लहान असेपर्यंत मुलांनी अंथरुणात लघवी करणे हे अगदी स्वाभाविक असते.पण मुलं मोठं झाल्यानंतरही मुलांना लघवी अंथरुणात होत असेल तर ही गोष्ट मुलांसाठीच फार लाजिरवाणी ठरते. मुलांच्या पालकांनाही याची चिंता सतावू लागते की आपली मुलं बाहेर गेली, त्यांची ही सवय सगळ्यांना कळली की, त्याला त्याचा आणखी त्रास होईल असे वाटू लागते. मुलं अंथरुणात लघवी करत असतील तर त्याच्या मनातही उगीचच शंका निर्माण होते. मुलांनाही टेन्शन येऊ लागते. तुमच्याही मुलांना असा त्रास होत असेल तर मुलांच्या पाठिशी राहून काही उपाय केले तर मुलांची ही समस्या दूर होऊ शकेल.
वडिलांची सोबत मुलांसाठी महत्त्वाची (Father’s Role In Childs Life)
मुलांशी बोला रागावू नका
खूप जणांच्या घरी गेल्यानंतर मुलं ज्यावेळी अंथरुणात लघवी करतात. त्यावेळी त्यांचे हसू होते. अशावेळी पालकांना हा खूप अपमान आहे असे वाटू लागते. अशावेळी मुलांना ओरडणे हा एकमेव पर्याय पालकांना वाटू लागतो. जर मुलाने अंथरुणात लघवी केलेली कळाल्यानंतर तुम्ही त्यांना ओरडत असाल तर असे अजिबात करु नका. कारण असे केल्यामुळे मुलांच्या मनावर त्याचा अधिक परिणाम होतो. इतकेच नाही तर मुलं मानसिक तणावाखाली येऊन अंथरुणात लघवी करतात. त्यामुळे त्यांना हा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही अगदी हमखास मुलांशी संवाद साधा.
संध्याकाळी पाणी कमी द्या
लघवीचा त्रास हा मुलांना पाणी अधिक प्यायल्या दिल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. शक्यतो संध्याकाळी 6 नंतर मुलांना कमीच पाणी द्या. पाणी कमी दिल्यामुळे त्यांना झोपेत शक्यतो लघवीचा त्रास होत नाही. शरीरात पाणी कमी झाल्यामुळे त्याचे रुपांतर एनर्जीमध्ये होते. त्याचे रुपांतर लघवीत होत नाही. याकारणासाठी मुलांना संध्याकाळी 6 नंतर शक्यतो जास्त पाणी पिण्यास लावू नका. ही सवय किमान दोन ते तीन महिने लावा. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यामध्ये झालेला फरक हा नक्कीच जाणवेल.
झोपताना लघवी करायला लावा
मुलांना झोपवताना त्यांना झोपण्याआधी लघवी करायला लावा. मुलांनी पाणी प्यायले असेल तर त्यांना अगदी हमखास झोपायला जाण्यापूर्वी लघवीला जायला लावा. त्यामुळे मुलांना रोज रात्री झोपण्यापूर्वी लघवीला जायची सवय लागेल. ही सवय त्यांच्याासाठी फारच फायद्याची ठरेल कारण त्यामुळे त्यांना रात्री लघवी होण्याची शक्यता कमी असते. जर तुम्हाला शक्य असेल तर मुलांना तुम्ही मध्यरात्री किंवा पहाटे उठवून एकदा लघवी करायला लावा. असे केल्यामुळे लघवी झाल्यानंतर बाथरुममध्ये उठून जाण्याची सवय त्यांना अगदी हमखास लागेल.
रात्री थंड पदार्थ खायला देऊन नका
मुलांना रात्री आईस्क्रिम खायला देण्याची सवय असते किंवा मुलंच हट्ट करतात. मुलांना लागलेली ही सवय आताच सोडून द्या. कारण मुलांना अशी सवय लागली की ती जाता जात नाही. त्यामुळे मुलांना रात्री थंड असे पदार्थ खायला देऊ नका. ही सवय योग्य वेळी मोडली तर त्यांना होत असलेला लघवीचा त्रास होणार नाही.
बाळाच्या जन्मानंतर ‘या’ गोष्टींमुळे येऊ शकतो पतीपत्नीमध्ये दुरावा
लघवी थांबवायला शिकवा
सकाळच्या दिवसात मुलांना लघवी झाल्यानंतर त्यांना लघवी थांबवायला शिकवा. त्यामुळे मुलांना झोपेत लघवी धरुन ठेवण्याची क्षमता निर्माण होते. पण ही लघवी रोखून धरण्याची सवय मुळीच जास्त नको. कारण जास्त काळासाठी लघवी धरुन ठेवली तरी देखील मुलांना त्रास होण्याची शक्यता असते. डायपरसारखा पर्याय जास्त वापरल्यामुळे मुलांना बाथरुममध्ये जाऊन लघवी करण्याची सवय मुलांना लागत नाही. त्यामुळे त्या भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत नाहीत. त्यामुळे अगदी काही मिनिटांसाठी लघवी रोखायला धरणे त्यांना शिकवा
अशाप्रकारे मुलांची अंथरुणात लघवी करण्याची सवय अगदी काहीच महिन्यात तुम्ही सोडवू शकला.