ADVERTISEMENT
home / आरोग्य
girls-hitting-early-puberty-reasons-in-marathi

Early Puberty म्हणजे काय? मुलींमध्ये दिसते ही समस्या

एका वयानंतर मुलींच्या शरीरामध्ये अनेक बदल होऊ लागतात. त्याला आपण प्युबर्टी (Puberty) असे म्हणतो. Puberty अर्थात वयात येणे. 11 ते 13 वर्षांच्या मुलींमध्ये ही लक्षणे दिसू लागतात. पण कधी कधी वयाच्या आतच मुली मोठ्या होतात. त्यांच्या शरीरात असामाईक युवावस्था सुरू होऊ लागते. याबाबतीत अनेक महिलांना शंका असतात. विशेषतः ज्या महिलांचे पाल्य मुलगी असते, त्यांच्या मनात मुलींवर याचा कसा परिणाम होतो याबाबत अनेक प्रश्न असतात. पण आपल्याकडे अजूनही अनेक विषयांवर स्पष्टपणे बोलले जात नाही. त्यामुळे Early Puberty म्हणजे नेमकं काय आणि ही समस्या काय असते याबाबत आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. 

Early Puberty म्हणजे नेमकं काय?

अधिकांश मुलींच्या शरीरामध्ये 9 – 11 या वयात शारीरिक बदल होण्यास सुरूवात होते. मात्र बऱ्याचदा वयाच्या सातव्या वर्षीच अनेक मुलींना प्युबर्टीची समस्या होते. तुमच्या मुलींमध्ये जर वयाच्या आधीच प्युबर्टीची अर्थात युवावस्थेची लक्षणे दिसायला लागली तर तुम्हाला वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. 

काय आहेत अर्ली प्युबर्टीची लक्षणे 

Early Puberty ची अनेक लक्षणे असतात, जी मुलींमध्ये दिसून येतात. सर्वात पहिल्यांदा मुलींच्या स्तनांचा आकार बदलू लागतो. यामध्ये मुलीच्या स्तनांच्या खाली एक लहान गाठ दिसून येते. याशिवाय मुलींच्या प्युबिक एरियामध्ये आणि काखेत केस येऊ लागतात. जे प्युबर्टीचे सर्वात पहिले लक्षण आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे मासिक पाळी सुरू होणे. मासिक पाळी सुरू झाली म्हणजे मुलगी वयात आली असं सर्वसामान्य मत आहे. 

मुलींमध्ये दिसून येते ही समस्या अधिक प्रमाणात 

मुलांपेक्षाही मुलींमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. याचे दुष्परिणामही असतात. एखाद्या मुलीला वेळेच्या आधीच युवावस्थेचा सामना कारवा लागला, तर मुलींची उंची वाढत नाही आणि मग उंची वाढविण्यासाठी अनेक उपाय करावे लागतात. याशिवाय मासिक पाळी लवकर सुरू झाल्यास मुली मनाने तयार नसतात. त्यामुळे त्यांना सतत भीती वाटत राहाते आणि त्याशिवाय पाळी लवकर सुरु झाल्यास, अनेक मुलींना वेगवेगळे शारीरिक त्रास आणि आजारांचाही सामना करावा लागू शकतो. 

ADVERTISEMENT

Early Puberty नक्की कारणे काय आहेत?

Early Puberty चे नक्की असे काही कारण नाही. तज्ज्ञांच्यानुसारदेखील यामागे विशिष्ट असे काही कारण नाही. काही मुलींमध्ये हार्मोन्सच्या बदलामुळे Early Puberty ची समस्या निर्माण होते. हार्मोन्स लवकर बदलू लागल्यास, वयाच्या 8 – 9 व्या वर्षाच्या टप्प्यातच मुलींना युवावस्थेचा सामना करावा लागतो. स्तन लवकर वाढल्यास, मासिक पाळीदेखील त्यानंतर त्वरीत दोन वर्षात सुरू होते. 

तुमच्या मुलींमध्येही अशी लक्षणे दिसू लागल्यास, वेळीच तिला विश्वासात घ्या आणि तिच्याशी आई म्हणून याबाबत व्यवस्थित चर्चा करा. तिने कोणत्याही गोष्टीला घाबरून जाण्याची गरज नाही हे तिला विश्वासात घेऊन सांगणे या अवस्थेत गरजेचे आहे. मुलींची मानसिक स्थिती या काळात योग्य नसते. त्यामुळे तिच्या कलाने सगळ्या गोष्टी घेऊन आई आणि घरातील व्यक्तींनी मुलींची युवावस्थेच्या काळात साथ द्यायला हवी. हा मानसिक आजार नाही. मात्र लवकर वयात येताना मुलींना अनेक गोष्टींची जाण करून देणे हे घरातील माणसांचे कर्तव्य आहे. अन्यथा मुलींची वागणूक बदलू शकते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT