कोरोनामुळे सध्या भारतात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र या काळात अनेकांना घर खरेदी करण्याची अथवा विकण्याची गरज लागू शकते. ट्रान्सफर झाल्यामुळे, नव्या शहरात आल्यामुळे अथवा लग्न झाल्यामुळे अशा अनेक कारणांमुळे तुम्ही तुमचं जुनं घर विकू अथवा नवीन घर खरेदी करू शकता. शिवाय मागील दोन वर्षांपासून घर खरेदी आणि विक्रीवर परिणाम झालेला असल्यामुळे सध्या घरांच्या किंमती तुलनेने नक्कीच कमी झालेल्या आहेत. यासाठीच कोरोना महामारीच्या काळात जर तुम्हाला तुमच्या घराची विक्री अथवा खरेदी करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा आहे. घर खरेदी अथवा विक्री करताना या गोष्टी मात्र तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
कोरोनाच्या काळात केलेली घर खरेदी अथवा विक्री
कोरोना महामारीच्या काळात तुम्हाला घराचा निर्णय घ्यावा लागला तर या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरू शकतील.
घरासाठी ऑनलाईन सर्च करा –
या काळात घर खरेदी करण्यासाठी अथवा घर विक्री करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पोर्टलचा वापर करू शकता. कारण सध्या अशा अनेक हाऊसिंग वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी आणि हव्या त्या बजेटमध्ये घर मिळवून देऊ शकतात. घर शॉर्टलिस्ट करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. कारण सध्या थेट सोसायटीमध्ये एजंट मार्फत घर बघण्यासाठी जाणं नक्कीच शक्य नाही.
तज्ञ्ज व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या –
कोरोना महामारीच्या काळात घर खरेदी करणार असाल तर ऑनलाईन सर्च करण्यापूर्वी तिथे राहणाऱ्या मित्रमंडळी अथवा ओळखीच्या लोकांची मदत घ्या. ज्यामुळे तुम्ही कोणत्या ठिकाणी, तुमच्या बजेटनुसार घर खरेदी करू शकता याचा योग्य अंदाज तुम्हाला मिळेल. शिवाय वर्तमान पत्र, वृत्त वाहिन्यांवर प्रॉपर्टीबाबत मिळणारे अपडेट्स तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरू शकतात.
होम लोनमध्ये मिळेल फायदा-
जर तुम्ही कोरोनाच्या काळात घर खरेदीचा निर्णय घेतला असेल तर होम लोन घेत घर खरेदी करणं तुमच्या फायद्याचं ठरेल. कारण सध्या कोरोना महामारीमुळे होम लोनचे व्याजदर कमी झाले आहेत. शिवाय होम लोन देणाऱ्या बॅंका सध्या ग्राहकांना चांगल्या ऑफरदेखील देत आहेत. ज्यामुळे तुमच्या घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते. काही बॅंका या दरम्यान ग्राहकांनी होम लोन घ्यावे यासाठी प्रोसेसिंग फीपण कमी घेत आहेत.
घर खरेदीसाठी योग्य काळ-
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात घरांच्या खरेदी विक्रीवर खूप परिणाम झाला आहे. बऱ्याच ठिकाणी चालू असलेले बांधकाम बंद करण्यात आले आहे. ज्यामुळे या काळात घरांच्या किंमतीमध्ये बरीच घसरण झालेली दिसून येत आहे. अर्थातच ग्राहकांसाठी हा काळ घर खरेदीसाठी अतिशय उत्तम आहे.
सबसिडीचा वापर करा –
तुम्ही पहिल्यांदा घर खरेदी करत असाल तर तुम्हाला तुमच्या घर खरेदीसाठी प्रधानमंत्री निवास योजनेचा लाभ घेता येईल. या योजने अंतर्गत तुम्हाला होम लोनमध्ये सबसिडी देण्यात येईल. ज्यामुळे तुमचे कमी पैशांमध्ये घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मात्र या योजनेचा लाभ फक्त पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच घेता येते.
फोटोसौजन्य – pexels
अधिक वाचा –
घर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय
नवीन घरी शिफ्ट होताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya): घर खरेदी आणि गृहप्रवेशासाठी शुभ काळ