिवसाचे औचित्य साधून
आमचा आनंद व्यक्त केला…
आता तुम्ही सर्वांना उपस्थित राहून शुभार्शीवाद द्या त्याला.
दिनांक-
वेळ-
स्थळ-
8. एक,दोन, तीन, चार, पाच वर्षे कधी भुर्रकन उडून गेली कळलंच नाही… पाहता पाहता आमची चिऊताई पाच वर्षांची झाली.
श्री… कृपेने तिचा पाचवा वाढदिवस मोठ्या थाटामाटात योजिला आहे. तेव्हा आपण सहकुटुंब येऊन तिला शुर्भाशीवाद द्यावे हीच विनंती
दिनांक-
वेळ-
स्थळ-
9. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा घेऊन येणार दिवस हा, या मंगल क्षणाचे साक्षीदार सारे मिळून होऊ या…
…. च्या पाचव्या वाढदिवसाचे तुम्हा सर्वांना आाग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ-
10. शुभ काळ आणि शुभ समयी असावे सारे सगे सोबती
…. चा वाढदिवस साजरा करू या मिळून सारी नाती
सर्वांना …. च्या पाचव्या वाढदिवसाचे मनःपूर्वक निमंत्रण
दिनांक-
वेळ –
स्थळ –
वाचा – Sister In Law Birthday Wishes Marathi
व्हॉट्सअपसाठी वाढदिवस आमंत्रण (Birthday Invitation Message In Marathi For Whatsapp)

वाढदिवसाचे निमंत्रण पत्रिका स्वरूपात दिलं जातं. मात्र आजकालच्या आधुनिक युगात तुम्ही व्हॉट्सअॅपवर आकर्षक मेजेस पाठवूनही तुमच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रित करू शकता. यासाठी खास व्हॉट्सअपवर पाठवण्याचे वाढदिवसाचे आमंत्रण मेसेज
1. फुले बहरत राहो तिच्या वाटेत, हास्य चकाकत राहो तिच्या चेहऱ्यात, प्रत्येक क्षण मिळो तिला आनंदाचा हिच इच्छा देवा परमेश्वराला. माझ्या आईच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ –
2. वादळाला त्याचा परिचय देण्याची गरज नसते, कारण त्याची चर्चा त्याच्या येण्यानेच होते. असं वादळी व्यक्तिमत्त्व असलेल्या माझ्या भावाच्या वाढदिवसाचे खास आमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ –
3. वाढदिवस येतो आणि मित्र आणि स्नेहींचे प्रेम देत जातो… यंदाच्या वाढदिवशी मला असंच तुमचं प्रेम हवं आहे तेव्हा माझ्या जीवलग मित्रांना कार्यक्रमाचे खास निमंत्रण आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
4. जल्लोष आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…. मिळून साजरा करण्यासाठी निमंत्रण आहे तुम्हा साऱ्यांना.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
5. आयुष्याच्या या पायरीवर तिला जगातील सारी सुखे मिळावी, मनात आमच्या एकच इच्छा तिच्या साठीला सारी भावंडे एकत्र यावी
आईच्या साठीचे खास निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
6. उगवता सूर्य जेव्हा प्रखर तेज देतो तेव्हा सूर्यफुल बहरून येतं… तसंच माझ्या वाढदिवशी तुमचे आर्शीवाद मला सूर्य किरणासारखे मिळावेत आणि माझे आयुष्य बहरून यावे असं वाटत आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
7. तुमचे माझ्यावर असलेले प्रेम शब्दात वर्णन करता येणार नाही…पण त्याची गोडी भेटून नक्कीच चाखता येईल. तेव्हा माझ्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी सर्वांनी नक्की यायचं आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
8. मला वाढदिवसाचं गिफ्ट आणि शुभेच्छा म्हणून खरंच काही नको फक्त या आणि माझा आनंद द्विगुणित करा यातंच मला खरं समाधान आहे.
दिनांक-
वेळ-
स्थळ –
मुलीच्या वाढदिसाचे आमंत्रण मेसेज (Daughter Birthday Invitation Message In Marathi)

लेक म्हणजे आईबाबाच्या काळजाचा तुकडा…अशा लाडक्या लेकीच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा त्यांना खूपच महत्त्वाच्या असतात. तिच्या वाढदिवसासाठी आमंत्रण सर्वांना देण्यासाठी खास आमंत्रण मेसेज.
1. गुलाबाच्या ओठी आली घेऊन चैतन्याची गाणी
जसं पहाटेचं गोड स्वप्न तशी आमच्या परीच्या जन्माची कहाणी
ही कहाणी तुम्हाला सांगायची आहे,
तिच्या पहिल्या वाढदिवशी यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे.
तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यायचं हं
दिनांक-
वेळ –
स्थळ –
2. लेक म्हणजे तांबडं कुंदन, लेक म्हणजे हिरवं गोंदण
लेक म्हणजे झाडाची पालवी, लेक म्हणजे सुंगधी चंदन
अशाच आमच्या लाडक्या लेकीचा….चा वाढदिवस साजरा करायचा आहे.
तेव्हा सर्वांना वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
3. फक्त लेकीलाच समजते निसर्गाची भाषा,
कारण प्रत्येक काळ्या रात्रीला असते पहाटेची आशा
आमच्या लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हा आनंद द्विगुणित करण्यासाठी साऱ्यांना आग्रहाचे निमंत्रण आहे
दिनांक –
वेळ –
स्थळ –
4. मुलगी म्हणजे अशी एक चिऊताई जी घरभर उडते आणि रागावलं तर कोपऱ्यात रूसून बसते
आमच्या चिऊताईला आता एक वर्ष होत आहे
तिच्या पहिल्या वाढदिवसाचे सर्वांना मनापासून आमंत्रण
सर्वांनी चिऊच्या वाढदिवसाला यायचं हं
दिनांक –
वेळ –
स्थळ –
5. कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवून बसते
वाढदिवसाचा फ्रॉक घालून घरभर हिंडते
माझ्या लाडक्या लेकीच्या पाचव्या वाढदिवसाचे आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
दिनांक-
वेळ –
स्थळ –
मुलाच्या वाढदिवसाचे आमंत्रण मेसेज (Son Birthday Invitation Message In Marathi)

मुलगा असो वा मुलगी प्रत्येक आईबाबासाठी ते जीव की प्राण असतात. यासाठी त्यांना आनंदी करण्यासाठी दोघे वेड्यासारखे झटतात. अशा वेड्या आईबाबांना मुलांच्या वाढदिवसाचे निमंत्रण देण्यासाठी मेजेज
1. इवलासा जीव आमच्या सर्वांसाठी आनंदाचा ठेवा
कौतुक पाहता पाहता कळलं नाही कधी मोठा झाला
आता पहिला वाढदिवस साजरा करायचा आहे
तेव्हा तुम्हाला सर्वांना या सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
2. आमचे विश्व तो, आमचे सूख तो, आमच्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तो, तोच आमच्या जगण्याची आशा, तोच आहे श्वास. त्याचा पहिला वाढदिवस करायचा आहे खास.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
3. तो क्षणही क्षणभर सण असतो जो सर्वांसोबत मिळून साजरा केला जातो. माझ्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाचा क्षण असाच सण करायचा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
4. नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी त्याला आयुष्यात सुख आणि भरभराट
माझ्या लाडक्या लेकाला आर्शीवाद देण्यासाठी हवी आहे तुमची साथ
…. पहिल्या वाढदिवसाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
5. वाढदिवस सोहळा निमंत्रण
आमचा चिं….. च्या वाढदिवसाच्या सुखकारक क्षणांना अधिक आनंदी करण्यासाठी हवे आहात तुम्ही सर्व मिळून करू या साजरा हा क्षण देऊ आणि सुरू होऊ दे त्याच्या सुखी जीवनाचे पर्व.
दिनांक –
वेळ –
स्थळ –