करिअर निवडताना अनेकजण द्विधा मनःस्थितीत असतात. कारण कोणत्या क्षेत्रातील करिअर कोणासाठी लाभदायक ठरेल हे कोणालाच माहित नसतं. निवडलेल्या करिअरमध्ये आपण भविष्यात यशस्वी होऊ का हा प्रश्न सर्वांनाच तरूणपणी सतावत असतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार काही करिअरचे पर्याय सांगत आहोत. या करिअरची निवड केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल. भविष्यशास्त्रानुसार या क्षेत्रांमध्ये तुम्हाला करिअरच्या भरपूर संधी प्राप्त होऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा की कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठीण मेहनत आणि भरपूर प्रयत्नांची गरज असते. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये प्रयत्न केल्यास तुम्हाला जरूर यश मिळू शकेल.
मेष (21 मार्च – 19 एप्रिल)
या राशीचे लोक फारच उत्साही आणि हरहुन्नरी असतात. यांच्यामध्ये सळसळता उत्साह भरभरून वााहत असतो. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह असल्यामुळे त्यांच्यामध्ये इतर राशींच्या तुलनेत लीडरशीपची भावना अधिक असते. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी राजकारण, पोलिस, सुरक्षादल त्याचप्रमाणे जाहिरात क्षेत्रासारखे करिअर योग्य ठरेल.
वृषभ (एप्रिल 20 – 20 मे)
या राशीच्या लोकांचा स्वामी शुक्र ग्रह असल्यामुळे धन-समृद्धी, नातेसंबध, सौदर्य या विषयांमध्ये त्यांचा अधिक प्रभाव असतो. वृषभ राशीचे लोक जन्मापासून जिद्दी स्वभावाचे असतात. त्यामुळे ते जी गोष्ट ठरवतात ती पूर्ण करण्यासाठी ते आकाश पाताळ एकत्र करतात. त्यांच्या मेहनती आणि जिद्दी स्वभावामुळे असे लोक मीडिया, सिनेसृष्टी, संगीत आणि कला क्षेत्रात लवकर यशस्वी होऊ शकतात.
मिथुन (21 मे – 21 जून)
या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे मिथुन राशीचे लोक अतिशय बोलके असतात. कोणाला आणि कधी आपल्या तालावर नाचवायचं हे त्यांना चांगलं माहित असतं. शिवाय या लोकांची निरिक्षणक्षमता फारच छान असते. त्यामुळे टुरिझम, शैक्षणिक, लेखन आणि साहित्य क्षेत्रात या व्यक्तींना उत्तम यश मिळण्याची अधिक शक्यता आहे.
कर्क (22 जून – 22 जुलै)
या राशीच्या लोकांचा स्वामी चंद्र असतो. कर्क राशीचे लोक सकारात्मक विचार आणि विलक्षण कल्पनाशक्तीसाठी प्रसिद्ध असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शास्त्रज्ञ, संशोधन, फोटोग्राफी, पत्रकारीता, हॉटेल अशा क्षेत्राची निवड केल्यास त्यांना लवकर यश मिळेल.
सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)
या राशीचा स्वामी सुर्य असल्यामुळे यांच्यात अतिशय उत्साह आणि सकारात्मक विचारसरणी असते. या राशीचे लोक जिथे जातात त्यांची एक विशेष छाप सोडून जातात. इतरांपेक्षा वेगळे असल्यामुळे अशा लोकांनी शासकीय, सिव्हील सर्व्हिस, फॅशन डिझायनर, सिनेसृष्टी या क्षेत्रातील करिअरचा विचार करावा.
कन्या (23 ऑगस्ट – 22 सप्टेंबर)
कन्या राशीच्या लोकांचा स्वामी बुध असतो. या राशीच्या लोकांनी दुनियादारीची समज अधििक असते. त्यामुळे ते समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित समजू शकतात. या लोकांना आपला वेळ कोणत्या कामासाठी खर्च करावा आणि कोणत्या कामात वेळ घालवू नये याचे ज्ञान असते. शिवाय यांच्या परफेक्ट स्वभावामुळे ते सर्वांनाच हवहवेसे असतात. या राशीच्या लोकांनी एडिटींग, शास्त्रज्ञ, जनसंपर्क, संगणक, कलाकार अशा क्षेत्रांची निवड करावी.
तूळ (23 सप्टेंबर – 22 ऑक्टोबर)
तूळ राशीच्या लोकांचा स्वामी शुक्र ग्रह असतो. या राशीच्या लोकांना लवकर राग येतो. शिवाय त्यांना वेळ वाया घालवायला मुळीच आवडत नाही. सामाजिक जीवन कसे असावे यासाठी हे लोक आदर्श ठरू शकतात. त्यांना घर आणि सामाजिक कामांचा समतोल उत्तम पद्धतीने ठेवता येतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मार्केटींग, बॅंकींग, डेअरी व्यवसाय, लेखन, मनोविज्ञान, सामाजिक सेवा या क्षेत्रांमधील करिअर निवडण्याचा प्रयत्न करावा.
वृश्चिक (23 ऑक्टोबर – 21 नोव्हेंबर)
वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीचे लोक अतिशय हुशार आणि बुद्धीमान असतात. त्यामुळे ते कोणतेही काम उत्तम पद्धतीने करू शकतात. या राशीच्या लोकांचा स्वभाव शांत असतो. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी शैक्षणिक, कला आणि हस्तकला, गुप्तहेर, दर्शनशास्त्र, इंजिनीअर, सायंटीस्ट, डॉक्टर अशा क्षेत्रांची निवड केल्यास त्यांना चांगलं यश मिळू शकतं.
धनु (22 नोव्हेंबर 21 डिसेंबर)
या राशीचा स्वामी गुरू ग्रह असतो. धनु राशीच्या लोकांचे राहणीमान अगदी साध्या स्वरूपाचे असते. मात्र या राशीच्या लोकांचे कौशल्य वाखाण्याजोगे असते कारण ते कोणतेही साधे काम अगदी कलात्मक स्वरूपात करू शकतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शैक्षणिक, संपादन, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट,मोटिव्हेशनल स्पिकर, खेळ या क्षेत्रातील करिअर निवडावे.
मकर (22 डिसेंबर – 19 जानेवारी)
या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. मकर राशीचे लोक फारच महत्वकांक्षी असतात. एखादे काम ते अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे करतात. या राशीच्या लोकांसाठी सोशल मीडिया, एअरलाईन्स, पर्यटन, अॅक्टिंग, चित्रपट निमिर्ती, हॉटेल, कुकींग, गार्डनींग, आयटी ही क्षेत्र करिअरसाठी चांगली ठरू शकतात.
कुंभ (20 जानेवारी – 18 फेब्रुवारी)
या राशीच्या लोकांचा स्वामी शनी ग्रह असतो. या राशीचे लोक कोणत्याही वातावरणात समरस होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही बदलाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. जबरदस्त सहनशक्ती आणि संयम या गुणांमुळे अशा लोकांमी पब्लिक फोरम, वकिली, एअरफोर्स, संशोधन, शेअर मार्केट, अकाऊंट, ज्योतिष, इंटेरिअर डिझायनिंग या क्षेत्रात करिअरचा प्रयत्न करावा. या क्षेत्रात या राशीच्या लोकांना नक्कीच यश मिळू शकतं.
मीन (19 फेब्रुवारी – 20 मार्च)
मीन राशीचा स्वामी गुरू ग्रह असतो. या राशीचे लोक लोकांची चांगली काळजी घेऊ शकतात.इतरांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नर्सिंग, शैक्षणिक, सोशल सर्व्हिस, थेरपिस्ट, बी.पी.ओ. अशा क्षेत्रातील करिअर निवडावे.
अधिक वाचा
18 मार्च 2019 चं राशीफळ , मीन राशीच्या लोकांचे प्रमोशन होण्याची शक्यता
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली