ADVERTISEMENT
home / Fitness
तुम्हाला माहीत आहेत का आरोग्याशी निगडीत 10 फॅक्ट्स – Facts About Health In Marathi

तुम्हाला माहीत आहेत का आरोग्याशी निगडीत 10 फॅक्ट्स – Facts About Health In Marathi

आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचे परिणाम आपल्याला माहीत असतात. पण तरीही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. लक्षात ठेवा आत्ता या चुकांकडे केलेलं दुर्लक्ष तुम्हाला पुढे त्रासदायक ठरेल. म्हणतात ना एक छोटं छिद्रही जहाजाला बुडवू शकतं. त्यामुळे वेळीच काही सवयी बदला नाहीतर तुम्हाला म्हातारपणी त्रास होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया रोजच्या आयुष्यात आपण करत असलेल्या चुका आणि हेल्थ फॅक्ट्स ज्याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे.  

जाणून घ्या आरोग्याशी निगडीत ही महत्त्वपूर्ण माहिती Interesting Health Facts In Marathi

1 – उभ्याने पाणी पिणं टाळा

health-facts-water

उभ्या उभ्या पाणी पिणाऱ्यांच्या गुडघ्याचं दुखणं जगातील कोणताच डॉक्टर बरं करू शकत नाही. म्हणनूच नेहमी असं सांगितलं जातं की, पाणी नेहमी बसून प्यावं.पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत.

सर्दी खोकला घरगुती उपाय (Home Remedies For Cold And Cough)

ADVERTISEMENT

2 – फास्ट फॅन किंवा एसीखाली झोपू नका

health-facts-sleep

तुम्हाला माहीत आहे का, फॅन फास्ट करून किंवा एसीजवळ झोपल्याने लवकर वजन जास्त वेगाने वाढतं. त्यामुळे शक्य असेल तितकं प्राकृतिक वातावरण आणि ऋतूमानानुसार तुम्ही स्वःतामध्ये बदल करायचा प्रयत्न केला पाहिजे.

3 – वारंवार पेनकिलर घेणं टाळा

health-facts-warm-water

जेव्हा तुमचा एखादा अवयव दुखत असतो तेव्हा 70 टक्के दुखण्यात जर तुम्ही एक ग्लास गरम पाण्यासोबत पेनकिलर घेतली तर ती जास्त वेगाने परिणाम करते. पण प्रत्येक वेळी छोट्या मोठ्या दुखण्यावर पेनकिलर घेणं योग्य नाही. त्यामुळे शक्यतो पेनकिलर टाळा, कारण पुढे जाऊन यामुळे प्रोब्लेम होऊ शकतो.  

ADVERTISEMENT

4 – नारळाचं पाणी फक्त सकाळीच प्या

health-facts-coconut-water

सरबत आणि नारळाचं पाणी जर तुम्ही सकाळी 11 वाजण्याआधी प्यायलात तर अमृत आहे पण जर त्यानंतर प्यायलात तर मात्र हानीकारक ठरतं. नारळाचं पाणी हे सकाळीच पिणं शरीरासाठी जास्त चांगलं असतं.

Read About : हर्निया म्हणजे काय

5 – जेवणासाठी अॅल्युमिनिअमच्या भांड्यांचा वापर टाळा

aluminium-cookware-poisining-health-hazard

ADVERTISEMENT

अॅल्युमिनिअमच्या भांड्यांचा वापर कमीत कमी करावा कारण याच भांड्यांचा वापर इंग्रजांनी देशभक्त भारतीय कैद्यांना रोगी बनवण्यासाठी सुरू केला होता. जर तुम्ही या भांड्याचं नीट निरीक्षण केलंत तर तुमचं खाणं झाल्यानंतर या भांड्याचा रंग काहीसा बदललेला दिसतो. कारण अॅल्युमिनिअम खाद्यपदार्थांवर रिएक्शन करतं. खासकरून अॅसिडीक पदार्थ उदा टोमॅटो. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

6 – अन्न नेहमी व्यवस्थित चावूनच खा

health-facts-pizaa

नेहमी जेवताना प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच. पण ही गोष्ट आपण हसण्यावारी नेतो. खरंतर या गोष्टीचा खरंच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आयुर्वेदानुसार आपल्या तोंडात जेवढे दात आहेत, तेवढ्या वेळा आपण चावून खाल्लंच पाहिजे.  

मानसिक आरोग्य मूल्यांकन बद्दल देखील वाचा

ADVERTISEMENT

7 – भारतीय शौचालयाचा वापर करा

english-toilet

इंग्लिश स्टाईलच्या टॉयलेट सीटवर बसून शौच केल्यास पोट पूर्णतः साफ होत नाही आणि पोटातली घाण तशीच राहते. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेसोबतच मेटाबॉलिजम कमी होणं आणि इतर आजारही होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी जास्त चांगल आहे.

8 – रात्री वेळेवर झोपा

health-facts-sleep-2

आपण नेहमीच रात्री उशिरापर्यंत जागतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोप पूर्ण झाली नाही असं म्हणतो. तुमचं काही महत्त्वाचं काम नसल्यास उगाच उशिरापर्यंत जागणं टाळा. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणं म्हणजे रात्री झोप न येणं. झोपेची ही कमतरता धूम्रपानाइतकीच धोकादायक आहे.

ADVERTISEMENT

9 – नाश्ता करणं आवश्यक

health-facts-food

धावपळीच्या आयुष्यात लोक नेहमीच नाश्ता करणं टाळतात. पण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सकाळचा नाश्ता टाळता तेव्हा तुम्हाला दिवसभर सुस्ती जाणवते. सोबतच तुमचं वजनही वाढतं, एनीमिया, ऑस्टियोपोरोसिस, कॅल्शियमची कमतरता, केसगळती, गॅस्ट्रीक, डायबीटीस इत्यादी प्रोब्लेम्सचं कारणही असू शकतं.

तुमचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी बनवा ‘ह्या’ रेसिपीजने 

10 – शिंक थांबवू नका

health-facts-cold

ADVERTISEMENT

शिंक आली की, अनेकदा आपण ती थांबवायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. शिंक थांबवल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाहीतर तुमच्या शरीराची रक्त धमनीही फुटू शकते. त्यामुळे कधीही शिंक आल्यास ती थांबवायचा प्रयत्न करू नका.

तुम्ही जर या सवयी फॉलो केल्या तर तुमच्या आरोग्याला भविष्यात होणारा धोका टाळता येऊ शकतो.

वाचा – तंबाखू सोडण्याचे फायदे

23 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT