2021 च्या या नव्या वर्षात फिटनेस मनावर घ्यायचे ठरवले असेल तर तुम्ही अगदी योग्य ट्रॅकवर आहात. आता नाही तर कधीच नाही. हे मनाशी ठरवून आजपासूनच काही गोष्टींचा श्रीगणेशा करा. महिलांच्या फिटनेसचा विचार केला. तर सर्वसाधारणपणे महिलांना मांड्या आणि नितंब सुटण्याचा त्रास हा अधिक असतो. शारिरीक ताण आणि खाण्याच्या चुकीच्या पद्धती यामुळे महिलांच्या शरीरावर हे परिणाम दिसून येतात. पण यासाठी आहार हा देखील कारणीभूत असतो. 100 पैकी 75 महिला या हल्ली स्ठुल दिसू लागल्या आहेत. या मागे त्यांचा आहार कारणीभूत आहे. नितंब आणि मांड्या सुटण्यासाठीही काही पदार्थ कारणीभूत असतात. जर तुम्ही हे पदार्थ तुमच्या आहारातून वगळले किंवा त्यांचे प्रमाण कमी केले तरी देखील तुम्हाला तुमच्या शरीरात बराच फरक दिसून येईल. जाणून घेऊया नेमके कोणते पदार्थ टाळलेत की तुमच्या मांड्या आणि निंतब होतील कमी
आठवड्याभरात नितंब आणि मांड्या कमी करण्याचे उपाय (How To Reduce Butt Fat)
बटाटा
बटाटा हा सगळ्यांच्या इतका आवडीचा पदार्थ आहे की, तो कोणत्याही स्वरुपात आणि कुठल्याही पद्धतीने दिला की तो महिलांना काय समस्त मानवजातीला आवडतो. पण हाच बटाटा कार्ब्स (Carbs) आणि फॅट (Fat) ने भरलेला असतो. त्याच्या अधिक सेवनामुळे शरीरात या दोघांचे प्रमाण वाढते. शरीराला आवश्यक असलेल्या फॅट आणि कार्ब्सपेक्षा त्याचे प्रमाण अधिक झाले की, ते शरीरावर विपरित परिणाम दाखवतात.आता तुम्ही म्हणाल की, बटाटा हा सगळेच खातात. मग महिलांवर त्याचा परिणाम कसा होतो. आपल्याकडे उपवास केल्यानंतर उपाशीपोटी बटाट्यांच्या पदार्थांचा मारा केला जातो. बटाट्याच्या सळ्या ( फ्राईज), बटाटा किस, बटाटा शेव, बटाटा भाजी त्यामुळे बटाट्याचा अतिरेक हा जेवणातून कमी करा. तुमच्या मांड्या आणि नितंबचाचा आकार आपोआप कमी होईल.
तुमच्या शरीरयष्टीनुसार निवडाल कपडे तर तुम्ही नेहमीच दिसाल सुंदर (Dressing Tips In Marathi)
मैदा
मैद्यामुळे पदार्थ हा अधिक चविष्ट लागतो. पण मैदा हा शरीरातील मेद वाढवण्यास कारणीभूत असतो. मैद्याचे पदार्थ हे स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात. त्यामुळे काहीही समोर दिसले नाही की, पोटभरीचा पर्याय म्हणून मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाण्यात येतात. पिझ्झा, ब्रेड-बटर,बर्गर या सगळ्यामध्ये मैदा असतो. त्यामुळे हे असे पदार्थ खाण्यात आले की, त्यांचा चटक लागते. सतत हे पदार्थ खावेसे वाटतात. मैद्याचा पदार्थ तुम्ही एकदा खाल्ला की, वारंवार खाण्याची इच्छा होते. हा मैदा शरीरातील मेद वाढवताना तुमच्या शरीराची मंद हालचाल ही त्यासाठी कारणीभूत ठरते. मैद्याचे पदार्थ खाऊन तुमच्या शरीराल अजिबात व्यायाम मिळत नसेल तर ते सगळे तुमच्या नितंब आणि मांड्यामध्ये जाऊन बसते.
काळवंडलेल्या buttocks च्या त्वचेसाठी सोपे घरगुती उपाय
चीझ
लहानमुलांपासून ते तरुणांपर्यंत चीझ हा पदार्थ सगळ्यांना आवडतो. चीझ हा फॅट वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो. जर तुम्ही चीझचे योग्य प्रमाणात सेवन केले तर ते तुम्हाला एनर्जी देते. पण जर तुम्ही सगळ्याच गोष्टीमध्ये चीझ खात असाल तर चीझ खाणं थोडं कमी करा. चीझ हे जीभेला चव देत असले तरी शरीराला मंद करण्याचे काम करते. शरीराच्या क्रिया मंद करुन तुमच्या पोटाचे आरोग्यही खराब करते. चीझच्या अति सेवनामुळे शरीरात मेद वाढते. महिलांमध्ये मेद वाढले की, हे फॅट पाय, पोट, मांड्या आणि नितंबामध्ये जास्त दिसू लागते. त्यामुळे चीझ हे थोडे कमी करा. जर तुम्हाला चीझ खायचे असेल तर तुम्ही एखादे चीझ स्लाईस ब्रेडसोबत खा. त्याचा फारसा परिणाम होणार नाही. पण सतत तुम्ही चीझ स्लाईस, मेल्टेड चीझ खाऊ नका.
हे तीन खाद्यपदार्थ तुम्ही टाळले तरी देखील नव्या वर्षात तुम्हाला फिटनेस ठेवण्यात मदत होईल. शिवाय तुमच्या मांड्या आणि नितंब सुटणार नाहीत.