ADVERTISEMENT
home / आरोग्य
Diabetes patients should take breakfast early morning

ब्लडशुगर नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेहींना कधी करायला हवा नाश्ता

मधुमेह हा एक जीवनशैली विकार झाला आहे. कारण सध्या प्रत्येक घरात एकाला तरी मधुमेहाचा त्रास असतोच. मधुमेहींना रक्तातील साखर वाढल्यामुळे इतर अनेक आरोग्य समस्यांचा त्रास जाणवू शकतो. यासाठीच त्यांनी पोषक आहार आणि औषधोपचार नियमित घेऊन रक्तातील साखर नियंत्रित ठेवायला हवी. मधुमेहींसाठी सर्वात महत्त्वाचे आहे सकाळचा नाश्ता  वेळेत घेणे. कारण नाश्ता हा भोजनाचा एक मुख्य प्रकार आहे. झोपल्यावर रात्रभर उपाशी राहिल्यामुळे सकाळी नाश्ता केल्यावरच शरीराला योग्य पोषण मिळते. मात्र आजही अनेकांना दुपारच्या जेवणापर्यंत फक्त एक कप चहा अथवा एखादं बिस्किट खाऊन वेळ घालवण्याची सवय असतो. कामाचा ताण, दगदग काही असलं तरी मधुमेहींनी मात्र ही चूक कधीच करू नये. सकाळचा नाश्ता करणं टाळलं तर मधुमेहींना याचा खूप त्रास जाणवू शकतो. यासाठी जाणून घ्या मधुमेहींनी नाश्ता करणं का टाळू नये. 

त्वचेला येत असेल सतत खाज तर तुम्हाला असू शकतो मधुमेहाचा धोका

मधुमेहींसाठी सकाळचा नाश्ता का आहे महत्त्वाचा

एका संशोधनानुसार जे लोक नियमित आणि वेळेवर संतुलित आहार घेतात. त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो. याबाबत विविध वयोगटाच्या लोकांवर याची चाचणी घेण्यात आली. ज्या मध्ये असं आढळून आलं की, नाश्ता करण्याची वेळ तुमच्या रक्ताच्या पातळीमध्ये बदल घडवून आणू शकते. ज्यांना सकाळी लवकर चांगला पौष्टिक नाश्ता करण्याची सवय असते. त्यांच्या शरीरात रक्तातील साखर नेहमी नियंत्रित राहते. मात्र जे लोक उशीरा नाश्ता अथवा भोजन करतात त्यांच्या शरीरात इन्सुलीनच्या निर्मितीमध्ये विरोध आढळतो. यासाठीच तुम्ही कधी आणि किती खाता हे मधुमेहींसाठी खूप महत्त्वाचे आहे. 

(Diabetes Diet In Marathi) मधुमेही व्यक्तीचा आहार जाणून घ्या

ADVERTISEMENT

नाश्ता करण्याची योग्य वेळ

संशोधनात असं आढळून आलं आहे की, प्रत्येकाने चांगल्या आरोग्यासाठी सकाळी आठ ते नऊ या वेळेत पोटभर पौष्टिक नाश्ता करावा. ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. जेव्हा शरीरातील रक्तपेशी इन्सुलीन निर्मिती कमी करतात तेव्हा रक्तातील साखर कमी होते. ज्याला मधुमेह असं म्हटलं जातं.  मात्र जे लोक वेळेवर नाश्ता आणि जेवण करतात, शिवाय सतत शारीरिक हालचाल आणि नियमित व्यायाम करतात. अशा लोकांना मधुमेहाचा त्रास  कमी जाणवतो.  यासाठी मधुमेहींनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता करणं कधीच टाळू नये. 

मधुमेहींनी असे करावे दुधाचे सेवन, नाही वाढणार ब्लड शुगर

14 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT