ADVERTISEMENT
home / Fitness
तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी लहान मुलांची अशी घ्या काळजी

तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी लहान मुलांची अशी घ्या काळजी

कोरोनाने आता सगळ्या जगाला हैराण करुन सोडले आहे. अनेक देशांनी कोरोनाशी दोन हात करुन त्याचा खात्मा केला तरी अद्याप आपल्या देशात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. 2020मध्ये कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळी हा आजार आपल्याला बऱ्यापैकी नवीन होता. त्यावेळी प्रतिकार शक्ती वाढवून आपण या आजाराचा सामना केला. 2021मार्चमध्ये याची दुसरी लाट भारतात आली आणि या लाटेने अनेकांनी गिळंकृत केले. अन्य देशात अशी लाट पाहायला मिळाली नाही. पण या वर्षी या लाटेने भारतात अनेकांचे बळी गेले. आता तिसऱ्या लाटेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना या आजाराचा संसर्ग होणार आहे असे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक पालकांना काळजी वाटू लागली आहे. घरात लहान मुलं असले की, त्याला काहीही होऊ नये असे वाटणे अगदी साहजिक आहे. आता या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया.

काय आहे कोविड सोमनिया, कशी कराल यातून स्वतःची सुटका

उत्तम आहार

लहान मुलांना जंक फुड, चटपटीत आणि चमचमीत पदार्थ हे फार आवडतात. पण हेच पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांना पोषक असे कोणतेही घटक मिळत नाही. अशावेळी मुलांच्या आहाराचे नियोजन योग्य पद्धतीने करा. कोरोनाकाळामुळे अनेक पालक हे घरी राहून काम करत आहेत. त्यामुळे मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे हे सहज शक्य आहे. आता उत्तम आहार म्हणजे काय?  किंवा मुलांना ते कसे द्यायचे असा विचार करत असाल तर  आयांना मुलांच्या पोटात पालेभाज्या, कडधान्य कशी खायला घालायची हे अगदी योग्य पद्धतीने माहीत असते. त्यामुळे तुम्ही दिवसातून किमान 3 वेळा तरी त्यांच्या पोटी चांगलं जाईल असं पाहा. संध्याकाळच्या भुकेच्या वेळी त्यांना थोडा चटकपटक खाऊ दिला तर तो चालू शकेल.

मैदानी खेळ

आता तिसऱ्या लाटेपासून मुलांना वाचवायचे म्हणजे त्यांना घराबाहेर मुळीच काढायचे नाही असे नाही. उलट तुम्ही अशावेळी मुलांना फोनमधून बाहेर काढूून जास्तीत जास्त बाहेर फिरायला लावायला हवे. कारण बरेचदा मुलं घरातून बाहेर जाऊ नये म्हणून त्यांच्या हातात फोन देऊन टाकतात त्याचा परिणाम  मुलांच्या आरोग्यावर हळुहळू होऊ लागतो. त्यांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या की, त्याचा त्रास शरीरावर होऊ लागतो. प्रतिकारशक्त कमी करण्यास या गोष्टी कारणीभूत असतात. अशावेळी तुम्ही मुलांना घरातच बसून किंवा कमी गर्दीच्या ठिकाणी खेळायला घेऊन जा. त्यांना घाम येईपर्यंत खेळू द्या. त्यामुळे त्यांना झोपही चांगली येईल. 

ADVERTISEMENT

तुम्ही किती तास काम करता, कामाचे जास्त तास वाढवू शकतात समस्या

स्वच्छता राखा

लहान मुलं म्हटली की, खेळताना सगळीकडे सगळ्या वस्तूला हात लावणं आलंच खूप जण इकडे तिकडे हात लावतात तोच हात संपूर्ण शरीराला पुसतात. कधी कधी तर तोच हात तोंडातही जातो. लहान मुलांना स्वच्छतेचे थोडे धडे या काळात द्यायला हवेत कारण कोरोनाचे विषाणू हे हातातून तोंडात जायला नको. त्यामुळे हात धुणे, कपडे बदलणे, नको त्या ठिकाणी हात न लावण्याच्या सवयी त्यांना लावून घ्या. खेळून झाल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ घालायला मुळीच विसरु नका. त्यामुळे त्यांची स्वच्छता राखण्यासही मदत मिळते. 

पॅनिक होऊ नका

कोव्हिडची लक्षण ही इतर सर्वसामान्य फ्लूप्रमाणेच आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकला अशी काही सौम्य लक्षणे जाणवतात. लहान  मुलांना हा त्रास वरचेवर होत असतो. त्यामुळे तुमच्या मुलाला या पैकी काही झाले तर पटकन पॅनिक होऊ नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही लक्षण म्हणजे कोरोनाच असेल असे सांगता येत नाही तर त्यांना या गोष्टी हवामान बदलामुळेही होऊ शकतात. 

आता लहान मुलांची काळजी घेताना फार पॅनिक होऊ नका. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांची काळजी घ्या. त्यांना काहीही होणार नाही.

ADVERTISEMENT

third wave

03 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT