ADVERTISEMENT
home / Mythology
जाणून घ्या, काच फुटणे शुभ की अशुभ?

जाणून घ्या, काच फुटणे शुभ की अशुभ?

कुटुंबाची काळजी ही प्रत्येकालाच असते. कुटुंबाच्या काळजी पोटीच घरात काहीतरी मनासारखे घडले नाही की, उगाचच मनात धाकधूक वाटत राहते. काही गोष्टी झाल्या की शुभ आणि काही गोष्टी झाल्या की अशुभ अशा संकल्पना आपणच आपल्या मनाशी ठरवलेल्या असतात. घरातील काच या वस्तूबद्दलही अनेकांच्या मनात नको नको ते विचार येत असतात. काच फुटणे हे काही जण अशुभ मानतात. एखाद्या चांगल्या कार्यक्रमाप्रसंगी काच फुटली की उगाचच काहींना नको ते वाटण्यास सुरुवात होते. तर काही जण मात्र संकट टळले असे म्हणत ती वेळ मारुन नेतात. पण काच फुटणे शुभ की अशुभ? याचा नेमका कसा अर्थ घ्यायचा आणि सकारात्मक विचार करायचा ते आपण आता पाहुया.

नवजात बाळाच्या बेडरूमसाठी खास वास्तू टिप्स

काय म्हणते वास्तुशास्त्र?

तुुटलेली काच

Instagram

ADVERTISEMENT

काचेच्या अनेक वस्तू आपल्या घरात असतात. अगदी लिव्हिंग रुमपासून ते बेडरुमपर्यंत वेगवेगळ्या वस्तूंमध्ये काचेचा उपयोग केलेला असतो. काही वेळा काच ही अनावधाने हातातून पडून फुटते. तर कधी कधी अचानक काच फुटते.अशावेळी काच फुटणे हे कोणते तरी मोठे संकट टळून गेले असे सांगितले जाते. कुटुंबावर येणारे संकट घरात असणाऱ्या काचेने घेतले असे म्हटले जाते. त्यामुळे काच फुटणे याला अशुभ मुळीच म्हणता येत नाही. जर याचा सकारात्मक विचार केला तर काच फुटल्यामुळे तुमचे नुकसान न होता तुम्हाला समाधान मिळत असेल तर तुम्ही त्या सकारात्मक गोष्टीचा विचार करा. तुमचे कुटुंब सुरक्षित आहे याचा विचार करुन तुम्ही काच फुटणे शुभ की अशुभ याचा विचार करणे सोडून द्या 

वास्तुशास्त्रानुसार सुख-समृद्धीसाठी घरात असावेत हे पाळीव प्राणी (Pets For Home In Marathi)

फुटलेली काच घरात ठेऊ नका

काचेची कोणतीही तुटलेली वस्तू घरात ठेऊ नका असे सांगितले जाते. यामागेही काही कारणं आहेत. वास्तुशास्त्रानुसार अनेकजण फुटलेली काच घरात तशीच ठेवून देतात. ती फेकून देत नाही. काच घरातून टाकताना ती कशी टाकायची ही भीती असते. म्हणून जरासे जरी हे भांडे फुटले की, ते जोपर्यंत वापरता येईल तो पर्यंत वापरले जाते. पण फुटलेली काच घरात ठेवणे मुळीच चांगले नाही. वास्तुशास्त्रानुसार फुटलेली काच घरात ठेवली तर नकारात्मक उर्जा वाढू लागते.  जर घरात तुटलेली काच राहिली तर ती उगाचच संकटांना चालना देते असे म्हटले जाते म्हणून ही काच बाहेर काढा असे सांगितले जाते. पण त्याशिवायही फुटलेली काच घरात ठेवणे मुळीच चांगले नाही. कारण फुटलेली काच घरात राहिली की ती नकारात्मक उर्जा देण्यापेक्षाही जास्त ही काच लागून दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काच फुटली असेल तर ही काच घरातून योग्यपद्धतीने बाहेर काढून टाका. 

मनाला शांत ठेवण्यासाठी फॉलो करा या वास्तू टिप्स

ADVERTISEMENT

विज्ञान काय म्हणते?

काच ही फारच नाजूक गोष्ट आहे. काच ही साधा धक्का लागूनही फुटू शकते. त्यामुळे काच फुटण्यामागे फार डोकं लावण्यात काहीही अर्थ नाही.काहीही कारण नसताना जर काच फुटत असेल तर काच ही कमजोर झालेली आहे असे समजा. कारण काचेवर उन जरी जास्त पडले तरी देखील ती काच कमजोर होऊ शकते. त्यामुळेही ती तुटू शकते. विज्ञान शुभ अशुभ ही गोष्ट अजिबात मानत नाही. कारण काचेचे फुटणे हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून एखादी वस्तू फुटणे असे आहे. त्यामुळे तुम्ही याचा फार विचार करु नका. 

एखाद्या वस्तूचे फुटणे हे तुमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी ठरवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही याचा फार विचार करणे सोडून द्या

27 Dec 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT