ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

130+ वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Vahini In Marathi

 ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण’, प्रत्येकाच्या घरात वहिनी ही आईसारखी असते. घर सांभाळण्यापासून ते घरातील सगळ्यांना जबाबदारीपूर्वक सांभाळण्यामागे तिचा महत्वाचा असा वाटा असतो. दादाची बायको किंवा भावाची बायको ही वहिनी म्हणून ओळखली जाते. घरात तिचा एक वेगळाच तोरा आणि मान असतो. त्यातच घरातील वहिनी ही मोठी असेल तर ती आई समानच असते. अशा ताई आणि आई समान असलेल्या वहिनीचा वाढदिवस असा कसाही करुन कसा चालेल. तिच्या वाढदिवसाला थोडी तरी मजा ही असायलाच हवी. लाडक्या जवळच्या व्यक्तींचा लग्नाचा वाढदिवस असल्यावर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकता. वहिनीचा वाढदिवस हा स्पेशल असायलाच हवा. त्यासाठी  वहिनी साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday Wishes For Vahini In Marathi, SMS For Vahini Birthday Wishes In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Law In Marathi,Birthday Quotes For Sister In Law In Marathi अशा काही झक्कास शुभेच्छा संदेशाचे संकलन केले आहे. जे तुम्हाला नक्कीच तुमच्या  वहिनीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी मदत करतील. याशिवाय वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूनही हा दिवस साजरा करता येईल. तसंच लाडक्या जीजूला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Jiju In Marathi) द्यायच्या असल्यास नक्की वाचा.

वहिनी साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Vahini In Marathi

Birthday Wishes For Vahini In Marathi | वहिनी साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Vahini In Marathi

वहिनी ही घरात किती खास असते हे आपण सगळेच जाणतो. अशा वहिनीसाठी (Birthday Wishes For Sister In Law In Marathi)  शोधून काढले आहेत. जे तुम्ही तुमच्या वहिनीला पाठवू शकता. खास वहिनी साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 1.  वहिनी असावी अगदी तुझ्यासारखी,
  आईसारखी माया करणारी आणि तिच्यासाठीच दरडावणारी,
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 2.  या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी साकार व्हावीत स्वप्न सारी,
  वहिनी तुम्हाला या आनंदाची आठवण जन्मोजन्मी असावी,
  तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3.  नाती जपलेस, तू प्रेम दिलेस
  परिवार आमचे पूर्ण केलेस
  तुझ्या आयुष्यात यावा आनंद हा खास
  तुझी आमची असावी अशीच साथ
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 4.  आईची सावली, वहिनी आमची माऊली,
  वाढदिवशी वाढू दे तुझी आमच्यावरील प्रेम आणि आपुलकी,
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 5.  घरी तू आलीस सून बनून
  आणि झालीस या घराची लेक,
  तुला मिळाले सगळे सौख्य थेट
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 6.  हसरा तो चेहरा तुझा,
  कायम असावा आनंदी
  वहिनी तुझ्या वाढदिवशी हीच अपेक्षा ईश्वरचरणी
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 7.  उंबरठ्याचे माप ओलांडून आलीस वहिनी बनून
  पण कधी झालीस मैत्रीण हे ही कळले नाही अजून
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 8.  नणंद भावजयीचे नाते आपले कधीच जाणवले नाही तसे,
  तू आहेस तशीच आम्हाला हवीहवीशी वाटते
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 9. येणारा प्रत्येक दिवस तुझ्या जीवनात आणो आनंद ,
  वहिनी तुला या दिवशी मिळो फक्त आनंदी आनंद
 10.  घराला बांधून ठेवणारा मुख्य घटक आहेस तू वहिनी
  तुझ्याशिवाय घराला नाही घरपण कधीही
  आज तुझ्या वाढदिवशी मिळावे तुला सगळे काही
  तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

वाचा – ५०० पेक्षा जास्त सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा

वहिनी ला वाढदिवसाच्या निमित्त SMS | SMS For Vahini Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes For Vahini In Marathi

 वहिनीच्या वाढदिवासाठी  तुम्ही (SMS For Vahini Birthday Wishes In Marathi) देखील पाठवू शकता. जे तुमच्या वहिनीच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आणण्यास मदत करतील.

ADVERTISEMENT
 1.  नात्याने तू मोठी,
  प्रेमळ वत्सल माऊली
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 2.  आनंदी आनंद झाला आज वहिनीचा वाढदिवस आला,
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3. तुझ्याशिवाय दिवस जात नाही आमचा
  अशी आमची वहिनीसाहेब वाटे आम्हा प्रिय
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 4.  वयाने मोठी तरी भासे मला माझी मैत्रीण
  प्रिय वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 5.  जन्म दिन तुझा आम्हास वाटे खास
  तुझ्या जन्म दिनामुळेच तू आहेस आज आमच्यासोबत आज
  वहिनी तुला जन्म दिनाच्या शुभेच्छा!
 6.  वहिनीचा तोरा आमच्या आहे एकदम भारी
  जगात तुला कोणाचीही तोड नाही,
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 7.  वाढदिवस हा तुला आला
  आम्हाला आनंद झाला
  वहिनी तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
 8.  केक कापून साजरा करु तुझा वाढदिवस
  आज मस्त करुया तुझा वाढदिवस
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 9.  आज आहे खूपच आनंदाचा दिवस
  कारण आज आहे वहिनी तुमचा वाढदिवस
  लाडक्या वहिनीसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 10.  काळजाचा तुकडा तू आमच्या
  आमच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग
  तुझ्याशिवाय आमच्या जगण्याला
  नाही अर्थ कोणता खास
  वहिनी तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

वाचा – Birthday Wishes For Son In Marathi

वहिनी ला वाढदिवसाच्या निमित्त मजेशीर शुभेच्छा | Funny Birthday Wishes For Sister In Law In Marathi

वहिनी ला वाढदिवसाच्या निमित्त मजेशीर शुभेच्छा | Funny Birthday Wishes For Sister In Law In Marathi
Funny Birthday Wishes For Sister In Law In Marathi

वहिनीसोबतचे नाते हे खूप जवळचे आणि खास असेल तर अशा तुमच्या लाडक्या वहिनीसाठी तुम्ही (Funny Birthday Wishes For Sister In Law In Marathi) पाठवायला हवेत. जे पुढील प्रमाणे आहेत.

 1.  माझी वहिनी आहे एकदम झक्कास
  तिचा वाढदिवस कसा काय होईल बकवास
  घरात आहे मी तुझा मोठा भाऊ
  चल आता तुझा वाढदिवस दणक्यात साजरा करु
 2.   मायेचा तो स्पर्श तुला धपाटा बनूनही बरसला पाठीवर
  आज वाढदिवसाच्या दिवशी सगळे सोडून पार्टी देतेस का वहिनी लवकर
  तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3.  गोरी गोरी पान फुलासारखी छान
  वहिनी माझी आहे सौंदर्याची खाण
  वहिनीसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 4.  ज्यांच्याशिवाय आमच्या दादांचे हलत नाही पान
  अशा आमच्या वहिनी आहेत घराच्या डॉन
  आजच्या वाढदिवशी तुम्हाला मिळाली अजून शक्ती
   
 5.  दादा आमचा हौशी, वहिनी आमची हुशार
  वाढदिवसाची पार्टी देतस ना गं वहिनी
  तारीफ करुन मी आता थकलो फार
 6. वहिनीचा दरारा आमच्या दादालाच माहिती
  जाऊ दे आज हा विषय नको वाढदिवसाच्या दिवशी
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 7.  आली होतीस घरी त्यावेळी होतीस एकदम साधी
  आता कळते तुझ्यातही आहे आमच्यासारखी खोडकरवृत्ती
  वहिनी तू आहेस आमची मैत्रीण, तुझ्याशिवाय जात नाही एकही क्षण
  वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 8.  वहिनी आमची एक नंबर झक्कास
  वाढदिवस तिचा आजचा करणार आम्ही खास
  आणणार एक मोठा केक आणि फोडणार फटाके
  कारण वहिनीसाहेब आहेतच एवढ्या झक्कास
 9.  वाढदिवस आहे वहिनीचा
  धिंगाणा होणार आमचा
  वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 10.  वहिनी किती ग तू चेंगट
  आता बस्सं झालं की, दे पार्टी एकदम पटकन
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वहिनी ला वाढदिवसाच्या निमित्त स्टेट्स | Happy Birthday Vahini Status Marathi

वहिनी ला वाढदिवसाच्या निमित्त स्टेट्स | Happy Birthday Vahini Status Marathi
Happy Birthday Vahini Status Marathi

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी (Happy Birthday Vahini Saheb Status)हे देखील तुम्हाला नक्कीच कामी येतील. वहिनीचा तोरा असतोच कायम वेगळा जो तुम्हाला माहीत असायला हवा.

ADVERTISEMENT
 1.  आकाशात जेवढे चमकणारे तारे आहेत
  त्या साऱ्याचे तेज तुला मिळो,
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 2.  एवढीच इच्छा आहे माझी पूर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा
  तुझ्या रुपाने घरी यावा आनंदी आनंद खऱा
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3.  उंच भरारी घेऊन साधावे तू आपले लक्ष
  हे तुझ्या वाढदिवसासाठी मागणे
  देवाकडे फक्त
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 4.  देवा माझ्य वहिनीच्या ओठी राहु दे कायमचे असे हसू
  वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मागणे करतो देवापाशी
 5.  वहिनीचा वाढदिवस आहे आमच्यासाठी आनंदी आनंद जसा
  वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 6.  वहिनी आहे आमची प्यारी
  आहे ती सगळ्यांची राजदुलारी
  आलाय वाढदिवस वहिनीचा
  तिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
 7.  घरात असतो सतत तुझा वावर
  घरात चालते तुझीच पावर
  एक दिवस तरी दे आम्हाला यातून मुक्ती
  वहिनी देऊन टाक तू आम्हाला मस्त पार्टी
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 8.  वहिनीच्या हातचं जेवून वाढलं माझं वजन
  वहिनीच्या हातचं जेवून वाढलं माझं वजन
  जेवणाची तारीफ केली आता तरी दे आम्हाला पार्टी एकदम
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 9.  आरारारारा… आमची वहिनी एकदम खतरनाक
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 10. वहिनी नाही घरातील दुसरी मुलगी आहेस तू
  तू आल्यापासून आमचे हट्ट कोणीच पुरवत नाही
  आमच्याच घरात आम्हाला परके केलेल्या
  वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाचा – Birthday Wishes And Quotes For Father In Marathi

वहिनी च्या वाढदिवसानिमित्त कोट्स | Birthday Quotes For Sister In Law In Marathi

वहिनी च्या वाढदिवसानिमित्त कोट्स | Birthday Quotes For Sister In Law In Marathi
Birthday Quotes For Sister In Law In Marathi

 वहिनीसाठी काही खास कोट्स जे तिला खूपच जास्त भारी वाटतील. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी (Birthday Quotes For Sister In Law In marathi) पाठवा तिला नक्कीच भारी वाटेल. 

 1.  संकल्प असावे नवे तुझे
  मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
  वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 2.  आयुष्याच्या पायरीवर तुमच्या
  नव्या स्वप्नांना येऊ नवी बहर
  इच्छा, आकांक्षाना मिळू दे  उंच भरारी
  हीच प्रार्थना, वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3.  उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
  बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
  आणि तुमच्यासारख्या देव माणसांस कायम सुखात ठेवो,
  वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 4.  देवासारखी पवित्र, आई सारखी निर्मळ
  वहिनी तुझ्यासाठी सगळ्या उपमा आहेत कमी
  या वाढदिवशी तुला मिळो सुख आणि शांती
 5.  शांत आहे स्वभाव जिचा
  घेते घराची सगळी काळजी
  आईनंतर वहिनी आहे आमची दुसरी माऊली
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 6.  तुझ्या सगळ्या इच्छा आज होवोत पूर्ण
  तुम्हाला मिळो सगळा आनंदी आनंद
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 7.  दाही दिशा उजळून निघू दे
  आज वाढदिवसाच्या दिवशी
  मिळावी तुला सगळ्या विश्वासाची शांती
  वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 8.  आज दिवस आहे खास
  कारण आज आहे आमच्या वहिनीचा वाढदिवस खास
  वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
 9.   घराला घरपण आणणाऱ्या आमच्या वहिनीसाहेबांना
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 10.  आमची माऊली, जिची मोठी सावली
  वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आता तुमच्या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. सोबत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसावरील जोक्स पाठवायला विसरु नका. 

08 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT