ADVERTISEMENT
home / आरोग्य
constant _defecation

काहीही कारण नसताना सतत जाता शौचाला? मग एकदा वाचा

पोट साफ असायला हवे हे जितके खरे आहे तितकेच सतत शौचाला (Constant Defecation) जाणे वाईट हे ही खरे आहे. खूप जणांना काहीही खाल्ले किंवा नाही खाल्ले तरी देखील शौचाला जाण्याची सवय असते. कधी कधी त्यासाठी ते तासनंतास घालवतात. अशी सवय तुम्हाला सतत लागली असेल तर ती सवय आताच तुम्हाला सोडायची गरज आहे. कारण या सवयीमुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. इतकेच नाही तर तुम्हाला कुठेही बाहेर गेल्यानंतर सतत वॉशरुम शोधायची सवय लागते. काहीही कारण नसताना सतत शौचाला जात असाल तर त्याचे परिणाम नेमके काय होतात ते जाणून घेऊया.

सतत शौचाला होते का?

दिवसातून एकदा जास्तीत जास्त दोनदा शौचाला जाणे हे योग्य असते. आपण जे खातो ते आपल्या शरीरात राहायला हवे. शरीराला आवश्यक असलेले अनेक घटक आपल्याला अन्नातून मिळत असतात. पण ते अन्नच शरीरात राहात नसेल तर त्याचा काहीही फायदा नसतो. पोट खूप भरले असेल किंवा काही अन्नपदार्थ असे असतात की, ते खाल्ल्यानंतर पोट जड होते. जुलाब झाल्यासारखे वाटते. पोटात आगआग होते. असे तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही शौचाला गेले तर चालू शकते. पण दिवसातून एकदा शौचाला जाणे हेच आरोग्यासाठी चांगले असते.

सतत शौचाला जाण्याचे कारण?

खूप जणांना सतत शौचाला होत असते. कुठेही बाहेर जाताना किंवा बाहेरुन आल्यावर ते आपला काही काळ हा शौचालयात घालवणे पसंत करतात. पण त्यांना त्याची सवय लागलेली असते ही गोष्ट खरी. पण त्यामागे आणखीही काही कारणे नक्कीच असू शकतात. जाणून घेऊया अशीच काही कारणे 

  1.  खूप जण विचारी असतात. त्यांना सतत असे वाटते की, आपण बाहेर गेलो आणि शौचाला झाले. वॉशरुम नाही मिळाले तर … या भीतीने खूप जण कुथत शौचाला जातात. शौचाला होत नसेल तरी वाट पाहात राहात. ही सवय आणि भीती एकदा लागली की, ती जाणे खूपच कठीण असते. 
  2. काही जणांना जरा खाल्ले तरी देखील उगाचच आपल्याला पोट जड झाल्यासारखे वाटते. अशावेळी कारण नसताना शौचाला जाण्याची देखील अनेकांना सवय असते. 
  3. काही जणांना पोटाचे खरंच विकार असतात. त्यांना सतत चिकट शौचाला होते. खाण्यात काही चुकीचे आले तर अशाप्रकारे शौचाला होत असते. इतकेच नाही तर अमांशचा त्रास असणाऱ्यांना सतत पोटदुखी होत राहते. पोटदुखी होऊन त्याला शौचालयाची कळ लागते असे वाटते. हे देखील त्यामागचे एक कारण असू शकते. 
  4. पचनसंस्था नाजूक असेल तर अशांना देखील शौचाला होण्याचा त्रास असतो. काहीही खाल्ले तरी त्यांना लगेच पोट दुखून येण्याचा त्रास होतो. अशावेळी समाधानासाठी म्हणून शौचाला जाणे खूप जणांना सोयीचे वाटते. 
  5. काहींना पोटदुखीचा त्रास होतो. म्हणजे काही खाल्ल्यानंतर पोट फुगते. पोट फुगल्यामुळे ते भरल्यासारखे वाटते. त्यामुळेही खूप जणांना शौचाला झाल्यासारखे वाटते. 

आता कारण नसताना शौचाला जात असाल तर या काही गोष्टी त्यामागे नक्कीच असू शकतात. पण ही सवय तुम्ही सोडलेली बरी. कारण अशा करण्यामुळे तुमचा मूळव्याध वाढू शकतो. 

ADVERTISEMENT

आता कारण नसताना शौचाला जात असाल तर या काही गोष्टी त्यामागे नक्कीच असू शकतात. पण ही सवय तुम्ही सोडलेली बरी. कारण अशा करण्यामुळे तुमचा मूळव्याध वाढू शकतो. 

15 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT