ADVERTISEMENT
home / आरोग्य
mc

मासिक पाळीच्या दरम्यान घालू नका हे कपडे

मासिक पाळी हा खरंतर महिलांसाठी फारच संवेदनशील विषय आहे. मासिक पाळी समज कमी आणि गैरसमज जास्त असतात. कितीतरी महिलांना या दिवसात खूपच त्रास होतो. पोटात दुखणे, पाळीचा त्रास होणे, अंगावरून अति रक्त जाणे असे अनेक त्रास महिलांना सहन करावे लागतात. पोटात दुखणे, कंबरेतील क्रँम्प्स यासारख्या समस्या तर सगळ्यांसाठीच अगदी कॉमन आहेत. यामधीलच अजून एक समस्या म्हणजे पाळीच्या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या कपड्यांमुळे खालच्या भागात खाज येणे, पुळ्या येणे आणि रॅशेस येणे. हा त्रासही अनेक महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे असा त्रास होत असेल तर तुम्ही पाळीच्या या चार दिवसात अत्यंत आरामदायी कपडे घालायला हवेत हे लक्षात ठेवा. मासिक पाळीच्या दिवसात तुम्ही कोणते कपडे घालू नयेत याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. हे कपडे घातल्यास तुम्हाला नक्कीच या त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्हीही हा लेख नक्कीच वाचायला हवा. 

सुळसुळीत अंडरवेअर (underwear)

मासिक पाळीच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या खालच्या भागाची अर्थात व्हजायनाची आणि आजूबाजूच्या त्वचेची स्वच्छता ठेवणे तितकेच गरजेचे आहे. ते महत्त्वाचे आहे. मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या खाज, इरिटेशनपासून तुम्हाला जर स्वतःला वाचवायचे असेल तर तुम्ही या दिवसात कॉटनच्या अंडरवेअर वापरा. सुळसुळीत अथवा सिल्कच्या चड्ड्या जर तुम्ही वापरत असाल अथवा तुम्हाला फॅशन आणि वेगवेगळ्या स्टाईलच्या अंडरवेअर वापरायची सवय असेल तर ते टाळा. तुम्ही या चार दिवसात स्वच्छ आणि मऊ, मुलायम अशा कॉटन अंडरवेअरचा आधार घ्या. यामुळे मासिक पाळीच्या दिवसात पॅड लावण्यालाही परफेक्ट फिटिंग मिळते आणि योग्य कव्हरेज मिळते. तसंच तुमच्या त्वचेला त्रास होत नाही. रॅश अथवा खाज येण्याचा त्रास होत नाही. कारण कॉटनची अंडरवेअर घाम व्यवस्थित टिपून घेते आणि त्वचेला हानी पोहचवत नाही.

टाईट फिटिंगचे कपडे (Tight Fitting Clothes)

tight fitting clothes

मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही कोणत्याही प्रकारचे टाईट फिटिंग कपडे घालण्यापासून दूरच राहा. तसंच मासिक पाळीच्या दिवसात बॉडी हगिंग कपडेदेखील वापरू नये. या दिवसात तुम्ही स्किन फिटिंग जीन्स (Skin Fitting Jeans) अथवा टाईट जीन्स घालणे टाळा. कारण या काळात सूज आणि ब्लोटिंगचा त्रास होत असतो. टाईट कपड्यांमुळे रक्तप्रवाह थांबतो आणि त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होतो. मासिक पाळीच्या दरम्यान थोडे सैलसर आणि आरामदायी कपडे घालणे तुम्हाला अधिक फायदेशीर ठरू शकते. तसंच या दिवसात घाम टिपणारे कपडे घाला. 

वायर्ड ब्रा पासून राहा दूर 

मासिक पाळीच्या दिवसात कोणत्याही प्रकारे तुम्हाला शरीराला त्रास होईल अथवा फिट होतील असे कोणतेच कपडे घालू नका. मासिक पाळीच्या दिवसात शरीराला सूज येण्याचा त्रासही अनेक महिलांना होत असतो. त्यामुळे वायर्ड ब्रा घालण्यापासून तुम्ही लांब राहा. यामुळे त्वचेला इरिटेशन होण्याचा आणि टाईटपणामुळे अगदी श्वास घेण्याचाही त्रास तुम्हाला होऊ शकतो. या काळात तुम्ही कॉटनची ब्रा घालण्याला प्राधान्य द्या. यामुळे तुम्हाला अधिक आराम मिळेल. तसंच तुम्हाला इतर दुखण्यामध्ये अजून एका त्रासाचा सामना करावा लागणार नाही. शक्यतो या चार दिवसात जास्तीत जास्त कॉटनचे कपडे वापरण्यालाच तुम्ही प्राधान्य द्या. यामुळे तुम्हालाच फायदा मिळतो. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT