ADVERTISEMENT
home / Love
जोडीदार असूनही स्वप्नात का येतो ड्रिम मॅन

जोडीदार असूनही स्वप्नात का येतो ड्रिम मॅन

स्वप्न पाहायला कोणाला आवडत नाही. त्यात जर स्वप्नामध्ये आवडत असलेला रोमान्स पाहायला मिळाला तर त्याचा आनंद सगळ्यात जास्त असतो. स्त्री किंवा पुरुषा दोघांच्याही स्वप्नामध्ये त्यांच्या असलेल्या सेक्स फँटसी स्वप्नात येत असतात. या फँटसी रंगवणे वाईट नाही. पण अशी स्वप्न आपल्याला सातत्याने पडत नाहीत. काही ठराविक वेळीच आपल्याला अशी स्वप्न येतात. तुमच्या स्वप्नांमध्ये जोडीदाराशिवाय जर ड्रिम मॅन दिसत असेल तर त्यामागे काही कारणे आहेत. जाणून घेऊया तुमच्यासोबत असे का होत आहे.

सेक्स लाईफला स्पाईसअप करणाऱ्या ’10’ सेक्स स्टाईल्स

चांगला वेळ घालवण्याची गरज

स्वप्नात येतो का ड्रिम मॅन

Instagram

ADVERTISEMENT

बरेचदा आपल्या स्वप्नांना काहीच अर्थ नसतो असे आपल्याला वाटते. दिवसभरात एखादा विषय चघळताना त्या विषयाशी निगडीत अनेक व्यक्ती आपल्याला स्वप्नात दिसत राहतात. त्याचा घटनाक्रम किंवा घटना ही वेगळी असली तरी या व्यक्ती परिचयाच्या असतात. पण कधीकधी स्वप्नात अशी व्यक्ती येते जी आपण कधीच पाहिलेली नसते. पण तिच्यासोबत स्वप्नात घालवलेला तो वेळ आपण झोपेतून उठल्यावरही विसरु शकत नाही. सतत त्या आनंदाची आठवण आपल्याला होत राहते आणि त्यातच आपण राहावे असे वाटते.

असे स्वप्न तुम्हाला का पडते ? :  स्वप्नामध्ये घालवलेला एखादा चांगला काळ आपल्याला खऱ्या आयुष्यात हवा असतो. जोडीदाराने आपल्यासोबत असे राहावे असे वाटत असते. ही इच्छा जोडीदाराकडून पूर्ण झाली नाही की मात्र हा आनंद देणारी एक व्यक्ती आपण आपल्याच मनात तयार करत असतो. कधी तरी ही व्यक्ती खऱ्या आयुष्याशी निगडीत असते किंवा काल्पनिक असते.  

इलाज:   जर तुम्हाला अशा स्वप्नांमधून बाहेर पडायचे असेल आणि खऱ्या आयुष्यात तो आनंद आणायचा असेल तर संवाद हा त्यावरील उत्तम इलाज आहे. तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालवण्याची त्याला आपल्यात सामावून घेण्याची गरज आहे. 

पहिल्यांदा *Condom वापरुन सेक्स केले तेव्हा…. वाटले

ADVERTISEMENT

सेक्सची आहे गरज

स्वप्नात नेहमीच सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतीस असे नाही. पण सेक्ससंदर्भात पडणारे स्वप्न हे कायम सुखावणारे असते. विवाहित आणि अविवाहित दोघांनाही अशा प्रकारची स्वप्न ही कधीना कधी पडतात. अविवाहित लोकांच्या बाबतीत त्यांना सेक्स मिळत नसल्यामुळे त्यांच्या कल्पना विश्वातील सेक्स दिसणे हे अगदी सहज आहे. पण विवाहितांनाही अशा पद्धतीने स्वप्न पडणे हे थोडे धोक्याचे आणि जोडीदारापासून दूर करणारे आहे (काहींना जवळीक साधण्यासाठीही फायदेशीर)  पण असे स्वप्न तुम्हाला जोडीदारापासून दूर करत असेल तर मात्र तुम्ही वेळीच या गोष्टी थांबवायल्या हव्यात. 

असे स्वप्न तुम्हाला का पडते ? :  तुम्हाला अशी स्वप्न वरचेवर पडत असतील. तर तुम्हाला सेक्सची गरज आहे हे सर्वप्रथम निदर्शनास येते. एका ठराविक वयानंतर सेक्सची गरज प्रत्येकाला असते. पण विवाहितांच्या बाबतीत असे होत असेल तर याचा अर्थ तुमचे सेक्सलाईफ हे चांगले नाही. त्यावर काम करण्याची तुम्हाला गरज आहे. तुमच्या फँटसी सेक्सबद्दल तुम्ही जोडीदाराशी बोलला नाहीत किंवा त्या पद्धतीचा आनंद तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे अशी स्वप्न तुम्हाला सतत पडतात. 

इलाज: तुमचे असे स्वप्न पडणे तुम्हाला जोडीदारापासून दूर करत तुमचा ड्रिम मॅन शोधण्यात आणि त्यामध्ये गुंग होण्यास सांगत असेल तर तुम्ही सेक्ससंदर्भात मोकळेपणाने बोला. तुम्हाला सेक्समध्ये काय हवे काय नको? हे सांगायला शिका. त्यामुळेच तुम्हाला जे हवं ते मिळण्यास किंवा समजून घेण्यास मदत होईल. 

आता तुम्हालाही स्वप्नात असं काही येत असेल तर तुम्ही या गोष्टींचा नक्कीच विचार करा आणि त्यानुसार काही बदल करा.

ADVERTISEMENT

सेक्स करताना पुुरुषांनी या 10 ठिकाणी करावा महिलांना स्पर्श

25 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT