Advertisement

सौंदर्य

सदैव हसरा चेहरा हवा तर फॉलो करा या सोप्या टिप्स

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Apr 4, 2021
सदैव हसरा चेहरा हवा तर फॉलो करा या सोप्या टिप्स

चेहरा हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो असं म्हणतात. एखाद्याकडे पाहिल्यावर सर्वात लक्षवेधी ठरतं ते म्हणजे त्याचं हसणं. स्मितहास्य करणारी व्यक्ती नेहमीच सर्वांना हवी हवीशी वाटते. हसऱ्या चेहऱ्याची माणसं इतरांवर स्वतःची छाप पाडण्यात यशस्वी होतात. मात्र कधी कधी दातांची रचना चुकीची आहे म्हणून, तोंडाला घाणेरडा वास येतो म्हणून अथवा बोलण्याचा संकोच वाटत असल्यामुळे काही लोक इतरांना पटकन स्माईल देणं टाळतात. यासाठीच जाणून घ्या सदैव हसरा चेहरा ठेवण्यासाठी नेमकं काय करायला हवं.

तुमचे दात नियमित स्वच्छ करा –

हसल्यावर सर्वात आधी दिसतात ते तुमचे दात. मात्र दात वाकडे तिकडे अथवा खराब असतील तर हसण्याचा  संकोच वाटतो. यासाठीच दिवसभरात नियमित दोन वेळा दात स्वच्छ करा. दात स्वच्छ करण्यासाठी आजकाल तीथ पॉलिशिंग अथवा तीथ व्हाईटनिंग करणारे अनेक प्रॉडक्ट अथवा साधने मिळतात. या गोष्टी वापरूनही तुम्ही तुमचे दात पांढरे शुभ्र करू शकता. मात्र असं करताना तुमच्या दातांच्या वरील आवरण निघून जाणार नाही याची काळजी घ्या. कारण दातांच्या संरक्षणासाठी ते खूप महत्त्वाचे असते. यासाठी तज्ञ्जांचा योग्य सल्ला घ्या. 

दात घासण्याची योग्य पद्धत –

दात घासणं हे खूप महत्त्वाचं आहे पण त्याहून महत्त्वाचं आहे योग्य ब्रशने आणि योग्य पद्धतीने दात घासणे. अती कठीण अथवा अती मऊ केस असलेला दातांचा ब्रश वापरण्यामुळेही दातांचे आरोग्य बिघडू शकते. यासाठीच दात आणि हिरड्यांसाठी योग्य अशा ब्रशची निवड करा. शिवाय तुमची दात घासण्याची पद्धत योग्य आहे का ते पाहा. दात नेहमी हळूवारपणे आणि सर्क्युलर मोशनमध्ये घासावेत. शिवाय तोंडाला वास येऊ नये यासाठी योग्य ते उपचार करावेत.सतत चुळ भरल्यामुळे तुमच्या तोंडाला घाणेरडा वास येत नाही आणि तुम्हाला हसण्याचा संकोचही वाटत नाही. 

दंतवैद्याचा सल्ला घ्या –

आरोग्य तपासणीसोबतच वर्षातून अथवा दोन वर्षातून एकदा दातांची तपासणीदेखील करायला हवी. कारण दातांची  रचना अथवा दातांच्या समस्या यामुळे लवकर बऱ्या होऊ शकतात. जर तुम्हाला तुमचे हास्य चांगले असावे असे वाटत असेल तर तज्ञ्जांकडून दातांची रचना  सुधारून घ्या. आजकाल दातांची रचना नीट करण्यासाठी मेटल अथवा सिरॅमिक अशा अनेक प्रकारच्या  ब्रेसेस बाजारात उपलब्ध असतात. ज्यामुळे तुमचे पुढे आलेले अथवा वाकडे तिकडे दात नीट होऊ शकतात. दात व्यवस्थित असतील तर तुम्ही बिनधास्त आणि मनापासून हसू शकता.

सर्वात महत्त्वाचा आहे आत्मविश्वास –

हसण्यासाठी दात कसे आहेत अथवा तुम्ही कसे  दिसता यापेक्षा तुमचा स्वतःबद्दल असलेला आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. त्यामळे जर तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असेल तर तो तुमच्या चेहऱ्यातून नक्कीच झळकतो. त्यामुळे दातांची रचना अथवा चेहऱ्याचा शेप बदलण्याची कोणतीही ट्रिटमेंट न करताही तुम्ही आत्मविश्वासाने तुमचे हास्य सुधारू शकता. जेव्हा तुम्ही मनापासून आनंदी असता, मनमोकळ्या स्वभावाचे असता तेव्हा तुमचा चेहरा सदैव हसराच दिसतो. त्यामुळे जगाला आत्मविश्वासाने सामोरे जा. 

हसण्याचा सराव आणि व्यायाम करा –

हास्य सुधारण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे चेहऱ्याचे व्यायाम करणे. जर तुमच्या ओठांचा आकार खोली ओघळणारा असेल तर तुमचे हास्य परफेक्ट दिसत नाही. यासाठीच तुमची स्माईल लाईन योग्य पद्धतीने कर्व्ह होईल असा हसण्याचा सराव करा. ओठ बंद करून एक स्माईल द्या आणि थोडावेळ चेहरा तसाच होल्ड करा. सतत असा हसण्याचा सराव केल्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीने हसण्याची  सवय लागेल. शिवाय फोटो काढताना अथवा इतरांना स्मितहास्य देताना तुमचा चेहरा सदैव हसरा वाटेल. मात्र लक्षात ठेवा मनपासून हसा आणि ते सहज असू द्या. कारण तुमच्या हास्यातून  तुमच्या मनातील खऱ्या भावना लोकांपर्यंत पोहचत असतात. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

फोटो येतील एकदम परफेक्ट, पोझ देताना असू द्या या गोष्टी लक्षात

तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे उपाय (How To Get Rid Of Bad Breath)

हसण्याचे ‘7’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का