तुमच्याही घरात दिवाळीची जोरदार तयारी सुरु झाली असेल. हल्ली कुठेही गेलं तरी प्रत्येकाच्या घरात छान खमंग वास येतात. चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे सर्वसाधारणपणे सगळ्याच घरी बनवले जातात. ज्यावेळी आपण पाहुण्यांकडे जातो. त्यावेळी त्यांनीही ताटात फराळ वाढून दिल्यावर तो खाण्याची इच्छाच होत नाही. तेच तेच पदार्थ पाहून इतका कंटाळा येतो की सगळे नकोसे होते. म्हणूनच तुम्ही दिवाळीला पाहुणे आल्यानंतर त्यांना फराळ देण्यापेक्षा काहीतरी वेगळे काहीतरी द्या की त्यांनाही ते कंटाळवाणे वाटणार नाही. त्यामुळे यंदा दिवाळीच्या शुभेच्छा (diwali wishes in marathi) देताना किंवा घेताना खालील खाद्यपदार्थ नक्की ट्राय करा.
DIY: दिवाळीला घरी स्वतः तयार करा हे ‘आयुर्वेदिक उटणे’
फ्राईड स्नॅक्स

आता पाहुण्यांना द्यायचे म्हणजे काहीतरी चांगले द्यावे असे आपल्याला नेहमीच वाटते. बाजारात मिळणारे चटपटीत रेडी टू मेक स्न्ॅक्स हा मस्त पर्याय आहे. तेलात मस्त तळले की, हे स्नॅक्स तयार होतात. यामध्ये हल्ली इतकी व्हरायटी असते की, तुम्ही एकाच वेळी दोन चार प्रकार घरी आणून ठेवू शकता. दिवाळीच्या दिवसात पाहुणे घरी आले की, त्यांना मस्त हा स्नॅक्स तुम्ही देऊ शकता. केचअपसोबत हा स्नॅक्स एकदम छान लागतो. शिवाय फराळ खाऊन कंटाळलेल्यांच्या पोटालाही थोडा आराम मिळतो. शिवाय एक चटकदार चव तुमच्या जीभेला येईल हेही नक्की.
कॉर्न चाट

हल्ली साधारण वर्षभर आपल्याला कॉर्न मिळतात. या कॉर्नचे चाट चव वाढवणारे असते. तुम्ही कॉर्न चाट खाल्ले असेल तर तुम्हाला माहीत असेलच. तुम्हालाही काही झटपट करायचे असेल तर हा मस्त पर्याय आहे. पाहुणे आल्यानंतरही अगदी 10 मिनिटांच्या आत हा पदार्थ होऊ शकतो. अगदी 5 मिनिटांसाठी कॉर्न छान उकडून घ्या. त्यानंतर त्यात मस्त मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला घाला आाणि वर बटर घालून कॉर्न सर्व्ह करा.
बिस्कीट टॉपिंग्ज

आता तुम्हाला काही थोडे हटके करायचे असेल तर तुम्हाला बिस्कीट टॉपिंग्ज हा पर्यायही पाहुण्यांना देता येईल. त्यासाठी तुमच्या घरी खारी बिस्कीटं, चीझ, कॉर्न असे साहित्य असायला हवे. म्हणजे पाहुणे आल्यानंतर तुम्ही मस्त प्लेटमध्ये बिस्कीट सजवून त्यावर चीझ आणि तुम्हाला हवे असलेले टॉपिंग्ज तुम्ही वापरु शकता. तुम्ही क्रिएटीव्ह असाल तर तुम्ही त्यामध्ये व्हरायटी आणू शकता.
ब्रेड चटणी

आता हा पर्याय तुम्हाला अगदीच वेगळा वाटेल. पण मस्त ब्रेडवर बटर आणि चटणी लावू शकता. ब्राऊन किंवा व्हाईट ब्रेड यासाठी चालू शकेल. चटणी करायला तसा फारसा वेळ लागत नाही. पण तुम्ही ती थोडी थोडी बनवून ठेवली तरी चालू शकेल. ती चटणी वाया जाणार नाही. कारण हा पदार्थ तुम्ही स्नॅक्समध्य घालू शकता. सँडवीच हा पर्याय दिला अशता पण त्यासाठी फार वेळ जातो आणि काहींना त्याचा कंटाळा येतो. म्हणूनच तुम्ही ब्रेड चटणी हा सोपा पर्याय तुम्हाला दिला.
ड्रायफ्रुटस

आता तुम्हाला काहीच कष्ट घ्यायचे नसतील तर तुम्ही मस्त ड्रायफ्रुटस पाहुण्यांना द्या. फराळाला जरी पाहुण्यांनी नाही म्हटले तरी ते ड्रायफ्रुटला नक्कीच नाही म्हणणार नाही. तुम्हाला मिक्स ड्रायफ्रुट नक्कीच तुमच्या पाहुण्यांना देता येईल.
मग आता फराळाला कंटाळेल्या पाहुण्यांना तुम्ही हटके पदार्थ देऊ शकता.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.