शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहे. पण डोळे हा शरीराचा असा भाग आहे जे नसतील तर तुम्हाला हे सुंदर जग पाहता येणार नाही. डोळ्यांचे आजार (dolyanche aajar in marathi) कधीकधी आपण दुर्लक्षित करतो. पण हेच डोळ्यांचे आजार गंभीर स्वरुप धारण करु शकतात. डोळ्यांच्या या आजारविषयी जर तुम्हाला जास्त माहिती नसेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या या महत्वपूर्ण माहितीचा उपयोग करुन डोळ्यांची काळजी घेऊ शकता. डोळ्यांची निगा राखणे हे आपल्या हातात असले तरी काही वेळा डॉक्टरांचा योग्य सल्ला जाणून घेणेही गरजेचे असते. म्हणूनच डोळ्यांचे आजार व उपचार विषय आपण जाणून घेणार आहोत. चला करुया सुरुवात
डोळ्यांचे आजार व उपाय (Eye Problems In Marathi & Remedies)
डोळ्यांचे आजार कधी कधी गंभीर वाटत नाहीत. पण त्याकडे दुर्लक्ष करुनही चालत नाही.कारण हे लहान लहान वाटणारे आजारही भयंकर रुप धारण करु शकतात. डोळ्यांचे काही आजार आणि त्यावर काही उपाय आम्ही सांगणार आहोत. पण प्रत्येकाच्या डोळ्यांचा विचार करता या इलाजांव्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य आहे. त्यामुळे हे उपाय करण्याआधी तुमच्या डोळ्यांची समस्या योग्यपद्धतीने डॉक्टरांकडून जाणून घ्या.
डोळा येणे (Eye Drooping)
डोळ्यांच्या बाबतीत होणारा हमखास त्रास म्हणजे ‘डोळा येणे’ उन्हाळ्याच्या सुट्टीत जर हा त्रास अनेकांना हमखास व्हायचा. लहानपणी डोळा येण्याचा त्रास तुमच्यापैकीही अनेकांना झाला असेल. डोळा आला की, डोळा लाल होतो, सुजतो आणि डोळ्यांच्या कडांमध्ये सतत घाण जमू लागते. डोळ्यांना सूज आल्यामुळे डोळे उघडणे कठीण होऊन जाते. हा एक संसर्गजन्य त्रास असून जर त्या काळात तुमच्या नजीक कोणी राहिले आणि त्यांची प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्यांना देखील हा त्रास होऊ शकतो. डोळा आल्यानंतर त्याची स्वच्छता राखणे फार गरजेचे असते. या त्रासासाठी डॉक्टरांचा औषधोपचार असला तरी घरच्या घरी ही काळजी घेता येते
घरगुती उपाय (Home Remedies):
- वेळच्या वेळी डोळा कॉटनच्या रुमालाने स्वच्छ करुन घ्या.
- डोळ्यांसाठी मिळणारे खास ड्रॉप घालून डोळ्यांची स्वच्छता करा. दर तीन तासाने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करा.
- बाहेर जाताना गॉगलचा प्रयोग जरुर करावा.
मोतीबिंदू (Cataracts)
आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यांवर एक नैसर्गिक भिंग असते. ज्यामुळे तुम्हाला अगदी दूरच्या गोष्टीही स्पष्ट दिसत असतात. पण डोळे जर कमजोर झाले असतील तर डोळ्यांची ही दृष्टी अंधुक होऊ लागते. भिंगावर ‘मोती’सारखा एक आकार तयार होतो. मोतीबिंदू म्हणजे डोळ्यांवर एक अंधुक आणि गढुळ पडदा तयार होतो. डोळ्यांचा त्रास अर्था मोतीबिंदू हा वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. मधुमेह, दमा, सतत प्रकाशाला सामोरे जाणे, धुम्रपान, मद्यपान या वेगवेगळ्या कारणांमुळे मोतीबिंदूचा त्रास होऊ शकतो. जर तुमची दृष्टी अंधुक झाली असेल तर तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन याची खातरजमा करुन घ्या.
डोळ्यावर पडदा येणे घरगुती उपाय घरगुती उपाय (Home Remedies):
- मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर तुम्हाला काळजी घेणे गरजेचे असते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डोळ्यांची स्वच्छता ही डॉक्टर सांगतील अशीच करा.
- ऑपरेशननंतर डोळ्यांवर चष्मा घालणे गरजेचे असते.
- सतत प्रकाशात जात असताना काळ्या चष्मांचा वापर करा.
राजंणवाडी (Stye)
पापण्यांजवळ मुळाशी एखादी गाठ किंवा पू असलेली पुळी येणे म्हणजेच रांजणवाडी. रांजणवाडी आल्यानंतर डोळ्यांच्या आजूबाजूला भाग खूपच दुखू लागतो. राजंणवाडी आल्यावर त्याची पुळी मुळीच फोडण्याचा हट्ट करु नये. कारण ती पुळी उगाचच फोडली तर तो पू उलट रक्तातून जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे रांजणवाडी आल्यानंतर त्या पुळीची काळजी घेणे फारच महत्वाचे असते. साधारण 5 ते 7 दिवस याचा त्रास होतो. त्यानंतर तो पू आपोआप निघून जातो आणि डोळा पूर्ववत होतो. रांजणवाडी घरगुती उपाय करुन पाहिला तर तो बरा होऊ शकतो.
घरगुती उपाय (Home Remedies):
- लसणाची पाकळी घेऊन ती ठेचावी. त्याचा रस काढून तो रस पुळीच्या वरील भागावर लावावा. असे करताना तो रस डोळ्यांच्या आत जाऊ देऊ नका.
- रांजणवाडीच्या ठिकाणी वरुन थोडा थोडा कपडा गरम करुन शेक द्यावा. त्यामुळे पुळी लवकर पिकते आणि तिच्यातून पू बाहेर येतो आणि लवकर सुटका होते.
- रांजणवाडीमध्ये पू बाहेर काढण्यासाठी एखादी पापणी ओढून त्यातूनही पू बाहेर येण्यासाठी जागा केली जाते. पण असे करता येत नसेल आणि आराम मिळत नसेल तर नेत्रतज्ज्ञांकडे जाणेच योग्य ठरेल.
रात आंधळेपणा (Night Blindness)
दिवसा उत्तम दिसणे आणि सूर्यप्रकाश कमी झाल्यास दृष्टी अंधुक होणे याला रात आंधळेपणा म्हणतात. A जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हा आजार होण्याची शक्यता असते. रेटीनाचा हा आजार असून याकडे दुर्लक्ष करुन मुळीच चालत नाही. कारण सुरुवातीला रात्रीच्या वेळी कमी दिसते पण हळुहळू डोळ्यांचा हा आजार फारच बळावत जातो. त्यामुळे याचा योग्यवेळी सल्ला घेणे आवश्यक असते. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आहार हा फार महत्वाचा असतो.
घरगुती उपाय (Home Remedies):
- A जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. त्यामुळे तुम्ही असे जीवनसत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करा. उदा. गाजर, रताळी, टोमॅटो, भोपळा, आंबा, संत्री, कोथिंबीर, अळू, दूध,लोणी यांचे सेवन करावे.
- शरीरात मेद वाढवतील अशा पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे. त्यामुळे व्हिटॅमिन A शरीराला योग्य पद्धतीने मिळण्यास मदत होते.
नेत्रहीन (Visually Impaired)
डोळ्यांच्या आजारांमधील सगळ्यात धोकादायक प्रकार म्हणजे नेत्रहीनता. ही कमी-जास्त प्रमाणात असू शकते. डोळ्यांचा हा त्रास अगदी कोणालाही आणि कधीही होऊ शकतो. याकडेही दुर्लक्ष करुन चालत नाही. या प्रकारामध्ये डोळ्यांची पूर्ण दृष्टी जात नाही. पण असे असले तरी देखील याची योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे आहे.
घरगुती उपाय (Home Remedies):
- योग्य आहार घेणे यासाठी आवश्यक आहे. नैसर्गिक पद्धतीने शरीरातील कमतरता भरुन काढा.
- डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्या. अंधारात किंवा कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी मुळीच काम करु नका.
खुपऱ्या (Huts)
जंतूसंसर्गामुळे होणारा डोळ्यांचा आणखी एक आजार म्हणजे खुपऱ्या. या आजारामध्ये डोळ्यात काहीतरी गेले आहे असे सतत वाटत राहते. डोळा सतत चोळावा असे वाटते. डोळ्यांखाली खाज येत राहते. डोळ्यात धूळ-मातीचे कण गेल्याची जाणीव होते. पण प्रत्यक्षात असे काही नसते. डोळा वर करुन पाहिल्यास पापण्यांच्या भागात पांढऱ्या रंगाचे लहान- लहान कण तयार झालेले असतात. हे कण फारच त्रासदायक असतात. याकडे लक्ष दिले नाही तर डोळ्यांमध्ये फुल पडण्याची शक्यता निर्माण होते. दुर्लक्ष केले तर त्यामुळे आंधळेपणाही येण्याची शक्यता असते.
घरगुती उपाय (Home Remedies):
- खुपऱ्या झाला आहे की नाही याचे निदान डॉक्टरांकडून करावे लागते. त्याचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला दिलेले मलम डोळ्यामध्ये लावणे गरजेचे असते.
- असे केले तरच तुम्हाला त्यामध्ये आराम मिळू शकतो.
बुबुळ वक्रता (Astigmatism)
बुबुळ वक्रता झाली की, डोळ्यांची दृष्टी आपोआप कमी होते. डोळ्यांना अंधुक अंधुक दिसायला लागते. डोळ्यांचा हा त्रास झाला की, चष्मा लावण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. चष्मा लावल्यानंतरच तुम्हाला बरे वाटते. त्यामुळे डोळ्यांवर ताण येत नाही. हा त्रास अगदी लहान मुलांपासून कोणालाही होऊ शकतो. अशा डोळ्यांच्या आजारासाठी भिंगाचा चष्मा वापरण्याचा सल्ला दिला जातो. डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी काही खास उपाय करु शकता
घरगुती उपाय (Home Remedies):
- डोळ्यांना चष्मा लावून ठेवणे.
- वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणे. डोळ्यांची काळजी घेणे.
- डॉक्टरांना काही कालावधीनंतर डोळा दाखवणे
काचबिंदू (Glaucoma)
ज्या प्रमाणे शरीरासाठी रक्तदाब हा प्रकार असतो. अगदी तसाच डोळ्यांबाबत असलेला हा त्रास आहे. काचबिंदू हा डोळ्यांवर दाब वाढल्यामुळे होतो. डोळ्यांवर दाब वाढला की, त्याचा परिणाम दृष्टिवर होऊ लागतो. डोळे अचानक दुखू लागतात. जर याकडे दुर्लक्ष केले तर तुमची दृष्टी जाऊ शकते. त्यामुळे काचबिंदूकडे दुर्लक्ष करुन मुळीच चालत नाही. यावर योग्य डॉक्टरी इलाज गरजेचा असतो.
घरगुती उपाय (Home Remedies):
- डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच तुम्ही औषधांचे सेवन करु शकता. यामध्ये अनेकदा शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही दिला जातो. या व्यतिरिक्त तुम्हाला काळजी घेण्यापलीकडे मनाने असा कोणताही घरगुती इलाज करता येत नाही.
आळशी डोळा (Amblyopia)
आळशी डोळ्यामध्ये डोळ्यांना कोणताही विशेष असा आजार नसतो. पण यामध्ये दृष्टी कमी होते. दृष्टी कमी झालेली असताना चष्मा देऊनही चांगले न दिसण्याचा त्रास म्हणजे आळशी डोळा. आळशी डोळा हा प्रकार बालपणीच होतो. मुलांमध्ये दृष्टी तयार होण्याची प्रक्रिया ही वयाच्या 9 वर्षांपर्यंत होते त्या कालावधीतच हा आजार त्यांना होऊ शकतो. यामध्ये तिरळेपणा, दोन डोळ्यांच्या नंबरमध्ये असलेली तफावत, लहान वयात मोतीबिंदू असा त्रास होऊ शकतो.
घरगुती उपाय (Home Remedies):
- जो डोळा आळशी आहे त्याच्याकडून अधिक काम करुन घेतले जाते.त्यासाठी सर्वसामान्य डोळ्यावर पट्टी लावतात. त्यामुळे आळशी डोळा कार्यरत होतो.
- डोळाबंद ही प्रक्रिया डॉक्टरांना विचारुन केली जाते. त्यानुसार त्याचा कालावधी ठरवला जातो.
योग्य नंबरच्या चष्म्याचा वापर करणे महत्वाचे असते.
लासरू – डोळयाला पाझर (Dacryocystitis)
डोळ्यांच्या नाकाकडील कडांमध्ये एक छिद्र असते. ज्यामधून अश्रू बाहेर येतात. ज्यावेळी आपण रडतो त्यावेळी डोळ्यातून आणि नाकातून दोन्हीकडून पाणी येते. काही आजारांमध्ये किंवा जंतूरोगामध्ये हे छिद्र बंद होते आणि डोळ्यांमधून पाणी येणे बंद होते. अश्रुनलिका बंद झाल्या की, डोळे सतत पाणावलेले वाटत राहतात. अशा डोळ्यांच्या आजारावर (dolyanche aajar in marathi) तज्ज्ञांचा सल्ला हा फारच महत्वाचा असतो. त्यानंतरच डोळ्यांची काळजी कशापद्धतीने घ्यायची हे तुम्हाला कळू शकते.
घरगुती उपाय (Home Remedies):
- दिवसातून कमीत कमी वेळा डोळा चोळा
- डोळ्यांना सतत हात लावू नका.
- डोळ्यांसाठी सांगितलेली औषधे योग्यवेळी घ्या.
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी (How To Take Care Of Eyes)
डोळ्यांची काळजी घेणे हे फारच महत्वाचे असते. अगदी घरच्या घरी आणि रोजच्या रोज काही गोष्टी केल्या तर तुम्ही डोळ्यांची काळजी घेऊ शकता.
पौष्टिक आहार (Healthy Balance Diet)
उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार महत्वाचा असतो. डोळे चांगले राहण्यासाठी आहार हा पौष्टिक असेल तर तुम्हाला योग्य प्रमाणात प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन A,B,E शरीरात जाणे फारच गरजेचे असते. व्हिटॅमिन्सने युक्त असलेली फळं, भाज्या, मासे यांचा आहारात समावेश असू द्या. आहारात यांचे प्रमाण योग्य असेल तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य दीर्घ काळासाठी चांगले राहील. त्यामुळे पौष्टिक आहार घ्या
डोळ्यांवर घाला प्रोटेक्टिव्ह चष्मे (Wear Protective Eyewear)
बदलते वातावरण, बदलता काळ पाहता आपण सगळेच तासनतास टीव्ही, फोन, लॅपटॉप स्क्रिनकडे पाहात काम करतो. जास्त काळ याच्या संपर्कात राहिल्यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोकं दुखणे, डोळे लाल होणे असे त्रास होऊ लागतात. या सगळ्यांपासून दूर राहणे शक्य नसेल तर या वर उपाय म्हणून तुम्ही डोळ्यांवर प्रोटेक्टिव्ह चष्मे घाला. नंबर नसतानाही तुम्हाला डोळ्यांसाठी चष्मा मिळतो. गॅजेटचा सातत्याने उपयोग करताना तुम्ही या चष्म्याचा उपयोग करु शकता. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो. शिवाय प्रवासात जर तुम्हाला धूळ-माती किंवा कचरा उडू नये असे वाटत असेल त्यावेळेही तुम्ही चष्म्याचा वापर करु शकता.
डोळ्यांना द्या आराम (Eye Rest)
शरीर सुदृढ राहण्यासाठी आराम हा फार महत्वाचा असतो. दिवसभर काम करणाऱ्या डोळ्यांनाही आरामाची गरज असते. शक्य असेल तेव्हा काम बाजूला ठेवून किमान 5 ते 10 मिनिटांसाठी डोळे बंद करुन बसा. शांत झोप ही शरीरासाठी फारच महत्वाची असते. आठ तासांची झोप पूर्ण झाली की, डोळ्यांना आराम मिळतो. रात्री झोपताना अंधारात फोनचा वापर करणे टाळा. कारण त्यामुळेही डोळ्यांवर ताण येतो, डोळ्यांची पापणी फडफडते. एकूणच शक्य असेल तेव्हा सगळे काम बाजूला टाकून डोळ्यांना आराम द्या.
स्मोकिंग टाळा (Avoid Smoking)
स्मोकिंगची सवय आरोग्यासाठी चांगली नाहीच पण डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगली नाही. स्मोकिंगमुळे मेंदूचे कार्य आणि त्याला होणारा रक्तपुरवठा खंडीत होतो. स्मोकिंगमुळे झोपेवरही विपरीत परिणाम होतो. मेंदूचे कार्य आणि अपुरी झोप या सगळ्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. त्यामुळे स्मोकिंग टाळा. त्यामुळे त्याचे डोळ्यांवर होणारे परिणाम मुळीच होणार नाही.
वजन नियंत्रणात ठेवा (Maintain Healthy Weight)
वजन वाढीचा परिणाम हा आरोग्यावर वेगवेगळ्या पद्धतीने होतो. वजन क्षमतेपेक्षा जास्त वाढले की डायबिटीजचा त्रास होऊ शकतो. जर डायबेटीजचा त्रास खूप झाला की, त्यामुळेही आंधळेपणा येऊ शकतो. त्यामुळे सगळ्याच दृष्टिकोनातून वजन नियंत्रणात ठेवणे हे फार महत्वाचे आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार योग्य असू द्या. तुमची उंची आणि वजनानुसार तुमचे वजन किती असायला हवे ते जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचे वजन नियंत्रणात ठेवा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम आणि आहार घ्या.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
डोळ्यांसंदर्भातील कोणताही लहानसा त्रास हा हानिकारक आहे. तुम्ही त्याकडे वेळीच लक्ष देणे फार गरजेचे असते. जर तुम्ही डोळ्यांकडे योग्यवेळी लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. विशेषत: काचबिंदू,मोतिबिंदू, अस्पष्ट दृष्टी असे काही त्रास जाणवत असतील तर तुम्ही तातडीने डॉक्टरांकडे जाणेच सगळ्यात बेस्ट आहे.
डोळ्यांच्या त्रासामध्ये आंधळेपणा वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने येऊ शकतो. आंधळेपणामध्ये रातआंधळेपणा, रंगहिनता, कोरडे डोळे,हायपरोपिया, डायबेटिझमळे येणारे अंधत्व, काचबिंदू असे काही याचे प्रकार असून वेगवेगळ्या कारणांमुळे याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
हो, काही अभ्यासकांनी केलेल्या संंशोधनानुसार तणावामुळे आंधळणेपणा येऊ शकतो. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा आणि डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या नसांवर ताण येतो. त्यामुळेही आंधळेपा येऊ शकतो. त्यामुळे जास्त ताण घेणेह डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
डोळ्यांचे आजार या विषयी जाणून घेतल्यानंतर आता डोळ्यांची काळजी योग्य पद्धतीने घ्या.
पुढे वाचा –