ADVERTISEMENT
home / Recipes
Biscuit Cake Recipes In Marathi

बिस्किटांपासून बनवा मस्त केक, बिस्किट केक रेसिपी (Biscuit Cake Recipes In Marathi)

 

लॉकडाऊनचा आनंद घेत खूप जणांनी वेगवेगळ्या रेसिपी शिकून घेतल्या. वेगवेगळे पदार्थ आणि जिन्नस आतापर्यंत खूप जणांनी ट्राय केले असतील.केक हा या काळात खूप जणांनी इतका मिस केला की, घरच्या घरी कमीत कमी साहित्यातून बेकिंगचीही सवय अनेकांनी लावून घेतली. तर अनेकांनी चॉकलेट रेसिपीज ट्राय केल्या. लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या बिस्किटांचा केक बनवणे हे देखील अनेकांनी ट्राय केले आहेत. हो कोणतेही साहित्य नसेल आणि तुमच्याकडे फक्त बिस्किटं असतील तरी देखील तुम्ही त्यांचा उपयोग करुन केक बनवू शकतात. मुलांनी केकची फर्माईश केली की अगदी 10 ते15 रुपयांत तुम्हाला घरीच मस्त गरमगरम केक तयार करता येतो. बिस्किटांपासून बनवलेले केक हे इतके परफेक्ट असतात की, तुम्हाला इतर कोणताही केक खाण्याची इच्छा होणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी शोधून काढल्या आहेत वेगवेगळ्या बिस्किटांपासून तयार केलेले हे सोप्यात सोपे केक असून तुम्ही या बिस्कीट केक रेसिपी (biscuit cake recipes in marathi) मराठी अगदी बिनधास्त ट्राय करायला हव्यात

ओरिओ बिस्किट केक रेसिपी मराठी (Oreo Biscuit Cake Recipe In Marathi)

Oreo Biscuit Cake Recipe In Marathi

Oreo Biscuit Cake Recipe In Marathi

ओरिओ हे बिस्कीट सध्या सगळ्यांच्याच आवडीचे आहे. सध्या ही बिस्किट वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतात. या बिस्किटांपासून खूप छान केक बनतो. जाणून घेऊया ओरिओ बिस्कीटचा केक रेसिपी

ADVERTISEMENT

साहित्य:  1 ओरिओ बिस्किटांचा पुडा, आवश्यकेनुसार पाणी, एक मोठा चमचा तेल, एक मोठा टोप, केक टिन आणि जाळी

कृती:

  • सगळ्यात आधी ओरिओ बिस्किट घेऊन तुम्ही त्याचे क्रिम काढून टाका. आता फक्त बिस्किटं घेऊन त्याची मिक्सरमध्ये पूड करुन घ्या. 
  • केकची पूड चांगली झाल्यावर ती एका भांड्यात काढून त्यामध्ये एक चमचा तेल आणि रिबीन इतके केकचे बॅटर होईल एवढे त्यामध्ये पाणी घाला. 
  • आता तयार बॅटर एका ग्रीस केलेल्या भांड्यात भरुन मायक्रोव्हेवमध्ये हे बॅटर 5 मिनिटांसाठी बेक करा आणि गॅसवर करत असाल तर तुम्ही पाच मिनिटांसाठी केक ठेवा. 
  • केक तयार झाला हे पाहण्यासाठी तुम्ही त्यामध्ये टुथपीक घालून बघा. टुथपीक स्वच्छ निघाला म्हणजे केक झाला असे समजा.
  • आता हा केक तुम्ही काढून ठेवलेली क्रिम मेल्ट करुन सजवा. ही क्रिम मेल्ट करण्यासाठी मायक्रोव्हेव करा किंवा डबलबॉयलरमध्ये मेल्ट करुन मग वर पसरवा.हा केक छान लागतो. 

पारले बिस्किट केक मराठी (Parle Biscuit Cake Recipe In Marathi)

Parle Biscuit Cake Recipe In Marathi

Parle Biscuit Cake Recipe In Marathi

ADVERTISEMENT

पारले बिस्किट हे असे बिस्किट आहे जे सगळ्यांकडे असते. जर तुमच्याकडे अगदी कोणतेही फॅन्सी बिस्किट नसेल अशावेळी तुम्ही पारले बिस्किटांपासून मस्त बिस्किट केक बनवू शकता.

साहित्य: पारले जी बिस्किट, दूध, तेल, मायक्रोव्हेवचे भांडे , सजावटीसाठी काजू किंवा बदाम, आवडीचा इसेन्स

कृती:

  • पारले जी बिस्किटांचा चुरा करुन घ्या. मिक्सरमध्ये त्याचा चुरा करुन घेतला तरी चालेल. त्यामध्ये मावेल इतके दूध आणि अगदी एक चमचाभर बटर किंवा तेल घालून सगळे एकजीव करुन घ्या. 
  • फ्लो होईल इतके बॅटर तयार झाले की, केक टिनला तेल लावून घ्या आणि बॅटर ओतून घ्या. त्यावर आवडीचे ड्रायफ्रुट पेरा. साधारण 3 ते 5 मिनिटांसाठी केक बेक करायला ठेवून द्या.

हॅपी हॅपी बिस्किट केक रेसिपी मराठी (Happy Happy Biscuit Cake Recipe In Marathi)

Happy Happy Biscuit Cake Recipe In Marathi

ADVERTISEMENT

Happy Happy Biscuit Cake Recipe In Marathi

बाजारात काही खास ब्रँडचे बिस्किट मिळतात त्यांचा उपयोग करुनही तुम्हाला छान केक करता येऊ शकतो. हॅपी हॅपी ही अशी बिस्किट आहेत ज्यापासून तुम्ही केक अगदी हमखास बनवून पाहायला हवा.

साहित्य: हॅपी हॅपी बिस्किट पुडा, एक चमचा तेल, इनो फ्रुट सॉल्ट, दूध, 1 चमचा मोठा साखर

कृती: 

ADVERTISEMENT
  • एका मिक्सरच्या भांड्यात हॅपी हॅपी बिस्किटचा पुडा, साखर घेऊन ते मिक्सरच्या भांड्यात पूड करुन घ्या. 
    ते मिश्रण घेऊन दूध आणि तेल घालून त्यामध्ये इनो फ्रुट सॉल्ट टाका. आता कुकर गरम करुन ते सगळे बॅटर केक टीनमध्ये ओता. 7 ते 10 मिनिट ठेवा. तुमचा केक तयार.

(टीप: केक टीनमध्ये बटर पेपर ठेवा म्हणजे केक चिकटणार नाही. फ्रुट सॉल्ट सगळ्यात शेवटी घाला. म्हणजे केक फुगण्यास मदत मिळेल.)

बॉरबन बिस्किट केक रेसिपी मराठी (Bourbon Biscuit Cake Recipe In Marathi)

Bourbon Biscuit Cake Recipe In Marathi

Bourbon Biscuit Cake Recipe In Marathi

साखर लावलेली बॉरबन बिस्किटं ही तुम्ही सगळ्यांनीच खाल्ली असेल. या बिस्किटांपासून मस्त केक बनवता येतो. अगदी तीन साहित्यामध्ये हा केक बनवता येईल.

ADVERTISEMENT

साहित्य:  बॉरबन बिस्किटचा एक पुडा, इनो फ्रुट सॉल्ट, दूध

कृती: 

  • बॉरबन बिस्किट घेऊन त्याचा मिक्सरमध्ये चुरा करुन घ्या. तो चुरा एका भांड्यात काढून हळुहळू दूध घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. 
  • कुकर गरम करायला ठेवा. त्यानंतर टीन ग्रीस करुन घ्या. बॅटर टीनमध्ये ओतून कुकरमध्ये ठेवा. साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी ठेवा. केक तयार.

मारी बिस्किट केक रेसिपी मराठी (Marie Biscuit Cake Recipe In Marathi)

Marie Biscuit Cake Recipe In Marathi

Marie Biscuit Cake Recipe In Marathi

ADVERTISEMENT

मारी बिस्किट हे देखील तुम्ही नियमित खाल्ले असेल. मारी बिस्किटचा उपयोग करुन तुम्ही मस्त केक बनवू शकता. हे केक चवीला फारच मस्त आणि टेस्टी लागतात.

साहित्य: मारी बिस्किटचा पुडा, दूध, बेकिंग सोडा, पिठी साखर

कृती:

  • मारी बिस्किट मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका भांड्यात बिस्किटांचा चुरा घेऊन त्यामध्ये पिठी साखर, दूध आणि बेकिंग सोडा घालून एकजीव करुन घ्या.
  • केक टीनमध्ये बॅटर घालून केक बेक करुन घ्या.  तुमचा मारी केक तयार. मारी बिस्किटांसाठी साखर घालणे खूपच गरजेचे असते. 

चॉकलेट बिस्किट केक रेसिपी मराठी (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)

Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi

ADVERTISEMENT

Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi

जर तुमच्याकडे कोणतीही चॉकलेट बिस्किटं असतील तरी देखील तुम्हाला चॉकलेट बिस्किट केक करता येऊ शकतो. चला जाणून घेऊया चॉकलेट बिस्किटांपासून कसा बनवायचा चॉकलेट केक

साहित्य:  मिक्स चॉकलेट बिस्किट, दूध, पिठीसाखर, बेकिंग सोडा, केक टीन, बटर पेपर

कृती:

ADVERTISEMENT
  • बिस्किटांची पूड करुन घ्या. एका भांड्यात ही पूड काढून घ्या. मावेल इतके दूध घाला. 
  • एक छान पेस्ट तयार झाल्यावर त्यामध्ये पिठी साखर घालून एकजीव करा. सगळ्यात शेवटी बेकिंग सोडा घाला. 
  • भांडे प्री हिट करायला ठेवा. त्यामध्ये हे बॅटर ओतून केक बेक करायला घ्या. हा केक होण्यासाठी मायक्रोव्हेवमध्ये 5 मिनिटं आणि कुकरमध्येही साधारण तेवढाच वेळ जातो. 

अक्रोड बिस्किट केक (Walnut Biscuit Cake Recipe In Marathi)

Walnut Biscuit Cake Recipe In Marathi

Walnut Biscuit Cake Recipe In Marathi

खूप जणांना ड्रायफ्रुट घालून केलेले केक खूप जास्त आवडतात. जर तुम्हाला असे केक आवडत असतील तर तुम्ही अक्रोड घालून आणि कोणतीही बिस्किट घेऊन छान केक करु शकता.

साहित्य:  कोणतीही बिस्किट, अक्रोडचे तुकडे, दूध, साखर, केक टीन,इनो कुकर किंवा मायक्रोव्हेव टीन, बटर किंवा बटर पेपर

ADVERTISEMENT

कृती:

  • मिक्स बिस्किटांची पावडर करुन घ्या.दुसरीकडे पॅनवर थोडे बटर गरम करुन त्यामध्ये अक्रोडचे तुकडे छान भाजून घ्या. 
  • मिक्स बिस्किट पावडरमध्ये साखर, दूध घाला. कुकर प्रीहिट करुन घ्या. केक टीनला ग्रीस करुन त्यावर बटरपेपर घाला. 
  • तयार केक बॅटरमध्ये इनो घालून एकजीव करा आणि केकचे बॅटर टीनमध्ये ओतून घ्या. त्यावर रोस्टेट अक्रोड घालून केक चांगला शिजवून घ्या.

असे बनवा घरीच तुमचे आवडते आईस्क्रिम केक (Ice Cream Cake Recipe In Marathi)

ओरिओ बिस्किट केक विथ गनाश (Oreo Biscuit Cake With Ganache)

Oreo Biscuit Cake With Ganache

Oreo Biscuit Cake With Ganache

ADVERTISEMENT

सध्या सगळ्यात जास्त हिट झालेले असा एकमेव केक म्हणजे ओरिओचा केक आता त्याला थोडा प्रोफेशनल लुक देण्यासाठी जर तुम्ही त्यावर गनाश टाकले तर तुम्हाला दुकानाच्या केकची आठवण मुळीच होणार नाही.  

साहित्य: 1 ओरिओ बिस्किटांचा पुडा, आवश्यकेनुसार पाणी, एक मोठा चमचा तेल, एक मोठा टोप, केक टिन आणि जाळी

कृती:

  •  सगळ्यात आधी ओरिओ बिस्किट घेऊन तुम्ही त्याचे क्रिम काढून टाका. आता फक्त बिस्किटं घेऊन त्याची मिक्सरमध्ये पूड करुन घ्या. 
  • केकची पूड चांगली झाल्यावर ती एका भांड्यात काढून त्यामध्ये एक चमचा तेल आणि रिबीन इतके केकचे बॅटर होईल एवढे त्यामध्ये पाणी घाला. 
  • आता तयार बॅटर एका ग्रीस केलेल्या भांड्यात भरुन मायक्रोव्हेवमध्ये हे बॅटर 5 मिनिटांसाठी बेक करा. आणि गॅसवर करत असाल तर तुम्ही पाच मिनिटांसाठी केक ठेवा. 
  • केक तयार झाला हे पाहण्यासाठी तुम्ही त्यामध्ये टुथपीक घालून बघा. टुथपीक स्वच्छ निघाला म्हणजे केक झाला असे समजा.

गनाशसाठी:  फ्रेश क्रिम, डार्क चॉकलेट

ADVERTISEMENT

कृती:

  • एका भांड्यात फ्रेश क्रिम आणि त्याच्या निम्मे डार्क चॉकलेट मेल्ट करुन घ्या. पूर्ण मेल्ट झाला की, तुमचे गनाश तयार. हे गनाश तयार केकवर पसरा.

 आता बिस्किटांचे वेगवेगळे केक नक्की करा तुम्हाला बेकरीतल्या केकची अजिबात आठवण होणार नाही.

25 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT