ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
उष्णतेमुळे जेवण खराब होत असेल तर वापरा सोप्या टिप्स

शिजलेले अन्न होत असेल उन्हाळ्यात खराब, तर वापरा सोप्या टिप्स

उन्हाळ्याच्या दिवसात जेवण खराब होते असा अनुभव प्रत्येकालाच कधी ना कधी आलेला असतो. कोणताही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवायचा राहिला तर तो खराब झालाच असा समजा. कधी भात, कधी आमटी तर कधी भाजी खराब होण्याची वेळ प्रत्येकावर कधी ना कधी आलीच आहे. बरेचदा अन्न खराब होण्याला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे पूर्ण जेवण खराब होते. पण जर उन्हाळ्यात उष्णतेमुळे जेवण खराब होत असेल आणि तुम्हाला आपल्या घरातील अन्न खराब होऊ नये असं मनापासून वाटत असेल तर तुम्ही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही तुमच्यासह काही खास टिप्स शेअर करत आहोत, ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेने अन्न खराब होऊ नये याची काळजी घेता येईल. जाणून घेऊया या टिप्स. 

जास्त वेळ बाहेर ठेऊ नका

जास्त वेळ बाहेर ठेऊ नका

Shutterstock

थंडीमध्ये तुम्ही अन्न बाहेर ठेवलं तर ते खराब होत नाही. पण उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी बनवलेले जेवण संध्याकाळपर्यंत बाहेर राहिल्यास, खराब होते. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की, उन्हाळ्याच्या दिवसात जेवण बनवल्यावर किमान दोन तासात ते जेवायला हवं. दोन तासानंतर जेवणामध्ये आंबटपणा यायला लागतो. त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही जेवण बनवल्यानंतर ते जास्त वेळ बाहेर ठेऊ नका आणि दोन तासाच्या आत जेवा. अर्थात जेवण बनवण्याची वेळ त्या पद्धतीने निवडा आणि ताजे जेवण खायचा प्रयत्न करा.

ADVERTISEMENT

जेवणात मीठ जास्त झाले तर या सोप्या ट्रिक्स येतील कामी

दुसऱ्या भांड्याचा करा वापर

पहिली टीप दिली त्याबाबत तुम्हाला कदाचित माहीत असेलही. तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात जुन्या भांड्यामध्ये जेवण काढून ठेवण्यापेक्षा नव्या भांड्यांचा वापर केल्यास, जेवण पटकन खराब होत नाही. जेवण उरल्यास, तुम्ही त्याच भांड्यासह फ्रिजमध्येही ठेऊ शकता. यामुळे जेवणही खराब होत नाही. विशेषतः लहान मुलांसाठी जेवण असेल तर तुम्ही नेहमी फ्रेश आणि चांगल्या भांड्यामध्येच ठेवायला हवे. 

हाती जेवण जेवण्याचे फायदे करतील तुम्हाला थक्क

सगळे जेवण मिक्स करू नका

सगळे जेवण मिक्स करू नका

ADVERTISEMENT

Shutterstock

काही घरांमध्ये जेवण एकत्र करून ठेवण्याची पद्धत असते. पण उन्हाळ्याच्या दिवसात ही चूक अजिबात करू नका. असं केल्यामुळे जेवण पटकन खराब होण्याची शक्यता असते. तुम्ही वेगवेगळ्या भांड्यांचा उपयोग जेवण ठेवण्यासाठी करा. डाळ भात अथवा भाजी कोणत्याही एका भांड्यात ठेऊ नका. तसंच शिळे अन्न आणि ताजे अन्न एकत्र ठेऊ नका. विशेषतः शिळी आमटी ही ताज्या आमटीमध्ये मिक्स करू नका. तसंच भाजी अथवा भाताचेही आहे. फास्ट फूड  असेल तर वेगळ्या भांड्यांमध्ये ठेवा. 

मातीच्या भांड्यात शिजवा जेवण आणि मिळतील आरोग्याला फायदे

सतत जेवण गरम करू नका

बऱ्याच जणांना सारखं जेवण गरम करायची सवय असते. पण एक अथवा दोनपेक्षा अधिक वेळा जेवण गरम करू नका. कारण सतत जेवण गरम केल्यानेही खराब होते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात याचा अनुभव जास्त येतो. त्यामुळे एकदा जेवण बनवून फ्रिजमध्ये ठेवलं असल्यास, जेव्हा आपल्याला पुन्हा रात्री हवं असेल तेव्हा गरम करा. तसंच गरम गरम अन्न फ्रिजमध्ये ठेऊ नका. यामुळेही अन्न पटकन खराब होण्याची शक्यता असते. 

ADVERTISEMENT

या सोप्या टिप्स लक्षात ठेवा आणि उष्णतेमुळे जेवण खराब होत असल्यास, तुम्ही याची व्यवस्थित काळजी घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT