सर्व लहान मुलांना आणि पालकांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा… पालकांसाठी हा लेख खास आहे कारण जर तुम्ही नुकतेच आईबाबा झाला असाल तर तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी एक अनमोल गिफ्ट तुम्ही यातून तयार करू शकता. याचं कारण असं की यंदा तुमचं बाळ खूप लहान असल्यामुळे त्याला बालदिन म्हणजे नेमकं काय हे समजणार नाही. पण तुम्ही मात्र त्याच्यासोबत हा दिवस मस्त आनंदात घालवू शकता. शिवाय मोठं झाल्यावर त्याला त्याचं बालपण समजून घेण्यासाठी बालपणीच्या या सुंदर आठवणी साठवून ठेवू शकता. ज्यामुळे त्याला मोठेपणी देखील त्याचं बालपण आहे तसं अनुभवता येईल.
जर तुमचं बाळ तान्हं असेल तर त्याच्या हात आणि पावलांचे ठसे, पहिल्या दिवशी घातलेले कपडे अशा अनेक गोष्टी तुम्ही आताच जतन करून ठेवू शकता. त्याचप्रमाणे पहिल्यांदा त्याचं रांगणं, उभं राहणं, चालण्यास शिकणं व्हिडिओ स्वरूपात साठवून ठेवू शकता. तान्ह्या बाळाच्या या वर्षभराच्या आठवणी कशा जपून ठेवायच्या यासाठी या काही टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.
अविस्मरणीय फोटोशूट –
सध्या पहिल्या वर्षी बाळाचा प्रत्येक महिन्याला वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आहे. हे बाराही महिन्याचे फोटो थीम फोटो तुम्ही साठवून ठेवू शकता आणि त्याच्या पहिल्या वाढदिवशी ते सजावटीमध्ये वापरू शकता. तान्हे असताना बाळ शांत असते अथवा नेहमी झोपलेले असते. त्यामुळे त्याचे असे गोंडस फोटो मोठेपणी पाहणं नक्कीच मजेशीर असेल.
आठवणींचा पेटारा –
एक छान बॉक्स तुम्ही तुमच्या बाळाच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी डिझाईन करून घेऊ शकता. ज्यामध्ये त्याचे पहिले कपडे, हातापायाचे ठसे, फोटो, दुधाची बाटल अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवता येतील . हा बॉक्स त्यांच्या काही मोजक्या फोटोजने कस्टमाईझ करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला तो आयुष्यभर व्यवस्थित जपून ठेवता येईल. मोठेपणी त्याला एखाद्या दिवशी सरप्राईझ देण्यासाठी ही एक छान कल्पना ठरेल. कारण प्रत्येकाला त्याचं बालपण नेहमीच हवंहवंसं वाटत असतं. ज्यामुळे हे गिफ्ट एखाद्या महागड्या भेटवस्तू पेक्षा मौल्यवान असू शकेल.
डायरी मेंटेन करा –
आजकाल लहान मुलांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी बाजारात छान इन्फोग्राफिक्स मिळतात. ज्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार डिझाईन करून घेऊ शकता. ज्यामध्ये तुमच्या बाळाची जन्मतारिख, जन्मवेळ, जन्मस्थळ, बाळाचं जन्माच्या वेळी असलेलं वजन, पुढए बाळाच्या वाढ आणि विकासामध्ये होत जाणारा प्रत्येक बदल वर्षभर तुम्ही नोंद करून ठेवू शकता. बाळाच्या आरोग्यासाठी अशी नोंद करून ठेवणं नक्कीच गरजेचं आहे. मात्र जर या डायरीला असं छान स्वरूप आणि डिझाईन असेल तर मोठेपणी हे एक छान गिफ्ट ठरू शकतं.
बाळाचा व्हिडिओ तयार करा –
बाळाच्या पहिल्या वाढदिवशी सर्वांना पार्टीमध्ये दाखवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता. ज्यामध्ये तुम्ही बाळाचे वर्षभराचे असे काही क्षण टिपून ठेवू शकता. जे तुमच्यासाठी आणि त्याच्यासाठी अविस्मपणीय असतील. शिवाय कधी कधी पालकापैकी एकाला कामानिमित्त मुलांपासून दूर राहावं लागतं,अशावेळी जर तुम्ही ते क्षण अनुभवले नसतील तर कमीत कमी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते नव्याने अनुभवू शकता. प्रत्येकाचं बालपण खास असतं आणि प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी निराळ्या असतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खास ठरेल.
त्याचप्रमाणे बाळाच्या नियमित स्वच्छता आणि सुरक्षेसाठी वापरा मायग्लॅमचे हे बेबी प्रॉडक्ट
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
तान्ह्या बाळाला मालिश करण्याचे फायदे आणि पद्धत
स अक्षरावरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे अर्थासह (Baby Boy Names Starting With “S”)
तान्ह्या बाळाच्या डोक्याचा आकार गोल राहावा यासाठी करा हे सोपे उपाय