ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
डस्की स्किन टोन असेल तर लग्नात करा या मेकअप टिप्स फॉलो

डस्की स्किन टोन असेल तर लग्नात करा या मेकअप टिप्स फॉलो

कोणत्याही मुलीला तिच्या शरीराच्या रंगावरून ओळखले जाते. पण गोरा रंग असो अथवा डस्की स्किन टोन प्रत्येक मुलगी ही सुंदरच असते. खरं तर डस्की स्किन टोन बऱ्याचदा जास्त आकर्षित करतो. डस्की स्किन असेल तर तुम्हाला अनेक फॅशन फॉलो करता येतात आणि त्याशिवाय आपल्या आऊटफिसाठी वेगवेगळे मेकअपही करता येतात. पण बऱ्याच जणांना नक्की कशा स्वरुपात मेकअप करायचा हेच माहीत नसतं. विशेषतः लग्नात करायचा असेल मेकअप. तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देत आहोत त्या तुम्ही फॉलो करून दिसा अधिक सुंदर. लग्नात जायचं असेल अथवा अगदी नवरीदेखील असेल तरी लग्नाच्या आधी आपल्या स्किन केअर रूटीनची काळजी घ्यायला हवी.  ज्यामध्ये तुम्ही क्लिनिंगसह त्वचा स्क्रब करणे आणि मॉईस्चराईज करणेही गरजेचे आहे. जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स. 

योग्य फाऊंडेशन

लग्नाच्या दिवशी सुंदर दिसायचं असेल तर त्याची तयारी आधीपासूनच करावी लागते. जसे तुमचे मेकअप प्रॉडक्ट्स तुम्ही वापरणार असाल त्याची योग्य निवड करावी. तसंच तुमची त्वचा डस्की असेल तर तुम्हाला फाऊंडेशनची योग्य शेड निवडावी लागेल. बऱ्याचदा यामध्ये चूक घडते. बरेच जण आपल्या त्वचेच्या टोनच्या तुलनेत हलका रंग निवडतात.  पण हे  तुच्या त्वचेला नैसर्गिकरित्या कोरडे बनवते आणि  तुमचा लुक अधिक खराब करते. त्यामुळे तुमचा योग्य स्किन टोन मिळविणयासाठी तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार एक अथवा दोन शेड्स मिक्स करूनही लाऊ शकता. 

सेलिब्रिटीसारखा मेकअप हवा असेल तर वापरा उत्कृष्ट मेकअप उत्पादने

लिपस्टिक आणि आयशॅडो कॉम्बिनेशन

डस्की स्किन टोन असणाऱ्या मुलींचे डोळे हे गडद रंगाचे असतात जे बऱ्याच जणांना आकर्षित करतात. त्यामुळे अशा मुलींनी डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी हिरवा, गुलाबी, लाईट ब्राऊन अथवा मेटालिक कॉपर आयशॅडोचा वापर करावा. त्याशिवाय या मुलींसाठी स्मोकी आईजदेखील परफेक्ट मेकअप असतो. तुम्ही तुमचा ब्रायडल लुक पूर्म करण्यासाठी मॅट आणि ग्लॉसी दोन्ही स्वरूपाच्या लिपस्टिक शेड्सचा वापर करू शकता. तुम्ही गडद रंगाचा वापर करणार असाल तर बेरी, प्लम, बरगंडी अशा रंगाचा वापर करा. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना हलकेसे फाऊंडेशन लावा आणि मग लिपस्टिक लावा. अधिक सुंदर दिसाल.

ADVERTISEMENT

नवरात्रीसाठी यावर्षी ट्राय करा अरेबिक स्मोकी आय लुक

न्यूड लिप्स आणि स्मोकी आईज

डस्की स्किन असेल तर त्यावर स्मोकी आईज लुक अत्यंत सुंदर दिसतो. तुम्हाला जर ब्लॅक स्मोकी आईज लुक हवा असेल तर तुम्ही त्यासह न्यूड लिपस्टिक लावा. लग्नातील लुक हवा असेल तर डोळे आणि ओठांचा मेकअप अत्यंत चांगला आणि आकर्षक दिसायला हवा. त्यामुळे तुमचा पूर्ण लुक बदलतो. सध्या स्मोकी आईज (Smoky Eyes Makeup) ट्रेंड आला आहे. पारंपरिक आणि आधुनिक असे दोन्ही लुक तुम्हाला या मेकअपमध्ये करता येतात.

ब्रॉन्झ आईज आणि न्यूड लिपस्टिक

ब्रॉन्झ आय मेकअप सध्या ट्रेंडमध्ये आहे, तुमचे डोळे मोठे असतील आणि स्किन डस्की असेल तर तुम्हाला हा मेकअप खूपच सुंदर दिसतो. तुम्हाला जर लग्नामध्ये तुमचा लुक लाईट ठेवायचा असेल तर तुम्ही ब्रॉन्झ मेकअपसह न्यूड लिपस्टिक लावा. हे दिसायला उत्तम दिसते. केवळ डस्की स्किनच नाही तर कोणत्याही स्किन टोनसाठी हा मेकअप सुंदर दिसतो. 

स्किनटोननुसार परफेक्ट न्यूड लिपस्टिक कशी निवडावी

ADVERTISEMENT

लाल साडीसह लाल लिपस्टिक

डस्की स्किन टोन असल्याने बऱ्याच मुली लाल रंग निवडताना खूप विचार करतात. पण तुम्हाला लाल रंग आवडत असेल तर तुम्ही तो योग्यरित्या कॅरीही करू शकता. ग्लॉसी मेकअप, लाईट रेड लिपस्टिक आणि लाल रंगाची साडी हे कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही अत्यंत सुंदर दिसू शकता. त्यामुळे लग्नात तुम्ही नक्की याचा विचार करा. लाल साडीसह लाल लिपस्टिक हाच योग्य पर्याय आहे हे मात्र लक्षात ठेवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

30 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT