प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे बाबा. काही मुलांचं बाबांशी चांगलं मैत्रीचं नातं असतं, तर काही मुलं आपल्या वडिलांना खूपच घाबरतात. पण बाबा ही अशी व्यक्ती आहे, ज्यांचं महत्त्व आपल्या आयुष्यातून कधीच कमी होत नाही. 2022 मध्ये 19 जून रोजी फादर्स डे (World Father’s Day) साजरा करण्यात येत आहे. साधारण जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्यात येतो. पितृदिनाचे महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? आपल्याकडेदेखील हा दिवस गेले काही वर्ष साजरा करण्यात येतो. सहसा आपण आईसाठी कविता अथवा आईसाठी बरंच काही करत असतो. आईसाठी आईकडे व्यक्त होत असतो. पण बाबांसाठी काही करायचं म्हटलं की नक्की काय करायचं हे कळत नाही. त्यामुळे बाबांसाठी भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्तम दिवस आहे बाबांना फादर्स डे शुभेच्छा द्या अथवा बाबांना खास वडील चारोळ्या पाठवा आणि यावर्षी वडिलांना घ्या खास गिफ्ट. बाबांना काय गिफ्ट देता येईल याच्या काही सोप्या आयडियाज.
परफ्युम
आपण आपल्या वडिलांना अगदी पहिला पगार आल्यानंतरही काही द्यावं अशी मनोकामना ठेवतो. तसंच फादर्स डे च्या दिवशी आपल्या वडिलांना त्यांना आवडेल असं आणि लाँग लास्टिंग अर्थात जास्त काळ सुगंध टिकून राहील असं परफ्युम देऊ शकतो. अनेकांच्या वडिलांना परफ्युमची आवडत असते. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे परफ्युम गिफ्ट करून त्यांचा दिवस करा खास. Bvlgari चे पाच सुगंध मिक्स करणारे परफ्युम यासाठी उत्तम ठरेल. यामध्ये रम, आयरिस, मसाले, अॅब्सोल्युट, ट्युबरोज आणि लेदर याचा वापर करण्यात आला असून हे अधिक काळ टिकते
उपलब्ध आहे – Tata CLiQ Luxury किंमत – रू. 22,000
स्किन केअर किट
तुम्ही स्वतःच्या त्वचेच्या काळजीसाठी नक्कीच अनेक वेळा पैसे खर्च करत असता. असाच अनुभव तुम्ही तुमच्या वडिलांनाही देऊ शकता. आपल्या वडिलांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी त्यांना Organic Harvest चे विटामिन ए गिफ्टिंग किट तुम्ही देऊ शकता. त्वचेची काळजी केवळ महिलांसाठीच असते असं नाही तर आपल्या वडिलांनाही त्वचेच्या काळजीची तितकीच गरज असते. हे 100% ऑर्गेनिक असून तुमच्या वडिलांच्या त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि याशिवाय एका विशिष्ट वयानंतर चेहऱ्याला विटामिन ए ची गरज भासते, जेणेकरून चेहरा अधिक तरूण दिसण्यास मदत मिळते. तुम्हीही असे गिफ्ट देऊन आपल्या वडिलांचा दिवस खास करा.
उपलब्ध आहे – organicharvest.in किंमत – रू. 2197
हातातील घड्याळ
तसं बघायला गेलं तर घड्याळ हा प्रत्येक पुरूषाची आवडती गोष्ट आहे. त्यातही एखादे महागडे आणि इम्पोर्टेड घड्याळ असेल तर मग क्या बात! या फादर्स डे चे निमित्त साधून तुम्ही तुमच्या बाबांना असेच एखादे महागडे आणि त्यांच्या आवडीचे घड्याळ देऊ शकता. अनेक घड्याळ्याच्या कंपनी आहेत, ज्या उत्तमोत्तम डिझाईन्सचे घड्याळ बनवतात. तुमच्या वडिलांना क्लिन डिझाईन्स आणि अप्रतिम, क्लासी कलेक्शनची आवड असेल तर तुम्ही FREDERIQUE CONSTANT चे घड्याळ त्यांना भेटवस्तू म्हणून द्या.
उपलब्ध आहे – Tata CLiQ Luxury किंमत – रू. 74,000
पर्सनलाईज्ड लेदर वॉलेट
तुम्हाला तुमच्या बाबांसाठी काय गिफ्ट घ्यायचं आहे हे कळत नसेल तर सोपा पर्याय म्हणजे पर्सनलाईज्ड लेदर वॉलेट (Personalised Leather Wallet). खिशात एखादं मस्त पाकिट असेल तर आपल्या वडिलांनाही बरं वाटतं. त्यातही लेदरचं स्टायलिश पाकिट असेल तर गोष्टच वेगळी! या फादर्स डे च्या दिवशी तुम्ही तुमच्या बाबांना असंच वॉलेट गिफ्ट म्हणून द्या.
उपलब्ध आहे – igp.com किंमत – रू. 899
कॉफी ब्रूअर्स (Coffee Brewers)
तुमचे वडील तर कॉफीचे चाहते असतील तर हा पर्यायही उत्तम आहे. सतत आईला कॉफी करायला जर बाबा सांगत असतील आणि आईला पण आता कंटाळा आला असेल तर तुम्ही तुमच्या बाबांसाठी हे गिफ्ट घेऊ शकता. बनवायला अगदी सोपे आणि त्याशिवाय तुमच्या स्वयंपाकघरात हे दिसायलाही सुंदर दिसते. वेस्टसाईडमधून तुम्ही हे पटकन खरेदी करू शकता. याशिवाय कोणावरही अवलंबून न राहता तुमच्या वडिलांना स्वतःच्या हाताने पटकन कॉफी करण्याचा आणि तो पिण्याचा आनंद काही वेगळाच आहे.
उपलब्ध आहे – westside किंमत – रू. 1,199
तुम्हालाही तुमच्या वडिलांच्या आवडीप्रमाणे इतर काही गिफ्ट्स द्यायचे असतील तर सध्या अनेक वेबसाईट्सवर सेल सुरू आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा फायदा घेऊनही तुमच्या बाबांचा हा दिवस नक्कीच खास करू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक