ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
घरात येणाऱ्या काळ्या मुंग्या अथवा डोंगळे असतो का शुभ-अशुभ संकेत...जाणून घ्या

घरात येणाऱ्या काळ्या मुंग्या अथवा डोंगळे असतो का शुभ-अशुभ संकेत…जाणून घ्या

घरामध्ये मुंग्या येणं ही तशी अगदीच कॉमन गोष्ट आहे. कधी भींतीवर तर कधी स्वयंपाकघरात मुंग्या दिसतातच. पण मुंग्या घरातून जाव्या यासाठी घराघरात अनेक उपाय करण्यात येतात. पण हे फारच कमी लोकांना माहीत आहे की, घरात मुंग्या अथवा डोंगळे येणं हे शुभ अथवा अशुभ संकेत असतात. काही लोकांना हे पटत नाही तर काही लोकांना हे पटतं. बऱ्याचदा लोक हे अत्यंत सामान्य आहे असं म्हणून दुर्लक्ष करतात पण मुंग्या आणि डोंगळ्याचे जास्त प्रमाणात घरात अचानक येणं  हे शुभ आणि अशुभ संकेत देतात असं अनेक जाणकारांनाही सांगितलं आहे.  इतकंच नाही तर तुमच्या घरातील आर्थिक परिस्थितीबाबतही यांची उपस्थिती जाणवून देते तसंच भविष्यातील होणारं नुकसानही यामुळे कळू शकतं असं अनेक ज्योतिषांनीही सांगितले आहे. नक्की काय शुभ – अशुभ संकेत आहेत ते पाहूया.  

जन्मभर एकमेकांना साथ देतात ‘या’ चार राशीच्या व्यक्ती

काय आहे शुभ – अशुभ संकेत

Instagram

ADVERTISEMENT
  • घरामध्ये  जर लाल मुंग्या अचानक आल्या तर त्याला अशुभ संकेत समजण्यात  येतो. काही ज्योतिषशास्त्रानुसार, लाल मुंग्या घरात आल्याने आर्थिक संकटाचा सामना  करावा लागू शकतो. तसंच तुमच्या घरात अचानक लाल मुंग्या दिसू लागल्या तर तुम्हाला कोणाकडून तरी कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे असंही समजले जाते. त्यामुळे लाल मुंग्या घरातून लवकरात लवकर बाहेर जातील याची काळजी घ्यायला हवी. मात्र यांना मारून टाकणं यावर उपाय नाही. तुम्ही लिंबू, तेजपत्ता अथवा काळ्या मिरीच्या सहाय्याने लाल मुंग्यांना घराबाहेर काढू शकता. 
  • घरात जर काळ्या मुंग्या आल्या तर याला शुभ संकेत मानले जाते. जर अचानक तुम्हाला घरात काळ्या मुंग्यांचा वावर दिसू लागला तर तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठा बदल घडणार याचे हे शुभसंकेत मानले जातात. त्यामुळे या मुंग्यांना तुम्ही मारून टाकू नका अथवा त्यांच्यावर काही औषध टाकू नका.  तुम्ही या मुंग्यांना अधिक पीठ घालून त्यांना खायला द्या.  काही दिवसात आपणहूनच या मुंग्या घरातून निघून जातील.  तुम्हाला त्यासाठी काहीही वेगळं करायची गरज नाही. 
  • तुम्हाला घरामध्ये जर काळ्या मुंग्या दिसल्या तर घरामध्ये  सुख – समृद्धी  येणार असल्याचे हे शुभ संकेत मानले जातात. तसंच तुम्हाला समाजामध्ये सन्मानही प्राप्त होतो

या राशीच्या जोड्या ज्या एकमेकांसह असतात बेस्ट

  • तुम्हाला तांदळाच्या डब्यात काळ्या मुंग्या दिसल्या तर तुम्हाला लवकरच धनप्राप्ती होणार असल्याचे हे शुभ संकेत मानले जाते. तसंच तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळणार असून जास्त कमाई होणार असल्याचेही हे संकेत आहेत
  • कोणत्याही तुमच्या सोन्याच्या वस्तूवर काळ्या मुंग्या दिसल्या तर हे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी होणार असल्याचे हे शुभसंकेत मानले जातात
  • तुमच्या घराच्या छतावर काळ्या मुंंग्या आल्या असतील तर यामुळेदेखील तुम्हाला धनलाभ होणार असल्याचे संकेत मिळतात. तुमच्या घरातील भौतिक सुखामध्ये वृद्धी होते असे समजण्यात येते 
  • घरात  अचानक खूप काळे डोंगळे आले तर ते शुभ मानले जाते.  घरात अचानक चांगल्या गोष्टी घडणार असल्याचे संकेत आहेत. मात्र हेच जर लाल डोंगळे आले तर घरावर लवकरच काहीतरी संकट येणार असल्याचे समजण्यात येते
  • उत्तर अथवा दक्षिण दिशेने काळ्या मुंग्या आल्या तर कुटुंबामध्ये भरभराट होणार असल्याचे शुभसंकेत मानले जाते. पण जर घराच्या पूर्व दिशेने काळ्या  मुंंग्या  येत असतील तर मात्र घरात काहीतरी नकारात्मक घडणार असल्याचे संकेत असतात.  घराच्या पश्चिम दिशेने मुंग्या निघाल्या तर तुम्हाला मनाविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो असंही सांगण्यात येते. 

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

(सर्वात महत्वाचे म्हणजे या लेखातून कोणाच्याही भावना दुखवायचा आमचा हेतू नाही. ही केवळ माहिती आहे. कोणत्याही अंधश्रद्धेला आम्ही प्रोत्साहन देत नाही)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT

 

25 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT