ADVERTISEMENT
home / Mental Health
Anorexia Nervosa

वजन वाढेल या भीतीमुळे जेवणाचीच भीती वाटते? ही Anorexia Nervosa ची लक्षणे असू शकतात

बॉडी शेमिंग ही आजच्या पिढीतील सर्वात मोठी समस्या आहे. एखाद्या व्यक्तीचे शरीर, आकार किंवा वजन याबद्दल गंभीर, संभाव्य अपमानास्पद टिप्पण्या करणे म्हणजे बॉडी शेमिंग होय. पृथ्वीवर जितकी माणसे आहेत त्यातील प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे.  प्रत्येकाचे रंग, रुप, बॉडी टाईप आणि वजन वेगवेगळे असते. आणि प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा सारखाच हक्क असतो. परंतु समाज आणि माध्यमे आपल्यावर ब्युटी स्टिरियोटाइप आणि बॉडी स्टॅण्डर्ड ठरवून खूप दबाव आणतात. 

अलीकडे, बॉडी इमेज आणि बॉडी शेमिंग बद्दल बरेच वादविवाद झाले आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांना तर या विषयावरून खूप मनस्ताप सहन करावा लागतो.  बॉडी शेमिंग ही अत्यंत त्रासदायक संकल्पना आहे आणि ती एखाद्या व्यक्तीवर खूप नकारात्मक परिणाम करू शकते. किशोरवयीन मुलांमध्ये बॉडी शेमिंगच्या हानिकारक प्रभावांमध्ये त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास कमी होतो, त्यांची मानसिक स्थिती खराब होते आणि वजन वाढते. मग वजन कमी करण्यासाठी म्हणून उपाशी राहणे किंवा मनात जेवणाचीच भीती बसणे असे प्रकार खरंच घडतात. या प्रकाराला वैद्यकीय भाषेत Anorexia Nervosa असे म्हणतात.

एनोरेक्सीया म्हणजे काय?

एनोरेक्सिया  नर्वोसा ही एक इटिंग डिसऑर्डर आहे. या डिसऑर्डरने ग्रस्त लोक हे अत्यंत कृष असतात. तसेच त्यांच्या मनात  वजन वाढण्याची तीव्र भीती असते. एनोरेक्सिया असलेले लोक त्यांचे वजन आणि शरीराचा आकार नियंत्रित करण्यासाठी वाटेल ते अघोरी उपाय करतात.  

वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी किंवा वजन कमी करणे सुरू ठेवण्यासाठी एनोरेक्सिया असलेले लोक एक तर खूप कमी खातात आणि खाल्ल्यानंतर उलट्या करून किंवा जुलाब होण्याचे औषध घेऊन किंवा एनीमा यांचा गैरवापर करून कॅलरीजचे सेवन नियंत्रित करतात. ते जास्त व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न देखील करू शकतात. वजन कितीही कमी झाले तरी वजन वाढण्याची भीती या व्यक्तींना वाटत राहते. एनोरेक्सियाचा संबंध अन्नाच्या भीतीशी नसून भावनिक समस्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करण्याचा हा एक अत्यंत अस्वस्थ आणि जीवघेणा मार्ग आहे.

ADVERTISEMENT

एनोरेक्सीयाची काही सामान्य लक्षणे 

एनोरेक्सियाची काही लक्षणे वजन अत्यंत कमी होणे, कृष, कुपोषित शरीर, शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणे, थकवा, निद्रानाश, अनेकदा चक्कर किंवा मूर्च्छा येणे, पातळ, तुटलेले किंवा गळणारे केस, मुलींमध्ये मासिक पाळी न येणे, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी, कोरडी किंवा पिवळी त्वचा, थंडी सहन न होणे, हृदयाचे अनियमित ठोके, कमी रक्तदाब, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, हात किंवा पाय सुजणे, सततच्या उलट्यांमुळे दातांची झीज होणे अशी असू शकतात.

या आजाराला समाजाचे ब्युटी स्टँडर्ड्स जबाबदार 

मुली आणि स्त्रियांना एनोरेक्सिया  होण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही हल्ली मुलांमध्ये आणि पुरुषांनाही इटिंग डिसॉर्डर्स होण्याचे प्रमाण वाढले आहे. याला कारण  समाजाने व माध्यमांनी आखून दिलेले ब्युटी स्टँडर्ड्स आहेत.

किशोरवयीन मुलांना एनोरेक्सिया होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. तरीही, कोणत्याही वयोगटातील लोकांना ही इटिंग डिसऑर्डर होऊ शकते. याचे कारण असे की, पौगंडावस्थेमध्ये मुलामुलींच्या शरीरात अनेक बदल होत असतात. एखाद्याचे वजन वाढते तर एखाद्याचे वजन अचानक कमी होते. यामुळे टिनेजर्सना समवयस्कांच्या वाढत्या दबावाचाही सामना करावा लागू शकतो. तसेच वजन किंवा शरीराच्या आकाराबद्दल टीका किंवा अगदी प्रासंगिक टिप्पण्यांचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

दुर्दैवाने, एनोरेक्सिया असलेल्या बर्‍याच लोकांना सुरुवातीला उपचार नको असतात. पण बारीक राहण्याची त्यांची तीव्र  इच्छा त्यांच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. जर तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही अशाच विकाराने ग्रासले असेल तर कृपया वैद्यकीय मदत घेण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करा. कारण या विकारात खरोखरच माणूस खंगून खंगून संपतो. 

ADVERTISEMENT

फोटो क्रेडिट – istockphoto , dreamstime

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

28 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT