ADVERTISEMENT
home / Eye Make Up
दिवाळीसाठी मेकअप करताना आयलायरने असे हायलाईट करा तुमचे डोळे

दिवाळीसाठी मेकअप करताना आयलायरने असे हायलाईट करा तुमचे डोळे

दिवाळीचा सण म्हटला की सेलिब्रेशन हे आलंच. जरी कोरोनामुळे एकमेकांना भेटण्यासाठी बंधनं असतील तर फोन अथवा व्हिडिओ कॉलवरून सर्वजण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा (diwali wishes in marathi) देतील आणि नक्कीच भेटतील. फोटोसेशन करताना अथवा अशा व्हर्च्युअल गेट टू गेदरमध्ये हटके दिसायचं असेल तर मेकअप करताना या टिप्स अवश्य लक्षात ठेवा. मेकअपमध्ये सर्वात जास्त मेहनत घ्यावी लागते ती तुमच्या डोळ्यांच्या मेकअपसाठी आणि आय मेकअपमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतं तुमचं आयलायनर. यासाठीच यंदा मेकअपमधून डोळयांना जास्तीत जास्त हायलाईट करण्यासाठी या आयलायनर टिप्स नक्की लक्षात ठेवा. दिवाळीसाठी मस्त तयार होताना या  आयलायनर टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या आहेत. 

सिंपल अॅंड लाईट आयलायनर –

डोळ्यांना मेकअप करताना ही स्टाईल कॅरी करण्यासाठी तुम्हाला लिक्विड आयलायनरची गरज लागेल. कारण यात तुम्हाला तुमच्या पापणीच्या डाव्या ते उजव्या असं दोन्ही कडांवरून आयलानरची एक पातळ रेघ ओढायची आहे. हे आयलायनर लावणं अतिशय सोपं असून त्यामुळे तुमच्या डोळ्यांचा खरा आकार अधोरेखित होऊ शकतो. कोणत्याही आयशॅडोनंतर असं साधं आयलायनर तुमचा लुक उठावदार करू शकतं.

Instagram

विंग आणि डबल विंग आयलायनर –

विंग आयलायनर सर्वच प्रकारच्या लुकमध्ये उठून दिसेल असं नाही. जर तुम्ही हलक्या रंगाचे कपडे घातले असतील अथवा कमी ज्वैलरीचा लुक केला असेल तर मेकअपने डोळे हायलाईट करण्यासाठी तुम्ही विंग आयलायनर वापरू शकता. या स्टाईलमध्ये तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या दोन्ही कोपऱ्यांवर एखाद्या पंखाप्रमाणे दिसणारा आकार काढायचा आहे. विंग आयलायनर काढणं सोपं नाही म्हणून त्यासाठी थोडा सराव नक्कीच करावा लागेल. आजकाल मार्केटमध्ये विंग आयलायनर लावण्यासाठी अनेक टुल्स मिळतात. किंवा काही ब्युटी ट्रिक्स वापरून तुम्ही ही स्टाईल कॅरी करू शकता. आता तर यामध्ये डबल विंग आयलायनर हा प्रकारही प्रसिद्ध आहे. यासाठीच वरच्या दिशेने एक मोठा आणि खालच्या दिशेने एक छोटा कर्व काढला जातो. 

ADVERTISEMENT

Instagram

कॅट आणि फॉक्स आयलायनर –

कॅट आणि फॉक्स आयलायनर हा सध्या ट्रेंडमध्ये असलेला एक प्रकार आहे. यामध्ये डोळ्यांना असा आकार द्यायचा असतो त्यामुळे तुमचे डोळे मांजर अथवा कोल्ह्याप्रमाणे भासतात. बोल्ड आणि ब्युटीफुल दिसण्यासाठी ही स्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या कोपऱ्यावर मेकअप फोकस करावा लागेल आणि टोकाकडे आयलायनरही थोडं जाडसर लावावं लागेल. बऱ्याचदा रात्रीच्या पार्टीसाठी असा लुक केला जातो.

Instagram

स्ट्रेट आयलायनर –

एखादा कॅज्युअल लुक करताना स्ट्रेट आयलायनर काढणं हा अगदी बेस्ट उपाय आहे. यात फक्त वरच्या पापणीवर आयलायनर काढून ते व्यवस्थित कडांना भरलं जातं. साधा लुक असूनही यात तुम्ही तितक्याच सुंदर दिसू शकता. शिवाय या स्टाईलसाठी तुम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागणार नाही. 

ADVERTISEMENT

Instagram

शिमर अथवा ग्लिटर आयलायनर –

कोणत्याही कार्यक्रमात उठून दिसायचं तर थोडा शिमरी आणि ग्लिटरी लुक व्हायलाच हवा. कारण फोटोसेशनमध्ये हा लुक सर्वात बेस्ट दिसतो. शिमरी अथवा ग्लिटरी लुकचे आयलायनर लावण्यासाठी तुम्हाला ग्लिटर आयलायनरची गरज लागेल. 

Instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

त्वचेचं नुकसान न करता असा काढा आय मेकअप

घरच्या घरी #cutcrease आय मेकअप करुन मिळवा सुंदर डोळे

सणासुदीला खास दिसायचं असेल तर असा करा ‘आय मेकअप’ (Festive Eye Makeup In Marathi)

ADVERTISEMENT
08 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT