योगासनांचा सराव करणे आणि त्याचे शरीरासह मनावर होणारे चांगले परिणाम आपल्या सर्वांना माहीत असतीलच. पण तुम्ही कधी फेस योगा केला आहे का? जसं योगासने केल्यावर प्रत्येक अवयवातील स्नायू मजबूत होतात तसंच फेस योगा केल्यावर चेहऱ्यातील नाक, जबडा, ओठ, गालांवर चांगला ताण येतो. आजकाल चेहरा सुंदर दिसण्यासाठी, स्माइल सुधारण्यासाठी, इन्संट ग्लो साठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि चिरतरूण राहण्यासाठी फेस योगा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यासाठी जाणून घ्या फेस योगा कसा करावा आणि त्याचा आपल्या चेहऱ्यावर काय परिणाम होतो.
फेस योगाचे फायदे
आपलं वय जसं जसं वाढत जातं तस तशी त्वचेमधील कोलेजीनची निर्मिती कमी होत जाते. ज्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि सैल होते. याचा परिणाम चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स, डार्क सर्कल्स असे एजिंग मार्क्स दिसू लागतात. एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी आजकाल बाजारात विविध प्रकारची सौंदर्योत्पादने मिळतात. मात्र अशा महागड्या ट्रिटमेंट अथवा प्रॉडक्टचा वापर करण्याआधी ट्राय करा फेस योगा. कारण फेस योगामुळे घरच्या घरी सहज तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा आणि स्नायू पूर्ववत होण्यास मदत होते.
फेसयोगाचे काही प्रकार
फेस योगाचं महत्त्व समजलं तरी तो कसा करावा अथवा त्याचे काही प्रकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
फिश पोझ (Fish pose)
फेस योगाच्या या प्रकारामध्ये तुम्हाला तुमचे ओठ आणि गाल तोंडात ओढून घेत ओठांचा चंबू करायचा असतो. ज्यामुळे तुमच्या तोंडाचा आकार माशाप्रमाणे दिसू लागतो. काही सेंकद या पोझिशनमध्ये स्थिर राहत तुम्ही पुन्हा तुमचा चेहरा पूर्ववत करायचा असतो. दिवसातून एक ते दोन वेळा या पोझिशनचा सराव तुम्ही करू शकता. ज्यामुळे तुमच्या गाल, जबडा आणि ओठांचे स्नायू मजबूत होतात.
लायन पोझ (Lion pose)
लायन पोझ करण्यासाठी तुम्ही योगा मॅटवर वज्रासनात बसत हात गुडघ्याजवळ नेत जमिनीवर टेकवायचे असतात. ज्यामुळे तुमची शारीरिक स्थिती एखाद्या बसलेल्या सिंहाप्रमाणे होते. त्यानंतर जीभ बाहेर काढत घशातून बाहेर तोंडातील हवा सोडत आवाज करायचा असतो. सिंहाच्या गर्जनेप्रमाणे हा आवाज असतो. ज्यामुळे तुमच्या जबडा आणि घशाला चांगला आराम मिळतो.
माऊथ वॉश पोझ (Mouthwash Pose)
फेस योगामधील हा एक सोपा प्रकार आहे. यासाठी तुम्हाला तोंडात पाणी घेऊन चूळ भरल्याप्रमाणे करायचे आहे. तोंडात फक्त हवा भरून चूळ भरल्याप्रमाणे तोंडाची हालचाल करायची असते. दोन ते तीन वेळा असा सराव केल्यास तुमच्या गाल आणि हनुवटी खालील चरबी कमी होण्यास मदत होते.
चिन लिफ्ट पोझ (Chin Lift Pose)
योगासनांचा सराव करताना वार्म अप पोझिशन म्हणजेच पूर्वतयारीसाठी तुम्ही ही पोझ करू शकता. यामध्ये तुम्हाला ताठ उभे राहत चेहरा वर करत आकाशाकडे पाहायचे असते. त्यानंतर आकाशाचे चूंबन घेतल्याप्रमाणे ओठ आणि चेहऱ्याची हालचाल करत हे आसन करायचे आहे. दोन ते पाच वेळा तुम्ही ही हालचाल करून पुढील आसनाकडे वळू शकता. मात्र यामुळे तुमच्या चेहऱ्याप्रमाणेच मानेलाही चांगला आराम मिळतो.
चिन लॉक पोझ (Chin Lock Pose)
डबल चिन कमी करण्यासाठी हे खूपच उपयुक्त आसन आहे. कारण यात जालंधर बंध बांधला जातो ज्यामुळे चेहरा आणि जबड्यावर चांगला ताण येतो. यासाठी सुखासनात बसा आणि हात गुडघ्यांवर ठेवा. तुमची हनुवटी छातीकडे नेत मान खाली झुकवा. ज्यामुळे हनुवटी लॉक केल्याप्रमाणे पोझिशन तयार होईल. गाल आणि हनुवटीखाली चरबी या आसनाच्या सरावाने नक्कीच कमी होईल शिवाय यामुळे तुमच्या थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक