ADVERTISEMENT
home / आरोग्य
तुम्हालाही आहे का बोटं मोडण्याची सवय

बोटं मोडण्याची सवय असेल तर हे वाचाच

 खूप जणांना बोटं मोडण्याची सवय असते. स्वस्थ न बसता काही जण अगदी थोडया फार वेळाच्या फरकाने बोट मोडत असतात. तुम्हालाही ही सवय लागली असेल तर आरोग्यासाठी ही सवय चांगली की नाही हे देखील माहीत असायला हवे. खूप जणांना ही सवय इतकी लागलेली आहे की त्यांच्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे फारच गरजेचे आहे. चला जाणून घेऊया बोट मोडण्याची सवय चांगली की वाईट? आणि त्याचे नेमके तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात.

बोट मोडल्यामुळे काय होते?

आपल्या हे हाडं आणि मासांनी बनलेले असते. हाडांची आपल्या शरीरात अशी ठेवणं केलेली असते की. ज्यामुळे हाडांची हालचाल होते. हाड देखील हाडांना जोडलेली नसतात. हाडांच्यामध्ये एक विशिष्ट फ्लुईड असते. ज्यामुळे त्याची हालचाल अगदी सहज होते. हे फ्लुईड कमी झाले की हाडं एकमेकांना घासू लागतात. हाड एकमेकांना घासणे हे अजिबात चांगले नाही. हाडांचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे असते. त्यामुळे हाडांना सूज येणे, हात दुखणे असे बरेच त्रासस आपल्याला होऊ लागतात. त्यामुळे बोट मोडण्याची सवय ही अजिबात चांगली नाही. जर तुम्ही सतत बोट मोडत राहिलात तर काही त्रास तुम्हाला हमखास होऊ शकतात.

बोट सतत मोडल्यामुळे होणारे त्रास

सतत मोडू नका बोटं

सतत बोटं मोडल्यामुळे तुम्हाला काही त्रासही होऊ शकतात. हे त्रास कोणते हे देखील जाणून घेऊया. 

  1. बोट मोडल्यामुळे हाडांच्यामध्ये असलेले वंगण कमी होऊ लागते. त्यामुळे हाडांमध्ये दुखणे सुरु होते. बोटांचा आकार हा बदलू लागतो. कधी कधी काही जणांची बोट ही खूप दुखू लागतात. असा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही आताच बोट मोडणे थांबवायला हवं. 
  2. हाडांमधील वंगण कमी होऊ लागलं की, त्यामधून टकटक असा आवाज येऊ लागतो. जो अजिबात चांगला नाही. 
  3. लिगामेंड सिक्रिशन होऊ लागले की, हाड एकमेंकांना घासू लागतात. त्यामुळे उतारवयात अनेक समस्यांना निमंत्रण मिळते. त्यामुळे असे करणे टाळलेलेच बरे 
  4. बोटांमध्ये ताण निर्माण होतो. त्यामुळे बोटांना लगेच कोणतीही दुखापत होण्याची शक्यता असते.

अशी सोडा सवय

जर तुम्हाला बोट मोडण्याची सवय लागलेली असेल तर ती सोडणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला 

ADVERTISEMENT
  1. जपमाळ करण्याची सवय लावा. अनेकदा जपमाळ केल्यामुळे देखील आपले मन आणि हात सतत बिझी राहतो त्यामुळे तुम्हाला बोट मोडण्याची सवय कमी करता येते. 
  2. काही वेळा कटाक्षाने बोटं मोडणं हे थांबवायचे असते अशावेळी मोह झाला की, लगेचच तुमचा हात थांबवा. साधारण दोन ते तीन दिवस तुम्ही बोटं मोडली नाहीत की तुमची सवय आपोआप कमी होते. 
  3. हातात सतत काहीतरी वस्तू काही काळासाठी ठेवा. त्यामुळे कालांतराने तुमची बोटं मोडण्याची ही सवय कमी होऊ लागते

खूप जणांना बोट मोडण्याची सवय लागलेली असेल तर ती सवय तुम्ही आताच सोडा

अधिक वाचा

तुम्हाला माहिती आहे का संधिवात तुमच्या डोळ्यांवर देखील परिणाम करू शकतो

जाणून घ्या काय आहे अग्नी मुद्रा आणि त्याचे फायदे

ADVERTISEMENT
23 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT