ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
तुमच्या किचन गार्डनमध्ये सोप्या पद्धतीने लावा लसूण, बाजारातून आणायची गरज नाही

तुमच्या किचन गार्डनमध्ये सोप्या पद्धतीने लावा लसूण, बाजारातून आणायची गरज नाही

 

 

आपल्याकडे जेवणामध्ये लसणीला अनन्यसाधारण महत्व आहे. लसणीच्या फोडणीचा वास नाकात गेला की, जिभेला पाणी सुटलंच पाहिजे. लसूण हा पदार्थ आपल्या जेवणातील अविभाज्य भाग आहे. असे बरेच पदार्थ आहेत ज्यामध्ये लसूण नाही घातली तर त्याचा स्वादच येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत लसणीचे अनेक पदार्थ हे अगदी चवीने खाल्ले जातात. लोणचं असो अथवा अन्य कोणतीही भाजी लसूण तर प्रत्येकामध्ये लागतेच. पण तुम्हाला जर सारखं बाजारातून लसूण नको असेल आणि घरच्या घरी तुम्हाला लसूण मिळणार असेल असं म्हटलं तर…नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण तुम्ही घरच्या घरी तुमच्या किचन गार्डनमध्येही सोप्या पद्धतीने लसूण लाऊ शकता. इतकंच नाही तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही लसूण आपल्या घरात उगवता येते. तुम्हाला जर गार्डनिंग करण्याची इच्छा असेल आणि आवड असेल तर तुम्ही काहीच दिवसात लसूण घरात उगवू शकता. बाजारात लसणीची किंमत नेहमीच जास्त असते हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे घरी उगवलेल्या लसणीची चव आणि मजा काही न्यारीच असते. त्यासाठी नक्की आपण काय पावलं उचलायला हवीत ते याा लेखातून जाणून घेऊया.

लसूण लावण्यासाठी काय लागेल सामान

लसूण लावण्यासाठी काय लागेल सामान

Freepik.com

ADVERTISEMENT

लसूण घरात नक्कीच लावता येते. तुम्हाला अजूनही पटत नसेल आणि आश्चर्य वाटत असेल हे मान्य आहे. लसणीचा लागवड करताना हवामान थंड लागते हे लक्षात घ्या. पण तुम्हाला लसूण लागवड करण्यासाठी लागणारे काही सामान आहे, ते तुम्ही जाणून घ्या. 

  • लसणीच्या पाकळ्या 
  • माती
  • पाणी 
  • खत 
  • कुंडी 

 

लावण्याची पद्धत

लावण्याची पद्धत

Freepik.com

ADVERTISEMENT

सर्वात पहिले तुम्ही लसणीच्या पाकळ्या न सोलता वेगवेगळ्या करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर घरातील लसूण वापरा अथवा तुम्ही झाड लावण्यासाठी बीज भांडारातूनही लसूण आणू शकता. यानंतर तुम्ही कुंडीमध्ये माती घाला आणि ही माती व्यवस्थित मोकळी करून काही तासांसाठी तसंच ठेवा. माती नरम होऊ द्या. माती नरम असेल तर लसूण उगविण्यासाठी चांगली मदत मिळते. या मातीमध्ये खत व्यवस्थित मिक्स करून घ्या. खत तुम्हाला अनेक दुकानांमध्ये मिळते. लसणीच्या पाकळ्या मातीत लावण्यापूर्वी तुम्ही खत मिक्स करा. लक्षात ठेवा की, रासायनिक खताचाच वापर करा. यासाठी तुम्ही जैविक खत अथवा कंपोस्ट खताचाही वापर करू शकता. या खतांमुळे लसूण चांगली येते. लसणीच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून मातीमध्ये साधारण 3-4 इंच आतमध्ये दाबून ठेवा. लक्षात ठेवा की, एका ठिकाणी एकच लसणाची पाकळी तुम्हाला लावायची आहे. काळी लसूणही असते आणि त्याचेही आरोग्यासाठी अनेक फायदे असतात.

हवामानाची घ्या काळजी

हवामानाची घ्या काळजी

Freepik.com

तुम्हाला लसूण लावल्यानंतर त्याला लागणाऱ्या  हवामानाचीही काळजी घ्यावी लागते. थंडीचा महिना या लसूण लागवड करण्यासाठी उत्तम महिना समजण्यात येतो. त्यामुळे साधारण तुम्ही डिसेंबरच्या दरम्यान लूसण लावा. अधिक थंडीत लसूण खराब होण्याची शक्यता असते.  त्यामुळे रात्री जर अति थंडी असेल तर तुम्ही लसणीचे झाड थोडे झाकून ठेवा आणि सकाळी थोडा वेळा उन्हात ठेवा.  यामुळे लसणाची वाढ व्यवस्थित होण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

पाणी द्यायला विसरू नका

पाणी द्यायला विसरू नका

Shutterstock

लसणाची पाकळी लावल्यानंतर त्वरीत एक ते दोन मग्ज (भांडी) पाणी द्यायला विसरू नका. मध्ये मध्ये तुम्ही या झाडाला पाणी देत राहा. जेव्हा झाडाला अंकुर फुटला आहे असे दिसून येईल तेव्हा त्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा खत घालून पुन्हा पाणी द्या. तसंच मातीत लसूण पाकळी पेरल्यापासून ते लसूण काढेपर्यंत किटकांपासून वाचवणे हेदेखील आपल्याला करावे लाते. तुम्हाला नियमित स्वरूपात यावर किटकनाशकं फवारणे गरजेचे आहे. यासाठी बाजारातून तुम्ही औषध आणू शकता. याशिवाय तुम्ही घरीच लिंबू पाणी बनवून झाडांवर याचा फवारा मारू शकता. कोणत्याही औषधापेक्षा लिंबू पाणी हा उत्तम पर्याय आहे.

लसूण काढण्याची वेळ

लसूण काढण्याची वेळ

ADVERTISEMENT

Freepik.com

साधारण एक महिन्यानंतर लसूण वाढते. तुम्ही साग बनविण्यासाठी लसणीच्या पानांचा उपयोग करून घेऊ शकता. साधारण दोन ते तीन महिन्यांनी झाडाला लसूण येते आणि त्यानंतर तुम्ही त्याचा काढून साफ करून उपयोग करून घेऊ शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Feb 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT