तुम्ही फोटो काढताना यासाठी नीट हसत नाही का? कारण तुमचे दात पिवळे आहेत. हसल्यानंतर सर्वात पहिले लक्ष जातं ते दातांकडे. दात पिवळे असतील तर दुसऱ्यांना आणि आपल्याला स्वतःलाही खूप ओशाळवाणं होतं. त्यासाठी तुम्ही तुमच्या डेन्टिस्टकडे जाऊन अमाप खर्च करणार असलात तर त्यापूर्वी थोडं थांबा. कारण तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आमच्याकडे काही सोपे घरगुती उपाय आहेत. डॉक्टरांकडे जाऊन खर्च करण्यापेक्षा हे घरगुती उपाय करून तुमच्या दातावरील पिवळेपणाने तुमची सुटका होत आहे का हे आधी पाहा. या घरगुती उपायांनी नक्कीच तुम्ही पु्न्हा एकदा चमकत्या दातांना हसू शकाल.
1. बेकिंग सोडा
घरामध्ये वापरण्यात येणारा बेकिंग सोडा हा दात चमकवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट उपाय आहे. एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यामध्ये 3 थेंब हायड्रोजन पॅरॉक्साईड (प्रमाण योग्य ठेवा) मिसळा. हे दातावर लाऊन तुमच्या हाताच्या बोटांनी अथवा q-टिपच्या मदतीने लावा आणि 30 सेकंद ठेवा आणि मग दात स्वच्छ धुवा.
वाचा – दात दुखीची कारणे आणि घरगुती उपचार
2. लिंबाचा रस
पाव कप बेकिंग सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस व्यवस्थित मिसळून घ्या. आरशासमोर उभं राहून बडच्या सहाय्याने दाताला हे मिश्रण लावा. एक मिनिट ठेऊन द्या आणि नंतर दात धुऊन टाका.
3. अॅप्पल सायडर व्हिनेगर
1 चमचा वर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये काही थेंब अॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळा आणि दातांवर अतिशय हलक्या हाताने रगडा. सर्व वस्तूचं प्रमाण हे व्यवस्थित असायला हवं आणि तसंच तुम्ही घेतलेल्या व्हिनेगरमुळे तुम्हाला अलर्जी तर येत नाही ना याचीही खात्री करून घ्या. यामध्ये असलेल्या अॅसिडिक रिअॅक्शनमुळेच तुमचे दात पांढरे राहतील.
वाचा – अक्कल दाढीचे दुखणे कमी करण्यासाठी प्रतिबंधनात्मक उपाय
4. नारळ तेल
हो हे खरं आहे. नारळाचंं तेल हे केवळ केसांवरच जादू नाही करत तर दातांसाठीदेखील उपयुक्त आहे. तुम्ही यासाठी अनरिफाईंड अथवा वर्जिन नारळ तेलाचा वापर करू शकता. मटर इतक्या आकाराचं तेल तुमच्या टूथब्रशवर लावा आणि काही मिनिट्स चांगल्याप्रकारे ब्रश करा. याचा नियमित वापर केल्यास, तुमच्या हिरड्यादेखील मजबूत होऊ शकतात.
5. रोजच्या सवयींमध्ये सुधारणा करा
दातांवरील डाग आणि पिवळेपणा याचंं सर्वात मोठं कारण म्हणजे कॅफीन आणि निकोटीन आहे, जे आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे. दाताच्या पिवळेपणापासून वाचायचं असेल तर कॉफीसारख्या गोष्टी पिण्यासाठी एक स्ट्रॉ वापरायला हवी. तुमच्या दातांचा कॅफीनबरोबर जितका कमी संबंध येईल तितकं जास्त चांगलं. जेव्हा तुम्हाला वाटेल की, तुम्ही गरजेपेक्षा जास्त स्मोकिंग (धुम्रपान) केलं आहे तेव्हा त्यानंतर लगेच तुम्ही तुमचे दात नीट घासून घ्या. यामुळे दात पिवळे होण्यापासून वाचता येतं.
6. फळं आणि सुक्या मेव्याची जादू
आपल्या डाएटमध्ये स्ट्रॉबेरी, सफरचंद, गाजर अशा खाण्याच्या वस्तूंचा जास्त समावेश करा. हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. बदाम आणि अक्रोडसारखे क्रंची सुका मेवा तर तुमच्या डाएटमध्ये असायलाच हवा. कारण हे तुमच्या दातात तयार झालेले अतिरिक्त ग्लुकोज आणि दुसरे केमिकल्स (कॅफिनमुळे बनणारे केमिकल्स) काढून टाकतात आणि दातावरील पिवळेपणा दूर व्हायला मदत होते.
7. अॅक्टिवेटेड चारकोल
बरेचसे लोक दात चमकवण्यासाठी अॅक्टिव्हेटेड चारकोलचा वापर करतात. हे कोणत्याही औषधांच्या दुकानामध्ये सहज प्राप्त होतं. तुम्हाला फक्त तुमच्या ओल्या टूथपेस्ट पावडरमध्ये हे मिसळायचं आहे आणि तसंच ब्रश करायचं आहे. पण हे व्यवस्थित साफ करायला विसरू नका (याच्या रंगामुळे हे स्वच्छ करणं थोडं कठीण आहे). काही आठवड्यांसाठी तुम्ही याचा नक्की वापर करा जेणेकरून हे दात पिवळे करणाऱ्या पदार्थांना शोषून घेऊन पांढरे दात करण्याकडे जास्त लक्ष देतात.
8. Whitening टूथपेस्ट ट्राय करा
बऱ्याचशी औषधांच्या दुकानांमध्ये whitening स्ट्रिप्स मिळतात, ज्यावर विश्वास ठेवणं नक्कीच योग्य आहे. आजकाल बरेच बाजारामध्ये असे अनेक ब्रँड्स आहेत ज्यामध्ये whitening टूथपेस्ट असते. क्लोज अप डायमंड अट्रॅक्शन टूथपेस्ट, Rs 170, ब्लूलाईट टेक्नॉलॉजी वापरत असल्याचा दावा करत, जे दाताला स्टॅनिंगपासून वाचवतं. तसंच कोलगेट विजिबल व्हाईट, Rs 140, यांचा दावा आहे की, त्यात whitening एक्सेलेटर्स असतात जे नियमित वापरल्यामुळे एका आठवड्यात तुमचे दात पांढरे दिसू लागतात.
फोटो सौजन्य – Shutterstock
हेदेखील वाचा –
पिवळे दात मोत्यासारखे शुभ्र होण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय
दातदुखीसाठी घरगुती उपाय, मिनिटात मिळेल आराम
तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी