ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
वेगवेगळ्या body shapewear विषयी तुम्हाला आहे का योग्य माहिती

वेगवेगळ्या body shapewear विषयी तुम्हाला आहे का योग्य माहिती

तुमचा बॉडीशेप चांगला दिसावा म्हणून बाजारात कैक प्रकारचे body shapewear मिळतात. पण कोणते body shapewear कधी घालायला हवे याची योग्य माहिती तुम्हाला हवी. कारण अनेकदा body shapewear संदर्भातील तक्रारी महिला करतात. पण कोणते body shapewearतुम्हाला घालण्याची गरज आहे याची माहिती आधी तुम्हाला हवी तरच तुम्हाला तुम्ही घातलेल्या body shapewearचा त्रास जास्त होणार नाही.

हायवेस्टेड पँट (highweasted pant)

Instagram

 body shapewear चा हा प्रकार अनेक जण वापरतात. संपूर्ण पोटाला कव्हर करणारी ही पँट असते. पोटापासून ते मांड्यांपर्यंतचा भाग हे body shapewear  कव्हर करत असते.लायक्रा मटेरिअलमध्ये या पँटस मिळतात. यांची फिटींग कॉटनपेक्षाही कम्फर्टेबल असते. शिवाय मांड्यांना हा भाग अगदी छान बसल्यामुळे त्या वर जाण्याचा प्रश्न येत नाही. हे body shapewear  तुमच्या थाईज आणि कंबरेला आवश्यक असलेला बाक देतात.

ADVERTISEMENT

कशावर घालता येईल : जर तुम्ही एखादा सैलसर शॉर्ट वनपीस घालत असाल किंवा शॉर्ट फ्लेअर्ड ड्रेस त्यावर हे body shapewear उत्तम आहे. 

प्रत्येक मुलीला माहीत हवेत ब्रा विषयीचे 10 नियम

कॅमिसोल (camisole shapewear)

Instagram

ADVERTISEMENT

 तसं पाहायला गेलं तर हा स्लीपसारखा प्रकार आहे. पण जे तुमची स्लीप करु शकत नाही ते हे body shapewear  करते. याचे कारण असे की, हा प्रकार तुमच्या त्वचेला चिकटतो. तुमची कंबर, पाठ या ठिकाणी अपेक्षित असलेला आकार तुम्हाला देतो. आता हा आकार देताना तुम्हाला तुम्हाला श्वास घेण्याची भीती वाटत असेल तर हे body shapewear स्तनांच्या भागाकडून मोकळे असतात. यांचे काम तुमच्या कमरेचे फॅट, पोट यांना कव्हर करुन चांगला लुक देतो. 

कशावर घालता येईल:एखाद्या टँक टाॅप, टाईड टाॅप किंवा फक्त वरील बॉडी पार्ट हायलाईट करणाऱ्या ड्रेसवर

स्कीनी पॅंट्स बद्दल देखील वाचा

कोरसेट (corset)

ADVERTISEMENT

Instagram

काही ड्रेस असे असतात की, ज्यामध्ये तुम्हाला फक्त तुमची कंबर आकर्षक असणे गरजेचे असते. कोरसेट हा body shapewear चा प्रकार फक्त त्यासाठी काम करतो. पूर्वीच्या कळी देखील हे अशा प्रकारचे body shapewear  होते. आता यातील अॅडवान्स प्रकार पाहायला मिळतात. चांगल्या मटेरिअलमध्ये आणि कम्फर्टेबल असे हे body shapewear असतात. त्यामुळे तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नसते.

कशावर घालता येईल : गाऊन किंवा पार्टीवेअर ड्रेसवर तुम्हाला हे घालता येतील. 

परफेक्ट इनरवेअरची निवड करणे आजही जाते कठीण, मग वाचाच

ADVERTISEMENT

टमी टकर (tummy tucker)

Instagram

फक्त आणि फक्त पोट लपवायचे असेल तर टमी टकर body shapewear  उत्तम आहे.कारण हे फक्त तुमचे टमी पोर्शन कव्हर करत. बाजारात मिळणारे स्वस्त टमी टकर घेण्याच्या भानगडीत पडू नका. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो .टमी टकर एखाद्या पँटीप्रमाणे असते. पण त्याचा वेस्टकडी भाग मोठा असतो. 

कशावर घालता येईल:  टमी टकर तुम्हाला ट्राऊजर किंवा ड्रेसेसवर घालता येईल

ADVERTISEMENT

वाचा – सरळ फिट अर्धी चड्डी

साडी पेटीकोट (saree peticoat)

Instagram

हा नवा प्रकार सध्या body shapewear मध्ये पाहायला मिळत आहे. साडी किंवा लाँग टाईट स्कर्टमध्ये तुम्हाला अपेक्षित शेप हवा असेल तर तुम्ही साडी पेटीकोट वापरु शकता. इतर पेटीकोटच्या तुलनेत body shapewearमध्ये आलेले पेटीकोट कम्फर्टेबल असतात. त्याचा फार त्रासही तुम्हाला होत नाही. शिवाय ते तुमच्या साईजमध्ये उपलब्ध असल्यामुळे त्याची फिटींगही चांगली बसते

ADVERTISEMENT

हे काही shapewear आहेत जे तुम्ही नक्की वापरु शकता. पण काही 4 तासांहून अधिक काळ ते घालू नये. जर तुम्हाला यातील कोणतेही  shapewear घातल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल त्याचा वापर तिथेच थांबवावा.

मांड्यावर मांड्या घासण्याचा होतो का त्रास, मग तुम्हाला हे माहीत हवे

09 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT