ADVERTISEMENT
home / xSEO
birthday poem in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Birthday Kavita In Marathi

वाढदिवस हा प्रत्येकासाठी एक खास दिवस असतो. आपला वाढदिवस स्पेशल असावा, आपल्या वाढदिवसाला प्रत्येकाने आपल्याला शुभेच्छा आणि आर्शीवाद द्यावेत अशी सर्वांची अपेक्षा असते. त्यामुळे वाढदिवशी आपण आवर्जून आपल्या कुटुंबातील, नात्यातील अथवा मित्रपरिवारातील लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आर्शीवाद देतो. आजकालच्या धावपळीच्या जगात सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पोस्ट करून वाढदिवस साजरा करण्यासाठी पद्धत आहे. वाढदिवस असलेल्या व्यक्तीचा फोटो, व्हिडिओ आणि त्याला साजेशी पोस्ट लिहून मनातील भावना व्यक्त केल्या जातात. थोडाचा वेळ शुभेच्छांसाठी दिल्यामुळे वाढदिवस असलेल्या व्यक्तीचा दिवस स्पेशल होऊ शकतो. जर तुम्हाला असं तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस खास करायचा असेल तर त्यांना यंदा द्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कवितामधून… (Birthday Kavita In Marathi) शेअर केल्यामुळे त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात असलेल्या भावना तुम्हाला जास्त प्रभावीपणे मांडता येतील.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Happy Birthday Poems In Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

मित्रपरिवार अथवा प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडिया अथवा व्हॉटसअपवर पाठवा या वाढदिवसाच्या कविता मराठीतून (Happy Birthday Kavita In Marathi).

1.शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहवी,

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!

ADVERTISEMENT

तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे!

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे!

तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2. तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव

ADVERTISEMENT

आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी

तुझ्या ह्रदयात सतत तेवत राहो.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

3. आयुष्यात अनेक माणसं येतात आणि जातात,

कोणी जास्त जवळ येतं तर कोणी कायम दूरच राहतं,

ADVERTISEMENT

पण काही माणसं अचानक येतात आणि आपलीच होऊन जातात

तू अशीच आहेस कायम मनात घर करून राहणारी… माझी लाडकी मैत्रीण… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4. व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

ADVERTISEMENT

ही एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5. तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

ADVERTISEMENT

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

6. इंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,

 तू सदैव आणि अविरत फक्त आनंदी आणि आनंदीच असावे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

7. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

ADVERTISEMENT

सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

सोन्यासारखा लोकांना…

हॅपी बर्थ डे टू यू….

ADVERTISEMENT

8. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,

तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षांना

आयुष्याच्या गगनात उंच उंच भरारी मिळू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

9.हसत राहो तुम्ही करोडो मध्ये

 खेळत राहो राहो लाखो मध्ये 

चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये

ज्याप्रमाणे सूर्य राहतो आकाशामध्ये

ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. दिवस आहे आज खास, 

तुला उदंड आयुष्य 

लाभो हाच मनी आहे ध्यास

ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाचा – भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Happy Birthday Kavita In Marathi

आई साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आई साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आई म्हणजे प्रत्येकाचं प्रथम दैवत… अशा तुमच्या प्रेमळ आईचा वाढदिवस खास करण्यासाठी तिला यंदा कवितेतून द्या या खास शुभेच्छा (Vadhdivas Kavita Marathi) 

1.तुझ्या चेहऱ्यावर हसू कायम राहो

ADVERTISEMENT

तुझ्या डोळ्यांतून कधी अश्रूंच्या थेंबही ना येवो

आनंदाचा दिवा असाच सतत तेवत राहो

आयुष्यात तुला जे जे हवं ते सारं मिळो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई

ADVERTISEMENT

2.तुझी बुद्धी, तुझी प्रगती, तुझे यश, तुझी किर्ती

वृद्धिंगत होत जावो

सुखसमृद्धी बहार तुझ्या आयुष्यात कायम येत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई

ADVERTISEMENT

3.या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी स्वप्न साकार व्हावी

तुझा वाढदिवस ही माझ्यासाठी अनमोल क्षणांची आठवण ठरावी

या आठवणींने माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं 

आई तुझ्या वाढदिवशी लाख लाख शुभेच्छा … 

ADVERTISEMENT

4. माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही प्रेम करणारी,

नेहमी आर्शीवाद देणारी असं वागणारी फक्त आणि फक्त आपली आईच असते…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

5. हजार जन्म घेतले जरी तरी आईचे ऋण फिटणार नाही…

ADVERTISEMENT

प्रेमाचे भेटतील बरेच पण निस्वार्थ प्रेम आईशिवाय कुणीच करणार नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई

6.प्रत्येक जन्मी देवाने मला 

तुझ्याच पोटी जन्म द्यावा 

ADVERTISEMENT

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

7.मायेचा झरा दिला तिने माझ्या जीवनाला

पायी ठेच लागताच वेदना होती तिच्या ह्रदयाला

ADVERTISEMENT

तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई

देवा उंदड आयुष्य दे माझ्या आईला हेच मागणे

8.माझ्या आयुष्याची सावली

आई माझी विठू मावली

ADVERTISEMENT

कष्ट केलेस अतोनात

भरविण्या मला तू ध्यास

केलीस मजवर तू माया

जशी एखाद्या वटवृक्षाची छाया

ADVERTISEMENT

माझ्या आयुष्याची सावली

आई माझी विठू मावली

आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

9.आई या दोन शब्दात 

ADVERTISEMENT

सगळे प्रेम सामावलेले आहे

तुझ्या मिठीत असताना

सगळे दुःख विसरायला होते

तुझा आर्शीवाद असावा राहावा माझ्या पाठी

ADVERTISEMENT

तुझ्या पुण्याई असावी सदैव माझ्या गाठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10.आज आहे एका खास व्यक्तीचा वाढदिवस

आहे ती व्यक्ती माझी गुरू आणि मार्गदर्शक

ADVERTISEMENT

माझी सर्वात जवळची मैत्रीण आणि सुख-दुःखात साथ देणारी प्रेमळ माऊली…. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

11. तुझ्यासाठी काय लिहावं,

देवाकडे काय मागावं,

तुझ्यामुळे मी आहे आज या जगात

ADVERTISEMENT

ईश्वराची सर्व रूपं दिसतात मला तुझ्यात

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

12.जगासाठी तू फक्त एक व्यक्ती आहेस

पण माझ्यासाठी तू माझं सारं जग आहेस

ADVERTISEMENT

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

मित्रासाठी वाढदिवसाच्या कविता | Friend Birthday Poem For In Marathi

मित्रासाठी वाढदिवसाच्या कविता
मित्रासाठी वाढदिवसाच्या कविता

लाडक्या मित्राचा वाढदिवस म्हणजे सर्वच मित्रमंडळींसाठी आनंदोत्सव असतो. अशा तुमच्या एखाद्या जीवलग मित्राला यंदा द्या या कवितारूपी शुभेच्छा (Birthday Kavita In Marathi For Friend) 

1.वाढदिवस येतो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो

एक नवं स्वप्न घेऊन यतो, जीवनाला नवी उजाळी देतो,

ADVERTISEMENT

आयुष्यात नवी आशा निर्माण करतो

आणि पुन्हा एकदा आयुष्य किती सुंदर आहे याची जाणीव होते

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

नातं तुझं माझं रक्ताचं नाही

ADVERTISEMENT

पण जा जन्मी तुटेल 

इतकं कच्चंही नाही

मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2.मैत्रीचे बंध कसे घट्ट बनून राहतात,

ADVERTISEMENT

उधळीत रंग सदिच्छांचे शब्दांनाही कवेत घेतात

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

3.माझ्या प्रत्येक वेदनेचे औषध आहेस तू

माझ्या प्रत्येक स्मितहास्याचे कारण आहेस तू

ADVERTISEMENT

काय सांगू मित्रा माझ्यासाठी कोण आहेस तू

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4.सगळीकडे राडा करणारा

पार्टीला न चुकता हजर राहणारा

ADVERTISEMENT

एका स्माईलवर सर्वांना फिदा करणारा 

दिलदार मनाने मैत्री निभावणारा

आमचा …. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5.गगनात भरारी घेणाऱ्या पक्षाला लाजवेल अशी उंच झेप घे

ADVERTISEMENT

समुद्राच्या पाणी कमी पडेल इतकं ज्ञान संपादन कर

तुझ्याकडे पाहणाऱ्यांना अभिमान वाटेल इतकी प्रगती कर

मात्र, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी या दोस्ताला विसरू नको

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

ADVERTISEMENT

6.दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस

आईबाबांचा राजकुमार

संकटाच्या काळी सर्वांच्या मदतीसाठी तत्पर

अशा आमच्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

7. रक्ताची नाती आपण निर्माण करत नाही, पण मैत्रीची नाती निर्माण करणं नेहमीच आपल्या हातात असतं,

तुझं माझं नातं मैत्रीच्या पलिकडचं म्हणूनच रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त दृढ…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

8.मैत्री म्हणजे धागा रेशमाचा

मैत्री म्हणजे विश्वास

ADVERTISEMENT

मैत्री जीवनात असते खास

म्हणूनच तुला भेट आज हा मैत्रीचा साज

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

9.थकलेले जीव सारे सावलीला निजले होते

ADVERTISEMENT

बाभळीचे झाड घराशी फुलांनी सजले होते

पाखरांनी आपले घरटे छपराला टांगले होते

भातुकलीचा डाव दारी खेळ सारे मांडले होते

तेव्हा उमगले हे घर माझ्या मित्रांने बांधले होते

ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. चांगल्या मित्रांशी मैत्री ऊसासारखी असते

तुम्ही त्याला कितीही तोडा,घासा, ठोका अथवा पिरगळा

त्यातून अखेर फक्त गोडवाच येतो

ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Girlfriend Birthday Kavita In Marathi

गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

प्रेम ही अशी एक भावना आहे जी माणसाचं आयुूष्यच बदलून टाकते. तुमच्या आयुष्याचं नंदनवन करणाऱ्या तुमच्या गर्लफ्रेंडसाठी तुम्ही या वाढदिवसाच्या कविता वाचायलाच हव्या (Birthday Wishes In Marathi Kavita) 

1.तुझ्या आठवणी म्हणजे मोरपिसाचा हळुवार स्पर्श

तुझ्या आठवणी म्हणजे नकळत निर्माण होणारा हर्ष

ADVERTISEMENT

तुझ्या आठवणी म्हणजे स्वप्नांनी सजलेलं एक गाव

तुझ्या आठवणी म्हणजे विरह सागरात बुडालेली नाव

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2.कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं

ADVERTISEMENT

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल नसतं

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

3.स्वार्थात गुंतलेलं प्रेम नसतं

मीराच्या प्रेमासारखं ते निस्वार्थ असतं

असं माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या प्रिय…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4.तुझा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे,

ADVERTISEMENT

तुझी प्रत्येक आठवण माझ्यासाठी खास आहे

तुला पडलेलं स्वप्न हे माझं जीवन आहे

कारण माझ्या आयुष्यावर फक्त तुझंच नाव कोरलं आहे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

5.परीसारखी आहेस तू सुंदर

तुला मिळवून मी झालोय धन्य

प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी

हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी

ADVERTISEMENT

6.तुझ्यावर रुसणं आणि रागावणं

मला कधीच जमलं नाही

कारण तुझ्याशिवाय माझं मन

कशातच रमलं नाही

ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

7. जन्मादिनाच्या शुभ क्षणांनी तुझी माझी स्वप्नं साकार व्हावी, 

आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुझी अशीच मला साथ मिळावी,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

8.आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते

की, तिच्याशिवाय एकही क्षण जगणं कठीण होऊन जाते…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9.प्रेमाचे नाते जेव्हा हळुवार उमलते

ADVERTISEMENT

तेव्हा कडक उन्हातही सावली जाणवते,

नाही तर, प्रेमाविणा सारे जगच फिके वाटू लागते

माझं तुझ्यावर असंच प्रेम आहे जगावेगळं…

वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा

ADVERTISEMENT

10. वाढदिवस तुझा आहे पण मला आज काहीतरी हवं आहे

तू फक्त माझ्यासोबत आयुष्यभर राहा दुसरं मला काहीच नको आहे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या कविता | Boyfriend Happy Birthday Kavita In Marathi

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या कविता
बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या कविता

तुमच्या मनात त्याच्याबद्दल दडलेलं प्रेम तुम्ही त्याच्या वाढदिवशी असं कवितेतून व्यक्त करू शकता (Birthday Wishes In Marathi Kavita)

ADVERTISEMENT

1.तुझी सोबत असताना 

जीवनात फक्त सुखाचीच 

बरसात असेल

प्रेम काय असतं मला माहीत नाही

ADVERTISEMENT

पण ते तुझ्याइतकंच सुंदर असेल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2.प्रेमाच्या हाकेला साद मिळाली

स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली

ADVERTISEMENT

मन माझं खुदकन हसल 

जेव्हा तुझ्या डोळ्यात मला माझं प्रेम दिसलं

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

3.तुला सात जन्मांचे वचन

ADVERTISEMENT

मी देत बसणार नाही

पण या जन्मात मरेपर्यंत

तुझी साथ नक्कीच सोडणार नाही

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

4.आठवलं तर डोळ्यात पाणी येतं

न आठवलं तर मन रडू लागतं

खरंच प्रेम काय असतं

ते प्रेमात पडल्याशिवाय कळत नसतं

ADVERTISEMENT

वाझदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5.तुला पाहिलं की 

मला काय होऊन जातं

माझं मन मला 

ADVERTISEMENT

कसं विसरून जातं

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6.समईला साथ आहे ज्योतीची

अंधाराला साथ आहे प्रकाशाची

ADVERTISEMENT

चंद्राला साथ आहे चांदणीची 

प्रेमाला साथ आहे आपल्या दोघांची 

वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा

7.तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन

ADVERTISEMENT

तुझ्या सारं जग मी फुलांनी सजवेन

तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन

मला मी तुझ्या रंगात रंगवेन 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

8.नदीला काठ दे

माझ्या वाटेला वाट दे

अडकला आहे माझा जीव तुझ्यात

आता फक्त तू आयुष्यभर साथ दे

ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9.प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी नव्याने प्रेमात पडते

आयुष्यभर तुझ्यासोबत जगण्याच्या स्वप्नात सतत रंगून जाते

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

10.आयुष्यात एक नातं असावं दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणारं

जगाला दाखवण्यासाठी नाही पण आपल्या दोघांचे एक जग निर्माण करणारं 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes And Quotes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Funny Happy Birthday Wishes Marathi Kavita

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

वाढदिवस म्हणजे धमाल मस्ती तेव्हा एखाद्या खास व्यक्तीच्या वाढदिवसासाठी अशा मजेशीर विनोदी वाढदिवस शुभेच्छा कवितांमधून पाठवायलाच हव्या (Birthday Poem In Marathi)

1.माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या मित्राला प्रगटदिनाच्या एक कंटेनर, एक टमटम, एक छोटा हत्ती, दहा ट्रक, अकरा ट्रॅक्टरभरून शुभेच्छा…

2.आली लहर केला कहर

भाऊच्या वाढदिवसाला सगळं गाव हजर

ADVERTISEMENT

अशा लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

3.साखरेसारख्या गोड मित्राला मुंग्या लागेपर्यंत 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

4.तुझा वाढदिवस आमच्यासाठी पर्वणीच असते,

ADVERTISEMENT

कारण या दिवशी छोटी मोठी कशीही असो पार्टी ठरलेली असते

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

5.पावसाळे मे ऊन पड्या

उन्हाळे मे गारा

ADVERTISEMENT

थंडी मे पड्या पाऊस 

और तेरा वाढदिवस मात्र आज पड्या

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

6. जल्लोष आहे गावाचा

ADVERTISEMENT

 कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा

अशा आमच्या मनमिळावू 

आणि सर्वांना पटकन पार्टी देणाऱ्या भावास

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

7. प्रेमाच्या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी मी आज पोटभर जेवतो आहे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

8. पृथ्वीवरील माझ्या सर्वात आवडत्या प्राण्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

ADVERTISEMENT

लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister In Marathi)

05 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT