आपल्यापैकी प्रत्येकीलाच सुंदर पाय हवेहवेसे वाटतात. पण त्यासाठी काय काय खटाटोप करावा लागतात, हे तर तुम्हाला माहीत आहेच. तसं पाहायला गेलं तर पाय सुंदर रहावे याकरिता दोन मार्ग आहेत. एक तर पार्लरमध्ये जाऊन तासनतास बसून पेडीक्योर करायचं किंवा सोप्या अशा घरगुती उपायांनी पायांचं सौंदर्य वाढवायचं. पेडीक्योरसाठी दर महिन्याला तुम्हाला पार्लरची वारी करावी लागत असेलच. पण हेच तुम्ही घरच्या घरी काही सोपे उपाय केले तर नेहमीच तुमचे पाय सुंदर राहू शकतात. या लेखात तुम्हाला आम्ही पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठी सांगणार आहोत, काही घरगुती उपाय. जे केल्यावर हमखास तुमचे पैसेही वाचतील आणि पायही सुंदर दिसतील.
1. नैसर्गिक साधनांचा वापर करा
दिवसभराच्या दगदगीनंतर तुमचं शरीर थकतं, पायंही अगदी गळून जातात. अशावेळी पायांना पॅम्पर करा. खरं तरं आम्ही तु्म्हाला सल्ला देतो की, तुम्ही पायांकडे थोडं लक्ष द्या, त्यांच्यावर थोडी मेहनत करा, त्यासाठी करा काही उपाय…
स्टेप 1: बाथरूममध्ये जा आणि सोसेल इतकं गरम पाणी बादलीत सोडा
स्टेप 2: त्यात लिंबू पिळा
स्टेप 3: पाण्यात हर्बल शॉवर जेल मिसळा
स्टेप 4: पाय मस्त 5-10 मिनिटं पाण्यात बुडवून ठेवा
स्टेप 5: त्यानंतर रेग्युलर फूट फाईलच्या मदतीनं पायांना स्क्रब करा.
तुम्ही हे आठवड्यातून दोनदा करु शकता.
Also Read How To Take Care Of Your Feet In Marathi
2. स्किन टोन एकसारखं करण्यासाठी
पायातून चपला काढल्यावर तुम्हाला लक्षात येत असेल की पायांवर चपलांचे छाप पडले आहेत. त्यामुळे पाय दोन रंगाचे दिसू लागतात. पण काळजी करु नका पायांच्या त्वचेचा रंग एकसारखा करण्यासाठी तुम्हाला आता पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. हा प्रॉब्लेम तुम्ही घरबसल्याच सोडवू शकता.
स्टेप 1: पेस्ट बनवण्यासाठी दूध, मीठ आणि लिंबाचा रस लागणार आहे.
स्टेप 2: दूध गरम करा. त्यात चिमूटभर मीठ आणि लिंबाचा रस टाका.
स्टेप 3: मिश्रण चांगल मिक्स करा आणि पायांना लावा.
स्टेप 4: या पेस्टने चांगलं चोळून मसाज करा जेणेकरुन ती पेस्ट पावलांमध्ये जिरेल.
स्टेप 5: 15-20 मिनिटं ही पेस्ट पायांवरच राहू द्या व त्यानंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा.
हा उपाय केल्यावर त्याचा परिणाम तुम्हाला लगेच जाणवणार नाही. पण हा उपाय नियमित केल्यास कालांतराने फरक जाणवेल.
वाचा शू बाईट म्हणजे काय आणि शू बाईट कशामुळे होते
3. दररोज पाय स्वच्छ धुवा.
रोज पाय धुण्यासाठी वेगळ्या टिप्स देण्याची खरंतर काही गरज नाही. रोज पाय स्वच्छ धुवायलाच हवे. पण ही बाब आपण गंभीरपणाने घेत नाही. दिवसभराच्या धावपळीनंतर सगळ्यात जास्त धूळ, घाम आणि किटाणू आपल्या पायांवर असतात. त्यामुळे आपल्याला इन्फेक्शनही होऊ शकतं. असं काही होऊ नये म्हणून पाय पुढील पद्धतीने स्वच्छ करा.
स्टेप 1: पाण्यात पाय बुडवून ठेवा किंवा वाहत्या पाण्याखाली पाय धरा.
स्टेप 2: लुफावर थोडंसं लिक्विड सोप किंवा शॉवर जेल घ्या आणि पायांना स्क्रब करा.
स्टेप 3: बोटांच्या मधील जागा साफ करणं विसरु नका. तिथेच सगळ्यात जास्त बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते.
स्टेप 4: नखांवरची घाणही स्वच्छ करा.
स्टेप 5: त्यानंतर स्वच्छ टॉवेलने पाय पुसून घ्या.
4. मऊ आणि गुळगुळीत पायांसाठी
बऱ्याच जणींच्या टाचांवर भेगा असतात. पण या प्रॉब्लेमपासून तुमची कायमची सुटका होऊ शकते. तुम्ही फक्त या चार टिप्स फॉलो करा.
टीप 1: झोपण्यापूर्वी पायांवर व्हॅसलिन लावा आणि सकाळी धुवून टाका. 1 ते 2 दिवसांतच तुम्हाला फरक जाणवू लागेल.
टीप 2: गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिक्स करुन लावल्यानंतर तुमच्या पायांवर जादू झाली आहे, असंच भासेल. ग्लिसरीन तुमच्या पायांना सॉफ्ट बनवेल तर गुलाब पाणी स्वच्छ ठेवण्यास मदत करेल.
टीप 3: केळ्याचा गर पायांच्या भेगांवर चोळून लावा आणि 15-20 मिनिटांनी पाण्याने पाय स्वच्छ धुवा.
5. मधाळ मधाची जादू
मध पायांसाठी खूप चांगला असतो. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणही आहेत. त्यामुळे पायांवर मध लावलं पाहिजे. कसं ते बघा…
स्टेप 1: एक बादली गरम पाण्यात थोडं मध टाका.
स्टेप 2: 20-30 मिनिटं त्यात तुमचे पाय बुडवून ठेवा.
स्टेप 3: नंतर टॉवेलने पाय पुसून घ्या.
6. ऑलिव्ह ऑईल मऊ पायांसाठी
जैतून तेल म्हणजेच ऑलिव्ह ऑईल फक्त हेल्दी कुकिंग ऑईल नाहीए बरं का? ते तुमच्या त्वचेसाठी चांगल्या मॉइश्चरायजरचं काम करतं. हो… पण चांगल्या परिणांमासाठी ऑलिव्ह ऑईल डायरेक्ट पायांवर लावू नका. तर पुढील पद्धतीचा वापर करा.
स्टेप 1: कापूस ऑलिव्ह ऑईलमध्ये भिजवा.
स्टेप 2: आता या भिजवलेल्या कापसाने पायांवर वर्तुळाकार पद्धतीने 20 ते 25 मिनिटे मसाज करा.
स्टेप 3: तेल लावल्यानंतर पायात मोजे घाला आणि किमान 1 तास तरी मोजे काढू नका.
स्टेप 4: मोजे काढल्यावर पाण्याने पाय धुवा.
चांगल्या परिणांमासाठी महिन्यातून दोनदा असं करा आणि पाहा जादू होते की नाही.