Advertisement

सौंदर्य

शरीरातील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट ‘ग्लुटाथिओन’ने मिळवा उत्तम त्वचा!

Dipali NaphadeDipali Naphade  |  Oct 22, 2021
getbetter-skin-with-the-bodys-natural-antioxidant-glutathione

Advertisement

सध्या सर्वत्र सण-उत्सवांचे वातावरण आहे. या काळात बहुतांश जण फिट राहत आपल्या ब्युटी-लुक्सबाबत विचार करतात. सण-समारंभात जाताना उत्साहाची पातळी जरा अधिकच असते, पण या अतिउत्साहाच्या भरात धावपळ, मेकअपच्या अतिरिक्त वापरामुळे आपल्या आरोग्यावर तसेच त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कृत्रिम, फिल्टर्ड लुक्सच्या वाट्याला न जाता आरोग्याची योग्य काळजी घेतली तर आपली त्वचा नैसर्गिकरित्याच सुंदर आणि तजेलदार दिसेल. आपल्या शरीरातच तयार होणाऱ्या ग्लुटाथिओन या मास्टर अँटिऑक्सिडंटमुळे ही किमया घडवता येऊ शकते!

अधिक वाचा – काय आहेत एसेन्शियल ऑईलचे उपयोग

काय आहे ग्लुटाथिओन?

ग्लुटाथिओन…हा खूप जड आणि क्लिष्ट शब्द वाटत असेल ना! पण हा घटक आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असतो. ग्लुटाथिओन हा आपल्या शरीरातील सर्वाधिक अँटिऑक्सिडंट्स असलेला घटक असून याबद्दल क्वचितच माहिती असेल. हे कशासाठी असते? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर याची एक मोठी यादीच आहे. यात असलेल्या घटकांमुळे शरीराची त्वचा तजेलदार, उजळ होतेच पण त्याचबरोबर याचा उपयोग शरीराची सुदृढता वाढविण्यासाठीही होतो. जसजसे सण-उत्सव जवळ येऊ लागतात तसतशी त्वचा उजळ करण्यासाठी आपण प्रयत्न करू लागतो. अर्थात, ही वेळ आहे समारंभ साजरे करण्याची आणि आपल्या व्यक्तिमत्वासह आत्मविश्वासाने सादर होण्याची. हे तुमच्या फिटनेस रुटिनसाठी तयार होण्याइतके सोपे आहे. ग्लुटाथिओन हा असा एक उपाय आहे, जो तुमची त्वचा नैसर्गिकरित्या उजळ ठेवेल. ”जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीरात नैसर्गिकपणे असणाऱ्या ग्लुटाथिओनच्या पातळीमध्ये घट होत जाते. त्याचप्रमाणे जीवनशैली, झोपेचा पॅटर्न, तणावाची पातळी, उन्हाचा संपर्क इत्यादीमुळे शरीरातील ग्लुटाथिओनची पातळी कमी होते. प्रदूषणामुळे होणाऱ्या प्रचंड नुकसानासोबतच, अति डिजिटल एक्स्पोजरमुळेही ग्लुटाथिओनचा ऱ्हास होण्याचा वेग वाढतो. त्यामुळे उजळपणा कायम ठेवण्यासाठी तुम्हाला ग्लुटाथिओन सप्लिमेंटेशनची सुरुवात करावी लागते. हे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हे आपण तोंडावाटे घेऊ शकतो किंवा त्वचेवर लावू शकतो. तोंडावाटे घेतल्याने याचा परिणाम दिसायला वेळ लागतो परंतु होणारा परिणाम हा पूर्ण शरीरासाठी अंतर्बाह्य उपयोगी असतो.” असे अॅड्रॉइट बायोमेड लि.चे सहसंस्थापक आणि संचालक सुशांत रावराणे यांनी सांगितले.

अधिक वाचा – फेशिअलनंतरही येत नसेल चेहऱ्यावर ग्लो, तर त्वचेच्या या प्रकारानुसार घ्या स्टीम

ग्लुटाथिओन वापरून उजळ त्वचा हवी? मग हे जरूर कराच!

काय करावे उजळ त्वचा मिळविण्यासाठी – 
1. ग्लुटाथिओन शक्यतो रिकाम्या पोटी घ्यावे
2. उन्हात जाताना सनस्क्रीनचा वापर करावा
3. संयम ठेवा. दृश्य परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो
4. धुम्रपान आणि मद्यपान टाळावे
5. सुदृढ जीवनशैलीचा अंगीकार करा
6. ताण कमी करा आणि ध्यानधारणा करा

काय करू नये
1. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना भुलू नका
2. सप्लिमेंट्सची निवड केवळ स्वस्त आहे म्हणून करू नका
3. सल्ल्याशिवाय एकाच वेळी अनेक उत्पादने वापरू नका

सनस्क्रीन, अँटिऑक्सिडंट्स, सप्लिमेंट्स आणि सौंदर्यप्रसाधनांचा त्वचेवर बराच परिणाम होत असतो. ग्लुटाथिओन वाढविण्यासाठीच्या नियोजनामध्ये ‘क’ जीवनसत्वाची भर घातली तर परिणाम लवकर साध्य करता येऊ शकतो. सोशल मीडिया फिल्टरप्रमाणे तात्पुरता परिणाम करणाऱ्या झटपट उपायांपेक्षा स्मार्ट शाश्वत स्किन केअर सोल्युशन अधिक परिणामकार असेल. शेवटी, आंतरिक सौंदर्य एका दिवसात येत नाही. ग्लुटोन 1000 हा उजळपणात भर घालणारा कम्पॅनियन असू शकतो. जलद परिणामांसाठी आणि ग्लुटाथिओन अधिक चांगल्या प्रकारे शोषले जावे यासाठी तुम्ही ते Escor-Z नैसर्गिक व्हिटॅमिन सी गोळीसोबत घेऊ शकता. ग्लुटाथिओनमध्ये जगात सर्वोत्तम असलेले जपानमधील सेट्रिया ग्लुटाथिओन आहे, ज्यामुळे त्वचेवर डाग पडणे, स्कीन टोन समान न राहणे, निस्तेज, काळे डाग, उन्हामुळे होणारे नुकसान या सारख्या समस्या हाताळल्या जातात आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हा ग्लुटाथिओनचा सर्वात शुद्ध प्रकार आहे आणि त्यामुळे भारतातील तो ग्लुटाथिओनचा पहिल्या क्रमांकाचा ब्रँड आहे आणि याबाबत अजून एक चांगली बाब म्हणजे त्वचाविकारतज्ज्ञसुद्धा याची शिफारस करतात. “ग्लुटाथिओन हे मानवी पेशींमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट आहे. हा त्वचेला उजळवणारा घटक असल्याचे मानले जाते कारण ते मेलानिनला हलक्या रंगामध्ये परिवर्तित करते. परिणामी, ते मेलानिन पिगमेंटची निर्मिती करणाऱ्या टायरोसिनेस या एन्झाइमला निष्क्रिय करते. हे सुरक्षित आहे आणि तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या किंवा कॅप्सुलच्या प्रकारात त्वचेला एकसारखा स्कीन टोन देण्यास मदत करते.” असे स्किन क्रेस्ट क्लिनिक आणि सैफी हॉस्पिटलमधील सल्लागार त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. प्रवीण बानोडकर म्हणाले. 

अधिक वाचा – कोरड्या त्वचेसाठी वापरा घरातील साहित्य आणि बनवा सोपे मास्क