ADVERTISEMENT
home / आरोग्य
diet-tips-for-shravan-fasting-to-avoid-acidity-in-marathi

श्रावण महिन्यात करणार असाल उपवास तर वापरा या डाएट टिप्स

श्रावण महिना म्हटलं की श्रावणातील विविध सण डोळ्यासमोर येतात. भगवान शंकराचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक उपवास या दिवसात करण्यात येतात. श्रावण महिन्याचे महत्व हिंदू संस्कृतीमध्ये अधिक मानले जाते. श्रावणापासून वेगवेगळ्या सणांना सुरूवात होते आणि वर्षाच्या शेवटपर्यंत हे उत्सव चालू राहतात. या महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, तीज असे अनेक सण या महिन्यात येतात. या महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ समजण्यात येतो. हिंदू पौराणिक कथेनुसार, श्रावण महिन्यातील व्रतवैकल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. कारण हा भगवान शंकराचा महिना मानला जातो. 

श्रावणाच्या पूर्ण महिन्यात श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व असते. पौराणिक कथेनुसार, हा उपवास अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतो. काही जण केवळ दूध आणि फळांवर राहतात तर काही जण मीठाशिवाय जेवण एका वेळी जेवतात. धार्मिक मान्यतेशिवाय उपवास शरीर डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतो. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा हवा, पाणी बदल होतो आणि अनेक रोग पसरू लागतात. वातावरणात सूक्ष्मजीवांचे प्रजनन होत असते, त्यावेळी शरीराचे संतुलन ठेवण्यासाठी उपवास करण्यात येतात. श्रावणात उपवास केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही डिटॉक्सिफाय (बॉडी डिटॉक्स वॉटरचा वापर) होते असे मानण्यात येते. 

संपूर्ण देशात व्यापक स्वरूपात श्रावण पाळला जातो. त्यामुळे संपूर्ण महिना काय खाल्ले पाहिजे अथवा शरीराला योग्य एनर्जी प्राप्त कशी होते याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात उपवास करणार असाल तर या डाएट टिप्स तुम्ही पाळायला हव्यात. 

भरपूर पाणी प्या (Drink Water)

water

तुम्ही खूप पाणी प्यावे आणि शरीर उपवासाच्या दिवसात हायड्रेट ठेवावे. एसिडिटी अथवा बद्धकोष्ठ यापासून वाचविण्यासाठीही याचा उपयोग होतो. आपली ऊर्जा उपवासाच्या दिवशी वाढविण्यासाठी आहारात तुम्ही अधिकाधिक पातळ पदार्थ अर्थात दूध, ताजे ताक, ताज्या फळांचा रस याचा समावेश करून घ्यावा. जेणेकरून शरीरातील ऊर्जा व्यवस्थित राहील आणि तुम्हाला त्रास होणार नाही. 

ADVERTISEMENT

ताजी फळं खावीत (Eat Fresh Fruits)

उपवासादरम्यान तुम्ही ताजी हंगामी फळं खाल्ल्यास तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते. तुम्ही उपवासाच्या दिवसात एसिडिटी रोखण्यासाठी सोपी ट्रिक म्हणून ताज्या फळांचा वापर करून घेऊ शकता. आपले शरीर अधिक हायड्रेट राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच फ्रुक्टोजच्या प्रमाणामुळेदेखील हे तुम्हाला सक्रिय ठेवण्यास मदत करते. 

सलाड समाविष्ट करून घ्या 

उपवासादरम्यान तुम्ही उपवासाचे पदार्थ करून भरपूर खाऊ नका. तर तुमच्या डाएटमध्ये सलाडचा उपयोग करून घ्या. यासाठी तुम्ही काकडीचा उपयोग करून घेऊ शकता. तसंच सलाडमध्ये काकडी आणि दही असे मिश्रण करून खाल्ल्यास, ऊर्जा राहाते आणि पोटही भरलेले राहाते. तर तुम्ही तुमच्या सलाडमध्ये ड्राटफ्रुट्स अर्थात बदाम, बेदाणे, अक्रोड याचाही वापर करून घेऊ शकता. यामध्ये फायबर असल्याने शरीरात अधिक काळ ऊर्जा टिकून राहाते. 

तळलेले पदार्थ खाणे टाळा 

उपवासाच्या दिवसात अर्थात श्रावण महिन्यातील उपवासाला तळलेले उपवासाचे पापड अथवा अनहेल्दी पदार्थ खाणे सहसा टाळा. कारण उपवासाच्या दिवसात एसिडिटी आणि जळजळ यासाठी हे पदार्थ कारणीभूत ठरतात. उपवास सोडताना तुम्ही घरीच वरण भात, पोळी भाजी असे पदार्थ करून उपवास सोडणे अधिक चांगले ठरते. यामुळे शरीराचे चांगले डिटॉक्सिफिकेशनही होते. अशावेळी रेस्टॉरंटचे जेवण मागवू नका अन्यथा त्याचा दुसऱ्या दिवशी अधिक त्रास होतो. 

तुम्ही या सर्व टिप्सचा वापर करा आणि श्रावणातील व्रत पूर्ण करताना स्वतःला हेल्दी आणि एनर्जीयुक्त ठेवा, जे अधिक योग्य आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT